अकॅडमीत बॅटिंग शिकायला गेलेल्या भज्जीने एकदा चुकून बॉलिंग केली आणि….

harbhajan singh, harbhajan singh biography, harbhajan singh story, harbhajan singh in marathi, harbhajan singh, हरभजन सिंग, हरभजन सिंग माहिती, हरभजन सिंग स्टोरी, क्रिकेट, indian cricketer

आपण एका अशा विषया बद्दल जाणून घेणार आहोत जो तुमच्या अत्यंत आवडीचा आहे. मंडळी सध्या क्रिकेट वर्ल्ड कप चालु आहे. त्यामुळे जगाच्या क्रिकेट विश्वात कमालीच्या घडामोडी चालु आहेत. त्यातच भारताने अनेक विजय संपादन करून ब्रिटीशांच्या भुमीवर भारताची मान आणखीन उंच केलीय.

पण मंडळी..! आपल्या भारताला अनेक जाज्वल्य व तुफानी खेळाडूंचा वारसा लाभलेला आहे. त्यात आपल्या देशात क्रिकेटचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे त्या खेळाडूंमध्ये क्रिकेट क्षेत्रातील खेळाडूंची संख्या जास्त आहे. भारताने जगाला आनेक क्रिकेटरत्न दिलीत. त्यात मग सचिन तेंडुलकर असेल, सुनिल गावस्कर असतील किंवा मग कपिल देव सारखे नामवंत खेळाडू असतील. सर्वांनी भारताचं नाव अंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावलं आहे.

harbhajan singh, harbhajan singh biography, harbhajan singh story, harbhajan singh in marathi, harbhajan singh, हरभजन सिंग, हरभजन सिंग माहिती, हरभजन सिंग स्टोरी, क्रिकेट, indian cricketer
Kapil Dev, World Cup (Source – HT)

पण आपल्या भारतात क्रिकेट क्षेत्रात फलंदाजांची जशी जाज्वल्य परंपरा आहे तशीच ती गोलंदाजांची सुध्दा आहे. त्यात मग मोहम्मद शमी, आर अश्विन, जसप्रीत बुमरहा आणि भुवनेश्वर कुमार सारख्या तुफानी गोलंदाजांची नावं अग्रेसर घेता येतील. पण यात आणखीन एक नाव असं आहे की ज्या नावाने भारतीय क्रिकेट क्षेत्रात आपल्या गोलंदाजीने वादळ आणलं होतं. ज्या गोलंदाजांच्या शैली पुढे भले भले फलंदाज गुडघे टेकतात. कोण आहे तो गोलंदाज..? ते नाव तुम्हा आम्हा सर्वांनाच परिचित आहे, ते नाव म्हणजे भारताचा नामवंत गोलंदाज हरभजन सिंग अर्थात तुमचा आमचा भज्जी..!

आज आपण याच आपल्या आवडत्या खेळाडूच्या आजपर्यंतच्या प्रवासा बद्दल जाणून घेणार आहोत. भज्जीचा इथपर्यंतचा प्रवास खरचं सोपा नव्हता. म्हणतात ना, ‘काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं.’ भज्जीचा प्रवास जरी खडतर असला तरी त्याने हार मानली नाही आणि आजचं हे त्याचं स्थान त्याने मिळवलं. चला तर मगं जाणून घेऊन हरभजन सिंगचा जीवन प्रवास.

harbhajan singh, harbhajan singh biography, harbhajan singh story, harbhajan singh in marathi, harbhajan singh, हरभजन सिंग, हरभजन सिंग माहिती, हरभजन सिंग स्टोरी, क्रिकेट, indian cricketer
Harbhajan singh, Harbhajan singh biography (Source – Wisden)

हरभजन सिंगचा जन्म पंजाब मधील जालिंदर येथे 3 जुलै 1980 रोजी झाला. त्याचं कुटूंब हे मध्यम वर्गात मोडणारं होतं. हरभजनचे वडील सरदार सरदेवसिंग हे आपला छोटासा व्यवसाय चालवतं होते. त्यांनी हरभजनला अगदी लाडात व देखरेखीत वाढवलं. जसं जसा हरभजन मोठ्ठा होत गेला, त्याच्यातील क्रिकेट खेळण्याची आवड त्याच्या बाबांना लक्षात आली. म्हणुन त्याच्या वडीलांनी त्याला बाहेर गावी एका क्रिकेट ॲकॅडमीत ट्रेनिंगसाठी पाठवलं.

हरभजन पहिल्यांदाच आपल्या कुटूंबाला सोडून बाहेर रहायला चालला होता त्यामुळे मनावर दडपण तर होतचं, पण आपल्या क्रिकेटच्या आवडीपोटी तो बाहेर ट्रेनिंगला गेला. पण काही दिवसात हरभजनला त्याच्या घरच्यांची आठवणं येऊ लागली याचा परिणाम त्याच्या खेळावर होऊ लागला. त्याचं मन खेळात लागतं नव्हतं. त्यामुळे त्याने घरी परत जाण्याचा निर्णय घेतला.

हरभजन आपला सगळा पसारा आवरून घरी जाण्यासाठी स्टेशनच्या दिशेने निघाला. स्टेशनसाठी तो रिक्षाची वाट बघतं उभा होता. तेव्हाच तिथुन त्याचे कोच जात होते. त्यांना हरभजन बॅग बांधून घरी चाललाय हे दिसलं. त्याचे प्रशिक्षक त्याच्या जवळ जाऊन उभे राहिले. त्यांनी त्याला आनखीन थोडे दिवस थांबण्याचा सल्ला दिला आणि जर नाहीच मन रमलं तर परत जा हे सुध्दा सांगितलं. पण त्यानंतर हरभजन क्रिकेट मध्ये रमला तो कायमचाच.

harbhajan singh, harbhajan singh biography, harbhajan singh story, harbhajan singh in marathi, harbhajan singh, हरभजन सिंग, हरभजन सिंग माहिती, हरभजन सिंग स्टोरी, क्रिकेट, indian cricketer, Bhajji
Harbhajan singh story (Source – Eeyuva.com)

हरभजनच्या क्रिकेट कारकीर्दीची सुरूवात ही पहिल्यांदा एक फलंदाज म्हणुन झाली होती. पण एके दिवशी त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला गोलंदाजी करण्यास सांगितले. त्यानंतर त्याची गोलंदाजी बघुन प्रशिक्षण खुपच खुश झाले. त्यांना जाणवलं की याच्या गोलंदाजी मध्ये काहीतरी खास गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी त्याला गोलंदाजी करण्याचाच सल्ला दिला आणि प्रशिक्षकांचा हा अंदाज खरा ठरला. एक गोलंदाज म्हणुन हरभजनचे आपल्या शिरपेचात अनेक विक्रम नोंदवले आहेत.

हरभजनने आपल्या सुरूवातीच्या काळात राज्य क्रिकेट स्पर्धांमध्ये खुप यश संपादन केले. त्याने पंजाबकडून अंडर 15 स्पर्धा खेळत असताना एका सामन्यात हिमाचल प्रदेशाच्या 11 विकेट्स तर हरियाणाच्या 12 विकेट्स घेतल्या. यावरून आपल्या हरभजन सिंग याच्या त्याकाळच्या खेळाचा अंदाज येतो. त्यानंतर भज्जी रनजी ट्रॉफीच्या एका सामन्यात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरशी भिडला. भज्जीची गोलंदाजी बघुन सचिन सुध्दा प्रभावित झाला. त्याने त्याला सांगितलं की तु एक दिवस नक्कीच भारतीय संघात खेळचील आणि सचिनने बोललेले हे शब्द सत्यात उतरले.

harbhajan singh, harbhajan singh biography, harbhajan singh story, harbhajan singh in marathi,, हरभजन सिंग, हरभजन सिंग माहिती, हरभजन सिंग स्टोरी, क्रिकेट, indian cricketer
Harbhajan singh in marathi (Source – Firstpost)

एकदा भज्जी भारतीय संघाची टोपी घेण्यासाठी एका फॅक्टरी मध्ये गेला पण त्यावेळी त्या दूकानदाराने त्याला भारतीय संघाची टोपी दिली पण त्यावरचा BCCI चा लोगो काढून टाकला. त्यावेळी भज्जीने आपल्या मित्रांच्या समोर प्रण केला कि एक दिवस मी भारतीय संघात खेळणारच आणि त्याच हे स्वप्न सत्यात तेव्हा उतरलं जेव्हा त्याची चांगली कामगीरी बघुन 1999 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात भारतीय संघाकडून खेळण्याची संधी त्याला मिळाली. पण हि संधी फक्त नावापुरतीच राहिली. कारणं या दौर्यात भज्जीला राखीव गड्यांच्या जागी ठेवण्यात आलं. कारणं त्यावेळी अनिल कुंबळे चांगलाच फॉर्म मध्ये होते. त्याला बदलनं भारतीय संघाला परवडणारं नव्हतं.

याच काळात हरभजनच्या वडीलांचं निधन झालं. याचा परिणाम म्हणुन संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी भज्जीच्या खांद्यावर येऊन पडली. त्यात त्याने आपल्या दोन बहिनींची लग्न लावून दिली. संपुर्ण कुटूंबाचा गाडा तर चालवायचा होता अशातचं त्याला त्याचा खेळ दाखवण्यासाठी मौका मिळतं नव्हता. त्यामुळे मानसिक तानामुळे भज्जीने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला पण या वेळी त्याला सावरायला आला भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली. त्याने भज्जीला परत भारतीय संघात स्थान मिळवून दिलं.

त्यावेळी भारत बलाढ्य ऑस्ट्रेलिया समोर खेळत होता. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारताच्या गोलंदाजांना धु-धु-धुवत होते. सौरभ गांगुलीची सगळी समिकरणं फोल जात होती. अशात गांगुलीने भज्जीला गोलंदाजी करण्यास उभे केले. या सुवर्ण संधीचा फायदा घेत भज्जीने आपल्या उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाच्या महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या. हाच तो काळ होता ज्याने हभजन सिंगला सबंध क्रिकेट रसिकांच्या मनावर राज्य करणारा भज्जी बनवलं. या नंतर भज्जीने थांबायचं नाव काढलं नाही.

harbhajan singh, harbhajan singh biography, harbhajan singh story, harbhajan singh in marathi, harbhajan singh, हरभजन सिंग, हरभजन सिंग माहिती, हरभजन सिंग स्टोरी, क्रिकेट, indian cricketer
The Turbanator Destroys Australia (Source – IndiaTimes)

हरभजनची IPL ची कारकिर्द सुध्दा तितकीच सुरेख ठरली. आधी त्याने मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळण्यास सुरूवात केली, पण नंतर 2016 मध्ये त्याला चेन्नई सुपर किंग्ज या संघाने खरेदी केले आणि 2019 च्या IPL मध्ये सुध्दा त्याने दैदिप्यमान कामगीरी केली आहे.

हरभजनं जेवढा खेळात पारंगत आहे. आपल्या खाजगी आयुष्यात तो तेवढाच तापट स्वभावाचा समजला जातो. या आपल्या तापट स्वभावामुळे भज्जीवर अनेकदा कारवाईचे प्रसंग ओढावले आहेत. एकदा त्याची निवड बेंगलोरच्या एका ॲकॅडमीत झाली होती तेव्हा त्याला तेथिल कॅन्टीन मधला कोणताच पदार्थ आवडला नाही, त्यामुळे त्याने चक्क कॅन्टींनचे मेनूकार्डच फाडून टाकले. यामुळे भज्जीला त्या ॲकॅडमीतुन बाहेर काढण्यात आले.

harbhajan singh, harbhajan singh biography, harbhajan singh story, harbhajan singh in marathi, harbhajan singh, हरभजन सिंग, हरभजन सिंग माहिती, हरभजन सिंग स्टोरी, क्रिकेट, indian cricketer
Harbhajan and Symonds (Source – webindia123.com)

अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सुध्दा भज्जीचा हा संघर्ष चालुच होता. ह्यावेळी त्याच्या रागाचा सामना ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना करावा लागला. त्यामुळे त्याला काही काळ निलंबित सुध्दा करण्यात आलं होतं. परंतु भज्जीचा हा तापट स्वभाव कमी झाला नाही. एका IPL सामन्या दरम्यान त्याची आणि श्रीशांतची वादावादी होऊन भज्जीने श्रीशांतच्या श्रीमुखात लगावली होती.

तरी सुध्दा त्यांच्या चुका ह्या त्याच्या भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानापेक्षा खुपच कमी आहेत. त्यामुळे त्याचा उत्कृष्ट खेळ बघुन भारत सरकारने त्याला “पद्मश्री” या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

ये भावड्या हे बी वाच –

वर्ल्डकप जिंकल्यानंतर कपिल देवने वेस्ट इंडिज टीमला दारू उधार मागितलेली

इंडियन क्रिकेट टीमच्या जर्सीवर ३ स्टार का आहेत ? ते आधी का नव्हते ?

‘सिक्सर किंग’च्या वनडे क्रिकेटमधील अफलातून खेळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here