राहुल गांधी पंतप्रधान झाले तरी या मंदिरात प्रवेश करू शकणार नाहीत. पण का ?

who can enter jagannath temple, president not allowed in puri temple, puri jagannath temple, are non hindus allowed in puri jagannath temple, jagannath temple puri, ratha yatra puri, jagannath puri temple facts, jagannath temple photo, jagannath puri history, jagannath puri in marathi, rahul gandhi and jagannath puri, indira gandhi, mahatma gandhi, sant kabir, जग्गनाथ पुरी मंदिर, जग्गनाथ पुरी मंदिराचा इतिहास, केवळ हिंदूंना प्रवेश, राहुल गांधी, इंदिरा गांधी

जगन्नाथ पुरी मंदिर हे पर्यटकांसाठी असलेले प्रेक्षणीय स्थळ नसून हे केवळ हिंदूंचे पवित्र धार्मिक स्थळ आहे, त्यामुळे प्राचीन काळापासून इथे एक नियम पाळला जातो….

हिंदू धर्मासाठी अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या चार धाम पैकी एक धार्मिक स्थळ म्हणजे ओडिशा राज्यातील ‘जगन्नाथ पुरी’ ! प्रत्येक हिंदूला आपण एकदा तरी भगवान जगन्नाथाचे दर्शन घ्यावे अशी ईच्छा असते. पुरी येथे भगवान विष्णूचे अवतार मानले गेलेले, ‘भगवान जगन्नाथ’ यांचे अतिप्राचीन १२ व्या शतकात बांधलेले मंदिर आहे.

या मंदिरात जगन्नाथा बरोबर बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत. आषाढ महिन्यात असणारी जगन्नाथ रथ यात्रा म्हणजे तर प्रत्येक हिंदू साठी एक पर्वणीच असते, मोठ्या श्रद्धेने हिंदू ह्यात सहभागी होत असतात. बंगालच्या उपसागराच्या किनारी असलेले हे अतिशय रमणीय आणि प्रसन्न ठिकाण आहे.

who can enter jagannath temple, president not allowed in puri temple, puri jagannath temple, are non hindus allowed in puri jagannath temple, jagannath temple puri, ratha yatra puri, jagannath puri temple facts, jagannath temple photo, jagannath puri history, jagannath puri in marathi, rahul gandhi and jagannath puri, indira gandhi, mahatma gandhi, sant kabir, जग्गनाथ पुरी मंदिर, जग्गनाथ पुरी मंदिराचा इतिहास, केवळ हिंदूंना प्रवेश, राहुल गांधी, इंदिरा गांधी
Puri Jagganath Temple facts, jagannath puri history (Source – Wikipedia)

प्रत्येक हिंदू धार्मिक स्थळांसारखेच अनेक परकीय आक्रमणे इथे झाले, तसेच लूटमारी सुध्दा ह्या मंदिरावर झाल्या. पण इथल्या पुजारी लोकांनी भगवान जगन्नाथ आणि बाकी मूर्ती कायम गुप्त ठिकाणी लपवून त्यांचा बचाव केला. तसेच त्यांचे पावित्र्य कायम राखले, काही विशिष्ट धर्मातील लोकांनी कायम हिंदू धर्म आणि देवता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच ह्या मंदिराने अगदी सुरवाती पासून केला आहे एक नियम.

काय आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर लिहिलेला नियम ?

जगन्नाथ पुरी मंदिर हे पर्यटकांसाठी असलेले प्रेक्षणीय स्थळ नसून हे केवळ हिंदूंचे पवित्र धार्मिक स्थळ आहे, त्यामुळे इथला असा नियम आहे की फक्त आणि फक्त हिंदू, जैन, शीख, बौद्ध ह्या धर्मातील लोकच ह्या मंदिरात प्रवेश मिळवू शकतात. सुमारे पाच भाषांमध्ये मंदिराबाहेर सूचना वजा आदेश लिहिलेला आहे की, प्रवेश फक्त हिंदूंना मर्यादित ! आजपर्यंत जगन्नाथ पुरी मंदिर प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता हा नियम कसोशीने पाळला आहे.

आज पर्यंत मंदिर परिसरात प्रवेश नाकारण्यात आलेल्या मोठ्या व्यक्ती ह्या आहेत,

१) महात्मा गांधी – गांधीजींनी १९३४ साली सर्व धर्माच्या लोकांना घेऊन एकदा मंदिर प्रवेश करायचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही, त्यांनी नंतर ह्यासाठी मोर्चा पण काढला पण काही उपयोग झाला नाही.

२) विनोबा भावे – गांधींनी केला तोच प्रयत्न विनोबांनी केला, पण त्यांचा प्रयत्न व्यर्थ ठरला.

३) संत कबीर – १३व्या शतकातील कवी आणि संत असलेले संत कबीर मुस्लिम टोपी घालून गेल्याने आधी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

४) इंदिरा गांधी – इंदिरांचा जन्म जरी हिंदू काश्मिरी ब्राह्मण कुटुंबातील असला तरी त्यांचे लग्न एका पारशी मुलाशी झाले होते आणि हिंदू धर्मात लग्नानंतर पतीचे गोत्र स्त्री धारण करते पण फ़िरोज गांधी हिंदू नसल्याने त्यांचे गोत्र असण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे लग्नानंतर इंदिराजी हिंदू उरल्याच नाहीत, पंतप्रधान असूनही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

who can enter jagannath temple, president not allowed in puri temple, puri jagannath temple, are non hindus allowed in puri jagannath temple, jagannath temple puri, ratha yatra puri, jagannath puri temple facts, jagannath temple photo, jagannath puri history, jagannath puri in marathi, rahul gandhi and jagannath puri, indira gandhi, mahatma gandhi, sant kabir, जग्गनाथ पुरी मंदिर, जग्गनाथ पुरी मंदिराचा इतिहास, केवळ हिंदूंना प्रवेश, राहुल गांधी, इंदिरा गांधी
ratha yatra puri, jagannath temple photo (Source – The Wire)

ह्या सर्वांबरोबरच अनेक ब्रिटिश व्हॉईसरॉय आणि परदेशी मोठ्या हुद्यावर असलेल्यांना सुद्धा प्रवेश नाकारला गेला आहे. असे सगळे असताना राहुल गांधी कितीही स्वतः ला जनेऊधारी, दत्तात्रेयगोत्रोत्पन्न हिंदू ब्राह्मण सांगत असले तरी त्यांच्या आज्जी पासून पुढे कोणीही हिंदू म्हणवून घेऊ शकत नाही कारण ते फ़िरोज जहांगीर गांधी यांचे पारशी वंशज आहेत. त्यामुळेच राहुल गांधी हे सुद्धा जगन्नाथ पुरीच्या मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत, हे त्यांना फार चांगले ठाऊक आहे म्हणूनच ते आजूबाजूच्या सर्व धार्मिक स्थळांना भेटी देत असतात पण, पुरी मंदिरातून हाकलून दिले तर मोठी नाचक्की होईल असे वाटून ते ह्या मंदिराची वाट मात्र धरत नाहीत.

राहुल गांधी पंतप्रधान झाले तरी मंदिर प्रशासन त्यांना प्रवेश देणार नाही त्यांना दर्शन घ्यायचे असल्यास त्यांनी वर्षातून एकदा होणाऱ्या जगन्नाथ राथयात्रेत सहभागी व्हावे पण मुख्य मंदिरात त्यांना प्रवेश मिळणार नाही असे मंदिर प्रशासन सांगते. गांधी परिवाराला ही गोष्ट सर्वसामान्य आहे, सोनिया गांधी यांना ही आज पर्यंत गैर हिंदू असल्याने अनेक ठिकाणी प्रवेश नाकारले आहेत, नेपाळ येथील पशुपतीनाथ आणि तिरुपती बालाजी मंदिरात सुद्धा तुम्ही हिंदू आहात का असे विचारल्यावर त्यांनी अतिशय संदिग्ध उत्तर दिले आणि आता त्यांचा मुलगा स्वतः ला हिंदू मतांसाठी जनेऊधारी हिंदू असल्याचे सांगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here