या पालीची किंमत चक्क 4 कोटी रुपये….. कसं शक्य आहे ?

1355

मंडळी ऐकाव ते नवलच. पाल म्हटलं तर अनेकांचा नावडता प्राणी. आपल्याला पाल दिसली की लगेच चप्पल उचलली जाते आपसुक तीला मारण्यासाठी. पाल म्हणजे आपल्या घराच्या भिंतीवर लिलया वावरणारा व किटक खाणारा एक उपद्रवी प्राणी. या पालीचा स्पर्श सुध्दा आपल्यात वर्ज मनाला जातो. अनेक ठिकाणी तर पाल जर अंगावर पडली तर आपल्या लाडक्या मारूती रायाला शरण जावे लागते व त्याला घालावा लागतो मग तेलाचा अभिषेक. आपण कित्येकदा पाल जेवणात कींवा खाण्याच्या पदार्थात पडून विषबाधा झाल्याच्या बातम्या कित्येकदा ऐकल्या असतील. पण मौल्यवान पालीची बातमी कधी तुम्ही ऐकल्या काय..? तुम्ही म्हणाल पालीत काय एवढ मौल्यवान आहे..? उलट तिला तर रोज आम्ही बघत असतो आमच्या घरांच्या भिंतीवर. पण थांबा थांबा मंडळी..! ही काही साधीसुधी पाल नाही, तर ही एक अतिशय दुर्मिळ प्रजातीची पाल आहे. त्यामुळे हीची किंमत जगभरात जास्त आहे.

तर त्याचं झालं असं की काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल राज्याच्या पोलिसांनी एका व्यक्तीला पकडलं जो या पालीची तस्करी करत होता. या पालीचे नाव आहे “टोके एको” तर आपल्याला माहीती आहे की पाल हि Reptiles वर्गात येतात. त्यांच्याच या वर्गातील टोके एको ही एक पाल. ही पाल दिसायला आकर्षक आहे तसेच ती हिरव्या रंगाची असुन तीच्या अंगावर नारंगी कडा असलेले निळे ठिपके असतात. त्यामुळे ही टोके एको पाल अधिक आकर्षक वाटते. या टोके एको पालीच्या कातडीला जगभरात विशेष मागणी आहे त्यामुळे हीची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण ही फक्त पुर्व आशियातील देशांमध्ये म्हणजेच भारत, चीन, जपान, थायलंड, इंडोनेशिया, जकार्ता, सुमात्रा इत्यादी ठिकाणी प्रामुख्याने आढळतात.

टोके एको, १ करोड रुपयाची पाल, पालीची तस्करी, Tokay gecko
(Source – Google)

त्यामुळे पश्चिम बंगाल मध्ये सापडलेला हा तस्कर बंगाल मार्गे या पालीला भारता बाहेर नेण्याच्या तयारीत होता. पण बंगाल पोलिसांनी त्याचा हा डाव हाणून पाडला. त्याने दिलेल्या माहिती नुसार बांगलादेश मध्ये त्याच्या ओळखीचे काही या प्रकारचे मोठ्ठे डिलर्स आहेत आणि तो याच डीलर्सना विकणार होता. त्याच्या म्हणण्यानुसार हे लोक तिथून या टोके एको पाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकतात. त्याला या पालीची किंमत विचारली असता, ही पाल 4 करोड रूपये इतक्या मोठ्या किंमतीला विकणार होता, असे सांगितले.

कशासाठी होतो उपयोग

ह्या टोके एको प्रजातीच्या पाली अतिशय दूर्मीळ असुन फक्त मोजक्याच ठिकाणी आढळतात. त्यामुळे या प्रकारच्या प्राण्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी असते आणि अशा प्राण्यांचे शौकिन प्राण्यांसाठी पाहिजे तेवढी किंमत चुकवायला तयार असतात. पण हे त्या प्राण्यांना मारून त्यांच्या अवयवांचा काळाबाजार करतात आणि असा काळा बाजार अनेक देशात मोठ्याप्रमाणात चालतो. यांसारख्या प्राण्यांच्या अवयवांचा उपयोग शोभेच्या वस्तु किंवा वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो.

पण या सारख्या काळ्या बाजारामुळे अनेक प्रजाती लुप्त होत आहेत. त्यामुळे ही जैवविविधता टिकवण्यासाठी त्या त्या परिसरातील स्थानिक सरकारांनी या प्राण्यांना अभय दिले आहे. आणि यांच्या शिकारीवर बंदी घातली आहे. पण तरीही आज या प्राण्यांची लपून छपून तस्करी केली जाते. यासारख्या प्रवृतींमुळे भारतीय चित्ता व डोडो यांसारखे प्राणी जैवविवधतेतुन नष्ट झाले आहेत. त्यामुळे या प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे. हे जर असेच चालु राहिले, अशाच प्रकारे जर दुर्मिळ प्राण्यांची तस्करी होऊन ते लुप्त पावू लागले तर हा निसर्ग आपल्याला कधीही माफ करणार नाही. या निसर्गाशी केलेली बेईमानी मानवाला खुप महागात पडल्या वाचून राहणार नाही. त्यामुळे आपल्या निसर्गाची जपणूक आपणचं केली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here