“मतदान प्रक्रिया सुरु असताना, नागरिकांच्या डोळ्यासमोर केवळ उमेदवार आणि पक्षाचे नावच नसते, तर पक्षाचे निवडणूक चिन्ह देखील असते.”
प्रत्येक राजकीय पक्षाचे जे विशिष्ट निवडणूक चिन्ह असते, त्यावरून आपण राजकीय पक्ष लक्षात ठेवत असतो. १९५२ साली, स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना होऊन सर्वसाधारण निवडणुकांची सुरुवात झाली. मतदान प्रक्रिया सुरु असताना, नागरिकांच्या डोळ्यासमोर केवळ उमेदवार आणि पक्षाचे नावच नसते, तर पक्षाचे निवडणूक चिन्ह देखील असते. निवडणुकीच्या दरम्यान, मतदारांना कोणत्या निवडणूक चिन्हाचा वापर करून मतदान करायचे ह्याची सतत आठवण करून दिली जाते. शिक्षित नसलेल्या मतदारांना निवडणूक चिन्ह हे उमेदवार आणि पक्ष लक्षात ठेवण्याचे एकमात्र साधन आहे.
निवडणुकीच्या वेळी, राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. जेव्हा राजकीय पक्ष स्वतःसाठी निवडणूक चिन्ह निवडतो तेव्हा निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेतो की हे चिन्ह द्यावे का नाही. दिल्लीला असलेल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात १०० च्या आसपास निवडणुकीचे चिन्ह ठेवण्यात आले आहेत, जे अजून कोणत्याही पक्षाला दिले गेले नाहीत. या लेखातून आपण, भारतातील ७ मुख्य राष्ट्रीय पक्ष आणि त्यांच्या निवडणूक चिन्हांची माहिती घेऊ या.
१) इंडियन नॅशनल काँग्रेस (आय एन सी)
स्थापना – १८८५, निवडणूक चिन्ह – हाताचा पंजा
इंडियन नॅशनल काँग्रेस हा सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. पार्टीचे निवडणूक चिन्ह दोन वेळा बदलले गेले आहेत. नेहरुंच्या नेतृत्वाखाली पक्षाचे निवडणूक चिन्ह “दोन बैलांची जोडी” असे होते, ज्यामूळे त्यांनी शेतकर्यांशी, सामान्य जनतेशी जवळीक साधली. १९६९ साली पक्षाचे विभाजन झाले त्यावेळी, आयोगाने हे चिन्ह जप्त केलं. कामराज यांच्या नेतृत्वाखालील जुन्या कॉंग्रेसचे चिन्ह तिरंगा आणि मध्यभागी ‘चरखा’ असे होते, तर नवीन तयार झालेल्या काँग्रेसला ‘गाय आणि वासरू’ हे प्रतीक मिळाले.
१९७७ साली आणीबाणी संपल्यानंतर, निवडणूक आयोगाने त्यांचे गाय – बछड्याचे चिन्ह जप्त केले. लोकसभा निवडणुकीच्या काळात इंदिरा गांधी रायबरेलीतून हरल्या होत्या, त्यानंतर त्या शंकराचार्य स्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांचा आशीर्वाद घ्यायला गेल्या. श्रीमती गांधी गेल्यानंतर शंकराचार्य शांत बसले होते, पण थोड्या वेळानंतर त्यांनी आपला उजवा हात उंच करून आशीर्वाद दिला. इंदिरा गांधीच्या मनात निवडणुकीचे चिन्ह म्हणून हाताचा पंजा बनविण्याची इच्छा झाली.
योगायोगाने बुटा सिंग निवडणूक आयोगाकडे गेले तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांना निवडणूक चिन्ह म्हणून हत्ती, सायकल आणि हाताचा पंजा हे पर्याय दिले, यावर इंदिरा गांधी आणि आर के राजारत्नम यांनी मिळून काँग्रेस (आय) पक्षाचे चिन्ह पंजा बनविण्याचा निर्णय घेतला, कारण हात हा शक्ती, ऊर्जा आणि ऐक्य यांचे प्रतीक आहे. तेव्हापासून काँग्रेसचे निवडणूक चिन्ह हाताचा पंजा आहे.
२) भारतीय जनता पार्टी (भाजपा)
स्थापना – १९८०, निवडणूक चिन्ह – कमळाचे फूल
१९५१ मध्ये, भारतीय जनसंघ, जो पक्ष सध्या भाजप म्हणून ओळखला जातो. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी या पक्षाची स्थापना केली आणि त्याचे निवडणूक चिन्ह दिवा ठरवले होते. आणीबाणीनंतर जनसंघाची स्थापना करण्यासाठी त्यात बऱ्याच पक्षांसह जनसंघ एकत्र विलीन करण्यात आला आणि त्याचे निवडणूक चिन्ह ‘नांगर खांद्यावर घेतलेला शेतकरी’ असे होते.
कमळ कसे बनले भाजपाचे निवडणूक चिन्ह
जेव्हा १८५७ चा उठाव झाला तेव्हा शिपाई एकमेकांना बातम्या आणि निरोप पाठविण्यासाठी पोळी बरोबर कमळाचे बि वापरत होते. नंतर बऱ्याच ठिकाणी जेव्हा लोक ब्रिटिशांविरुद्ध बंड करू लागले, तेव्हा ते कमळाचे फूल एक चिन्ह म्हणून वापरायला लागले. भाजपच्या संस्थापकांनी कमळाचे फुल निवडणूक चिन्ह म्हणून निवडले कारण त्याचा वापर इतिहासात क्रांतिकारकांनी केला, ज्यातून विशिष्ट विचारसरणी, सांस्कृति आणि राष्ट्रवाद व्यक्त होतो.
३) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीआईएम)
स्थापना – १९६४, निवडणूक चिन्ह – खुरपे आणि हातोडा (लाल रंगाचा)
संघर्षाची ओळख म्हणून, कम्युनिस्ट पक्षाचे निवडणूक चिन्ह देखील लाल रंगाचे असते. हे चिन्ह शेतकरी कामगार यांचे जीवन आणि संघर्ष दाखवते, म्हणून ह्या चिन्हाची निवड करण्यात आली. शेतात सर्व पिक कापण्यासाठी खुरपे आणि हतोड्याचा उपयोग कामगारांना होतो. समाजातील छळ झालेल्या गरीब लोकांचा हा पक्ष आहे, असे ह्या पक्षाचे समर्थक म्हणतात. हा पक्ष संपूर्ण भारतभरातील भांडवलवादी आणि जागतिकीकरणाची धोरणे आणि योजनांचा विरोधक आहे.
४) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआई)
स्थापना – १९२५, निवडणूक चिन्ह – पिकं आणि खुरपे
१९६० पूर्वी भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी एकच होती. वैचारिक दृष्टीने पक्षातील दोन गटांमध्ये संघर्ष होता आणि शेवटी हा पक्ष दोन वेगळ्या पक्षांमध्ये विभागला गेला. १९५२ पासून ह्या पक्षाचे निवडणूक चिन्ह पिकं – खुरपे निवडणूक आहे. शेतकरी आणि कामगार हे सामाजिक व्यवस्थेमध्ये सगळ्यात प्रमुख उत्पादक गट आहे. त्यांच्यासाठी संघर्ष करणे, ट्रेड युनियन आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हा पक्ष सगळ्यात जास्ती आंदोलनात सहभागी होतो.
५) बहुजन समाज पार्टी (बसपा)
स्थापना – १९८४, निवडणूक चिन्ह – हत्ती
बसपाच्या निवडणुकीचे चिन्ह हत्ती ठेवण्यात आले कारण, ते शारीरिक शक्तीचे प्रतीक आहे. ‘बहुजन समाज’ असा समाज ज्यामध्ये दलित वर्गांची संख्या सगळ्यात जास्त आहे. उच्च जातींनी केलेल्या अत्याचार व त्या विरुद्ध संघर्ष ‘हत्ती’ द्वारे दर्शविला आहे. समाज कडक, निडर, शांत आणि शक्तिशाली बनण्याची प्रेरणा यातून मिळते.
६) राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी)
स्थापना – १९९९, निवडणूक चिन्ह – घड्याळ
एनसीपीचे चिन्ह निळं घड्याळ आहे, ज्यामध्ये अलार्म बटण आणि दोन पाय आहेत. हे घड्याळ १० वाजून १० मिनिटांचा वेळ दर्शविते. हे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह निवडण्यात आले, कारण हे दाखवते की किती अडचणी आल्या तरी, राष्ट्रवादी त्यांच्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहील. ही पार्टी सामान्य माणसाच्या विचारांचे प्रतिनिधित्व करते.
७) अखिल भारतीय तृणमूल कांग्रेस (एआईटीएमसी)
स्थापना – २०१६, निवडणूक चिन्ह – जोहरा नावाचे गवती फूल
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये निवडणूक आयोगाने ह्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. त्याचे चिन्हं दोन गवतातील फुलांचे आहे, आणि त्यात राष्ट्रीय ध्वजाचे सर्व रंग समाविष्ट करण्यात आले. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाचा उद्देश ‘मां, माती आणि मनुष्य’ आहे. ते मातृभाषा आणि राष्ट्रवादी तत्वांचे प्रतिनिधित्व करते. ह्यावरून आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल की निवडणुकीच्या चिन्हांमागे प्रत्येक पक्षाची विचारधारा कशी आहे.