एक असं कॉलेज जिथे मिळते राजकारणाविषयी शिक्षण

788
Indian Institute of Democratic Leadership, iidl,education in politics, leadership

गेल्या काही वर्षात भारतीय राजकारणाचा चेहेरा झपाट्याने बदलत आहे, पूर्वीचे अनेक समज बदलत आहेत जसे की, राजकारणात उतरले की व्यक्तीगत प्रगती फार झपाट्याने होते. प्रसिद्धी, सत्ता, नाव, पैसा यांच्या जोरावर काहीही करता येते वगैरे. पण आजची पिढी बदलली आहे, त्यांची विचारसरणी बदलली आहे. ते प्रश्न विचारायला शिकले आहेत, करियरला महत्व देणारे आहेत. त्यांना भाबडेपणा मान्य नाही, टोकाचा आदर्शवाद सुद्धा आता ते नाकारायला शिकले आहेत, काम न करता फक्त कोणाच्याही मागे मेंढरा सारखे जात नाहीत.

व्यापार, नोकरी यातून उत्तम आर्थिक प्राप्ती करून घ्यावी याकडे ह्या पिढीचा कल आहे, यातून त्यांची व्यक्तीगत उन्नती नक्कीच होते. पण काही लोकांना आतून एक आग असते, जी त्यांना कधीच शांत बसू देत नाही, त्यांना देशासाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असते. परंतु स्वतः च्या नोकरी, उद्योगातून पुरेसा वेळ मिळत नाही, त्यांना हे समजले पाहिजे की त्यासाठी त्यांनी आता पूर्णवेळ राजकारणातच आले पाहिजे. सर्व स्तरातील न्याय मिळवून देण्याची शक्ती फक्त आणि फक्त राजकीय सत्तेत असते आणि जर चांगली शिकलेली माणसे राजकारणापासून दूर राहिली तर मग बदल कसे आणि कोण घडवणार ? राजकीय इच्छाशक्ती विषयी त्यांचा अजेंडा जर क्लिअर असेल तर राजकारणाद्वारेच फक्त समाजपरिवर्तन शक्य आहे.

Indian Institute of Democratic Leadership, iidl,education in politics, leadership
Indian youth (Source – youthkiawaaz.com)

आज सगळी निर्णयप्रक्रिया राजकारणात होते, लोकप्रतिनिधी म्हणून देशाची खूप मोठी जवाबदारी त्यांच्या कडे असते. लोकांचे, समाजाचे आणि शेवटी संपूर्ण देशाचे भले करण्याची इच्छा असेल तर ध्येयवादी राजकारण हा अतिशय प्रभावी मार्ग आहे आणि त्यावरूनच जाऊन व्यवस्थेत बदल करता येतात. पण त्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरण्याची गरज आहे, नाही-नाही मी पैश्याची तयारी म्हणत नाहीये, आता ते दिवस गेले पैसे ओतले की सेट झाले. आता गरज आहे शिक्षणाची, अतिशय योग्य पद्धतीने व्यवस्था समजून घेण्याची आणि ह्यातूनच तुम्ही राजकारण-समाजकारणात एक पूर्णवेळ करियर करू शकता.

आपला भारत देश हा जगातला सर्वात तरूण देश म्हणून ओळखला जातो, त्या बरोबरच बुद्धीमत्ता आणि कर्तबगारी ह्यांची खाण म्हणजे आपला भारत देश आहे. तरीही आपल्याकडील राजकारण हे मात्र जातीपाती, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता, अन्याय, गरीबी, पुरूषी वर्चस्व या मुद्यांवर असते. यावर मात करण्याची ताकद फक्त प्रशिक्षणामधून घडलेल्या राजकारणी आणि समाजकारणी लोकांमध्ये असू शकेल, त्यातूनच प्रबोधन आणि सत्ता परिवर्तन आणि खऱ्या अर्थाने लोकशाही राबवली जाऊ शकते.

सुशिक्षित तरूणांनी राजकारणात आलं पाहिजे, खऱ्या अर्थाने विकासाचं राजकारण करण्यासाठी त्यांनी राजकीय प्रदूषण हटवले तर पुढच्या अनेक पिढ्या खऱ्या अर्थाने प्रगत आणि सुरक्षित होतील. एक दिवस आपला देश महासत्ता असेल, सामाजिक अन्याय दूर होऊन आजचं राजकारणाचं वाईट आणि गढूळ चित्र बदलेलं असेल, १२१ कोटींच्या विविधतेत एकता असलेल्या भारताला योग्य दिशा मिळेल कारण सर्वांना एकत्र आणणे हे पण एक कौशल्य आहे जे योग्य व्यवस्थापन शास्त्र शिकून आपण आत्मसात करू शकतो. योग्य दिशेने केलेले प्रयत्न आपल्याला नक्कीच बदल घडवण्यात महत्त्वाचे ठरतील.

Indian Institute of Democratic Leadership, iidl,education in politics, leadership
(Source – IndianFolk)

इतिहासात थोडे डोकावून पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की, मनुष्याचा प्रवास कायम “चांगल्याकडून अधिक चांगल्याकडेच असाच झाला आहे”, नेहमी सकारात्मक जे घेता आलं ते घ्यावे. खरंतर उत्तम करियरचे हे ऑप्शन का आपल्या लिस्ट मध्ये नसतात ? कायम इंजिनीयर, डॉक्टर, सी ए हेच आपण करियर ध्येय म्हणून का बघतो?

एक अतिशय ध्येयवादी परिपुर्ण प्रशिक्षित प्रोफेशनल राजकारणी म्हणून या क्षेत्रात उडी मारा, हो उडी मारा कारण, समाजकारण किंवा राजकारण हे क्षेत्र अत्यंत धकाधकीचे आहे. खूप तीव्र स्पर्धा इथे आहे, तितकीच जोखमी पण आहे. खूप आव्हाने आहेत, पण म्हणूनच या क्षेत्रात तरुणांनी पुर्ण तयारीनिशी पडण्याची गरज आहे. मनाशी ध्येयवाद घेऊन या, उत्कृष्ट काम करा, यातून लोकांना मदत करण्याचे समाधान तुम्हाला मिळेल.

तर ह्या क्षेत्रात प्रभावी काम करण्यासाठी, तुम्हाला ह्या सगळ्यात टिकून राहण्यासाठी भारताची सामाजिक आणि राजकीय व्यवस्था यांचे सखोल ज्ञान असायला हवे. त्यासाठी तुमच्यात या गोष्टी असायला हव्यात.

• समाजमानस ओळख
• लोकांमध्ये वावरताना घ्यायची जवाबदारी
• निर्णयक्षमता
• लीडरशिप क्वालिटी
• वेळेचे व्यवस्थापन
• आपत्कालीन परिस्थिती ची जाणीव आणि व्यवस्थापन

Indian Institute of Democratic Leadership, iidl,education in politics, leadership
Indian Institute of Democratic Leadership (Source – Twitter)

इत्यादी अनेक गोष्टीचे प्रशिक्षण तुम्हाला आवश्यक आहे. हे सर्व आणि अजून भरपूर बारीकसारीक गोष्टी लक्षात घेऊन ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप’ (आय आय डी एल) ह्यांनी एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स तयार केला आहे, ह्या कोर्सच्या माध्यमातून तरुण त्यांचे राजकारण हे पूर्णवेळ करियरचे स्वप्न पूर्ण करू शकतात. फक्त राजकारणीच नाही तर ज्यांना स्वतः चे NGO सुरू करायचे आहे, सामाजिक कार्य करायचे आहे, ज्यांना सिव्हिल सर्विसेस मध्ये करियर करायचे आहे, ज्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या राजकारण, व्यवस्था, समाजकारण ह्या सर्वांमध्ये काम करायचे आहे त्या सगळ्यांसाठी हा कोर्स एक उत्तम दालन उघडून देईल.

Amit Shah at IIDL

कोर्स बद्दल अधिक माहिती आपल्याला त्यांच्या संकेतस्थळा वर मिळेल www.iidl.org.in

तसेच संपर्कासाठी पत्ता खालील प्रमाणे,

1) Mumbai
Devendra Pai
Course Director, IIDL
+91 89286 50979
IIDL campus
RMP Knowledge Excellence Centre
Keshav Srushti, Essel World Road,
Uttan, Bhayander West,
Thane 401106, Maharashtra.

2) New Delhi
Rajesh Kumar (Rajan)
Co-ordinator – Admin and Events, RMP – Delhi
+91 9717 936 768
RMP Delhi Office
136 North Avenue,
New Delhi
110001

iidl@rmponweb.org
www.iidl.org.in