सीबीआय.. गृहमंत्रीपद… चिदम्बरम आणि अमित शाह, ९ वर्षांनी तीच परिस्थिती

999

आयएनएक्स मीडियाच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांना अटक होण्याची शक्यता आहे. चिदंबरम यांनी अटकपूर्व जामिनासाठी काल दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण उच्च न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला त्यामुळे चिदंबरम अडचणीत आले आहेत. पण या गोष्टीचा संबंध अमित शहा यांच्याशी जोडून सोशल मीडियात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

चिदंबरम आणि शहा यांचा योगायोग

काँग्रेस सरकारच्या काळात २०१० च्या दरम्यान चिदम्बरम हे केंद्रीय गृहमंत्री होते त्याचवेळी अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते. त्यावेळी अमित शहा यांच्यावर सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी आरोप ठेवत त्यांना कोर्टात खेचण्यात आलं होत. दोनवेळा समन्स बजावूनही अमित शहा हजर राहिले नव्हते. शेवटी शहांवर आरोपपत्र दाखल करून अटक करण्यात आली होती. अमित शहा यांनी कोर्टात अटकपूर्व जामीन दाखल केला होता पण त्यांचाही जामीन न्यायालयाने फेटाळला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता चिदम्बरम यांच्या बाबतीत झाली अन आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आहेत.

यांसंदर्भात पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक वर्तुळ पूर्ण झाले असे ट्विट केले आहे, त्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here