रेडिओमध्ये काम करणारा आयुष्यमान करोडो लोकांच्या हृदयावर कसा राज्य करू लागला ?

1207
ayushmann khurrana wife, ayushmann khurrana movies, ayushmann khurrana family, tahira kashyap, Ayushmann Khurrana biography, Ayushmann Khurrana life story, ayushman khurana roadies, आयुष्यमान खुराणा, आयुषमान खुराणा बायोग्राफी, ayushman khurana wikipedia, infobuzz, bollywood actors

एक ऍक्टर, गायक, लेखक, अँकर, व्हिडीओ आणि रेडिओ जॉकी अश्या अनेक खुबीया पाळणाऱ्या आयुषमान खुराणा बद्दल जाणून घेऊया.

आज आपण एका अश्या व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत जो एक-दोन नव्हे तर अनेक गोष्टींमध्ये तरबेज आहे. याच टॅलेंटच्या जोरावर त्याने समाजामध्ये आपले नाव कमावले आहे. तुम्ही बरोबर ओळखलंत आपण बोलत आहोत एक ऍक्टर, गायक, लेखक, अँकर, व्हिडीओ आणि रेडिओ जॉकी अश्या अनेक खुबीया पाळणाऱ्या आयुषमान खुराणा बद्दल.

चित्रपटाचे हटके विषय आणि आयुषमानच्या एका पेक्षा एक भूमिका, या दोन गोष्टींमुळे आयुषमाणची एक वेगळी ओळख आहे. आयुषमान खुराणा च्या अनेक भूमिका लोकांमध्ये बदल घडवून आणायचे काम करतात. अभिनयासोबतच आयुषमानच्या आवाजाचे सुद्धा लोक दिवाने आहेत. त्याच्या याच टॅलेंटच्या जोरावर आयुषमान खुराणा (Ayushmann Khurrana) एक यशस्वी कलाकार बनला आहे पण इथे पोहोचण्याकरिता त्याला किती मेहनत घ्यावी लागली हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे आजच्या या लेखातून आपण आयुषमानच्या आजपर्यंतच्या प्रवासाची एक झलक बघणार आहोत. बघुयात एका साधारण घरातील मुलगा आज करोडो लोकांच्या हृदयावर कसा राज्य करू लागला ते……

बालपण आणि शिक्षण

या गोष्टीची सुरवात पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी होते. १४ सप्टेंबर १९८४, या दिवशी आयुषमाणचा जन्म झाला. दुःखाची गोष्ट हा आहे कि आयुषमानच्या जन्माआधी त्याच्या आईला ५ वेळा गर्भपात झालेला. त्यामुळे आयुषमानचा जन्म झाल्यानंतर सगळेच त्याचा खूप लाड करायचे. आयुषमान सांगतो कि अभिनयाचे वेड त्याला लहानपणापासूनच लागलेले कारण त्याची आजी आयुषमानला वेगवेगळ्या हिरोंची गोष्ट सांगत असे. आयुषमानने आपले शालेय शिक्षण गुरुनानक पंजाबी मिडीयम स्कुल मधून पूर्ण केले तर DAV कॉलेज चंदिगढ मधून मेडिकल क्षेत्रात आपले पुढचे शिक्षण घेतले. या सोबतच स्कुल ऑफ कम्युनिकेशन स्टडीज मध्ये आयुषमान खुराणा ने Mass Communication मध्ये आपली मास्टर डिग्री घेतली आहे.


Ayushmann Khurrana Childhood Pics (Source – bisognieducativispeciali.info)

आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयुषमानने जवळपास ५ वर्ष एक थेटर आर्टिस्ट म्हणून काम केले. एवढेच नाही तर अनेक पथनाट्यांमध्ये सुद्धा त्याने भाग घेतलेला. या दरम्यान अनेक स्पर्धा जिंकून मेडल्स देखील मिळवले.

करियर

वयाच्या केवळ १७ व्या वर्षी “Channel V” वरील पॉपस्टार नावाच्या एका शोमध्ये सुद्धा आयुषमान झळकलेला. पण या कार्यक्रमात तो आपली चमक दाखवू शकला नाही. त्यानंतर २००४ साली झालेल्या MTV Roadies मध्ये आयुषमानने भाग घेतला आणि MTV Roadies चा विजेता देखील ठरला. यानंतर लोक आयुषमान (Ayushmann Khurrana)ला चांगल्या प्रकारे ओळखू लागले आणि इथून त्याच्या खऱ्या प्रवासाची सुरवात झाली. Big FM मध्ये आयुषमानला एक DJ म्हणजेच Disk Jockey ची नोकरी मिळाली. तेव्हा आयुषमान ‘मान ना मान मै तेरा आयुषमान’ हा शो देखील होस्ट करायचा.

Ayushman khurana in roadies (Source – voot.com)

पण मल्टी टॅलेंटेड आयुषमान एका ठिकाणी थांबतोय कुठे. त्याने एक पाऊल पुढे टाकायचे ठरवले आणि Big FM ची नोकरी सोडली. आयुषमान नंतर MTV च्या अनेक कार्यक्रमात एक VJ म्हणजेच Video Jockey म्हणून दिसू लागला. MTV वर Video Jockey म्हणून MTV The Voice of Youngistaan सारख्या अनेक शो मध्ये दिसू लागला. बऱ्याच काळ MTV वर काम केल्यामुळे लोक आयुषमान खुराणा ला ओळखू लागले. त्याचा हटके अंदाज आणि वाढती लोकप्रियता बघून आयुषमानला मोठ्या चॅनेल कडून होस्टिंग म्हणजेच अँकरिंग करण्यासाठी बोलावणे येऊ लागले. आयुषमानने Colors Tv वरील India’s Got Talent तसेच स्टार प्लस वरील Just Dance सारखे अनेक मोठे कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. याव्यतिरिक्त IPL च्या तिसऱ्या पर्वात देखील आयुषमानने अँकरिंग केलेली.

बॉलिवूडमध्ये एंट्री

एक अँकर आणि Video Jockey म्हणून आयुषमानने बरीच सफलता मिळवली होती पण त्याचे स्वप्न असलेल्या बॉलिवूडमध्ये काम करायची अजून संधी देण्यात आली नव्हती. पण अभिनेता बनण्याची तगडी इच्छा असल्याने त्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. शेवटी २०१२ मध्ये शुजीत सरकारच्या विकी डोनर या चित्रपटात लीड ऍक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच चित्रपटातून आयुषमान लोकांच्या मनावर राज्य करू लागले. याच चित्रपटात आयुषमानने ‘पाणी दा रंग’ हे गाणे गायले होते आणि त्याच्या गाणाच्या शैलीचे लोक दिवाने झाले होते, बऱ्याच काळापर्यंत लोकांच्या तोंडावर हे गाणे होते. विकी डोनरमधील आयुषमानचा अभिनय आणि गायन बघून त्याला Filmfare Award for Best Male Debut आणि Filmfare Award for Best Male Playback Singer सारखे अनेक अवॉर्ड मिळाले. यानंतर सुरु झाले आयुषमान पर्व. आयुषमानने विकी डोनर सोबतच दम लगाके हैशा, बरेली कि बर्फी, अंधाधुन आणि आत्ताचा बधाई हो सारखे अनेक उत्तम चित्रपट (Ayushmann Khurrana movies) आपल्याला दिले.

Ayushman Khurana (Source – The Pioneer )

आयुषमानच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास आयुषमानने आपली लहानपणीची मैत्रीण ताहिरा कश्यप (Ayushmann Khurrana wife) सोबत लग्न केले आणि त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. आयुषमान आणि ताहिराच्या मुलाचे नाव विराजवीर आहे तर मुलीचे नाव वरुष्का आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here