IIM, IISc संस्थांमधील विद्यार्थी भाजप खासदारांचे इंटर्न

ABVP अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. आज राजकारणातील अनेक दिग्गज कधीकाळी ह्याच संघटनेचे सदस्य होते. राजकारणातील ह्या दिग्गजांची राजकीय कारकीर्द घडवण्यात अभाविपचा मोठा वाटा आहे.

ह्याच ABVP ने काही काळापूर्वी एक उपक्रम हाती घेतला होता जो मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला पाहायला मिळाला. देशातील प्रतिभावान व वेगवेगळ्या क्षेत्रांतील तरूणांना एकत्र आणून त्यांच्यात राष्ट्र सर्वप्रथम (Nation-First) हि भावना रुजवणे, ह्या एकत्र आणलेल्या तरुणांना एक हक्काचे आणि सक्षम असे व्यासपीठ उपलब्ध करून देणे व त्याद्वारे ह्या तरुण विद्यार्थ्यांमधील टॅलेंट आणि क्षमतेला जास्तीतजास्त विकसित करणे, आणि त्याचा देशाच्या प्रगतीसाठी, पुनर्निर्माणासाठी वापर करून घेणे ह्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पुढाकार घेतला होता.

IIM, IISc, ABVP, PACTIC MEDIA CONCEPT, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, थिंक इंडिया, डिजिटल मार्केटिंग, Digital Marketing, BJP IT Sell,  BJP MPs as interns
Source – Google

त्यासाठी त्यांनी थिंक इंडिया हि मोहीम राबवली होती. ह्या मोहिमेत देशातील नामवंत व सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमधून ६०० विद्यार्थ्यांकडून ह्या थिंक इंडिया मोहिमेसाठी आवेदने मागविण्यात आली होती. ABVP च्या या थिंक इंडिया कामात पुण्यातील नामवंत डिजिटल मार्केटिंग संस्था Pactic Media Concepts ने तांत्रिक बाजू सांभाळली आहे.

भाजपचे संसदीय सचिव बालसुब्रमण्यम कामरसु ह्यांनी सांगितले कि ह्या विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास, संशोधन व त्यांनी पुरविलेली बहुमूल्य माहिती ह्याचा खासदारांना संसदेत काम करताना खूप उपयोग झाला. संसदेत देण्यात येणारे खासदारांचे भाषण असो किंवा विविध प्रश्नांवर संसदेत आयोजित करण्यात येणारी चर्चासत्र असो, खासदारांच्या कामकाजात ह्या विद्यार्थ्यांनी केलेले काम प्रतिबिंबित होत आहे असे बालसुब्रमण्यम कामरसु ह्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कि,

IIM, IISc, ABVP, PACTIC MEDIA CONCEPT, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, थिंक इंडिया, डिजिटल मार्केटिंग, Digital Marketing, BJP IT Sell,  BJP MPs as interns
Source – Google

विशेषतः २ वेळा हे प्रकर्षाने जाणवून आले कि ह्या विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत खासदारांच्या संसदीय कामकाजात दिसून येत आहे. एक म्हणजे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी आणि केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी. अभाविपने राबवलेल्या थिंक इंडिया ह्या उपक्रमाचा फायदा फक्त खासदारांना काम करतानाच झाला असे नाही तर त्या विद्यार्थ्यांनाही ह्याचा खूप फायदा झाला कारण ह्या ४० विद्यार्थ्यांमधील अनेकजण सिविल सर्विसेसची तयारी करत आहेत.


आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here