मुस्लीम लोक म्हणत आहेत ‘हज यात्रा बंद करा! काय आहे प्रकरण

हज यात्रा, हज यात्रा विरोध, मुस्लिम, हज यात्रेवर बहिष्कार, boycott mecca, boycott hajj, mohammed-bin-salman, hajj yatra

आयुष्यात एकदा तरी हज यात्रा व्हावी म्हणून झटणारे मुस्लिम अचानक याला विरोध का करत आहेत?

भारतातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक मुस्लिमासाठी हज यात्रेचं महत्व किती आहे हे सर्वांनाच माहित आहे. आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा घडावी अशी प्रत्येक मुस्लिमांची इच्छा असते, पण ह्याच हज यात्रेला काही मुस्लिम देशांनी विरोध करायला सुरुवात केली आहे.

आधी सौम्य असणारा विरोध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. ह्या विरोधाचे कारण आहे सध्या सौदीत सुरु असणारा अंतर्गत कलह आणि वाद. ह्या वादाचे मुख्य कारण आहे सौदीचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान ह्यांनी घेतलेले काही निर्णय.

Source – Google

सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान ह्यांनी घेतलेल्या काही निर्णयांना तेथील काही धार्मिक संघटना व काही मुस्लिमांचा विरोध आहे. ह्या विरोधातूनच हज यात्रेवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ह्या विरोधाला अजूनच धार चढली आहे ती लिबियातील प्रसिद्ध मुस्लिम मौलवी मुफ्ती सादिक अल – घरीआनी ह्यांच्या विरोधामुळे. मुफ्ती सादिक ह्यांनी सुद्धा हज यात्रेला विरोध केला आहे व त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.

लिबियाच्या ह्या प्रसिद्ध मुफ्तीने का केली हज यात्रेवर बहिष्कार घालण्याची मागणी

हज यात्रा हि मुस्लिम धर्माच्या व्यक्तीसाठी जितकी महत्वाची आहे तितकीच ती सौदी अरेबियाच्या आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे. कारण दरवर्षी होणाऱ्या हज यात्रेमुळे सौदी अरेबियाच्या गंगाजळीमध्ये घसघशीत वाढ होते व ह्या पैशांचा उपयोग दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातो असा आरोप मुफ्ती सादिक अल घरीआनी ह्यांनी केला आहे.

ह्या यात्रेतून मिळणाऱ्या पैश्यातून शस्त्र खरेदी केली जाते व लिबिया, ट्यूनेशिया, अल्जेरिया, सुदान ह्या देशांमध्ये दहशत पसरवली जाते. त्यामुळे हज यात्रेला मुफ्ती सादिक ह्यांनी विरोध केला आहे.

Source – Google

एका रिपोर्टनुसार सौदी कडून पुरवण्यात येणाऱ्या बॉम्बचा वापर येमेनमध्ये हजारो निरपराधांची हत्या करण्यासाठी करण्यात येत आहे. ह्या रिपोर्टनुसार सौदीमध्ये दहशतवादासंबंधी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे ह्या हज यात्रेवरील बहिष्काराची मागणी जोर धरत आहे व हि मोहीम ट्विटरवर देखील उघडली गेली आहे. #boycotthajj हा ट्रेंड ट्विटरवर चांगलाच जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here