लोकांना प्रगतीपुस्तकावरील मार्कांची जितकी भीती वाटत नव्हती, तितकी भीती आपला CIBIL Score बिघडण्याची वाटते. CIBIL स्कोर ? पहिल्यांदा नक्कीच ऐकत नाही आहात तुम्ही हा शब्द पण मनात प्रश्न अनेक उभे असतील, सोप्या भाषेत जाणून घ्या तुमच्या ‘क्रेडिट पॉईंट्स’ किंवा ‘पत क्रमांक’ बद्दल.
तुमची पत काय हो ? म्हणजेच ऐपत किती असं कोणी विचारलं तर काय होणार ?
आहे त्या पेक्षा कणभर जास्तच स्तुती तुम्ही स्वतः ची करणार, पण पैश्याच सोंग आणता येत नाही हे अगदी शब्दशः खरे आहे. तुम्ही एखाद्या बँकेकडे जाता आणि लोनसाठी अँप्लिकेशन देता, साधारण २००१ पूर्वी तुम्हाला उत्पन्न दाखला, स्थावर मालमत्ता, जवाबदारी किती डोक्यावर वगैरे जुजबी गोष्टी बँकेत द्याव्या लागत, ज्यावरून लोन ऑफिसर ठरवत असे की तुमची पत काय. म्हणजेच दिलेले लोन तुम्ही योग्य वेळी परत करू शकणार का नाही ते.
आता ह्यात लोक अतिहुशार झाले होते, एकाच वेळी वेगवेगळ्या बँकेतून लोन घेऊ लागले, काही रक्कम थकवू लागले, बँक खाते बुडीत निघू लागले. त्यामुळेच एका व्यक्तीचा पूर्ण आर्थिक इतिहास माहीत असणे बँका, पतसंस्था, इतर भांडवलदार, क्रेडीट कार्ड देणाऱ्या कंपन्या यांच्यासाठी अतिशय गरजेचे झाले. कारण शेवटी तुमच्या कडून मिळणारे व्याज हेच या सर्वांचे मुख्य उत्पन्न असते आणि तुम्हाला दिलेलं लोन हे इतर लोकांच्या FD आणि ठेवींमधूनच दिलेले असते, त्यांचे पैसे बँकेला ठराविक काळात परत द्यायचे असतात.
अश्या एक व्यक्तीचा सर्व आर्थिक आणि सामाजिक इतिहास यांचा अभ्यास करून प्रत्येक माणसाला काही मार्क किंवा पॉईंट्स दिले जातात तेच असतात तुमचे ‘क्रेडिट पॉईंट्स’ आणि लोन देण्यापूर्वी प्रत्येक संस्था तुमचे हेच पॉईंट्स/स्कोर तपासून बघते. बँक स्वतः हि सर्व माहिती गोळा करून अभ्यास करण्याचे काम करू शकत नाही त्यामुळे ते काम दिले जाते क्रेडिट रेटिंग करणाऱ्या कंपन्याना.
तुमचा सिबिल स्कोअर/क्रेडिट स्कोअर चेक करा
क्रेडिट स्कोअर एखाद्या व्यक्तीची क्रेडिट योग्यता सांगते. क्रेडिट स्कोर प्रामुख्याने क्रेडिट अहवालावर आधारित असतो. बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या म्हणजे कर्ज देणारे, ग्राहकांना पैसे देण्यामुळे किती जोखीम (risk) घ्यावी लागते याचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच बुडीत खात्यामुळे (bad debt) नुकसान कमीत कमी होण्यासाठी क्रेडिट स्कोअरचा वापर करतात.
क्रेडिट स्कोर वरून व्यक्ती बद्दल खालील गोष्टी ठरतात –
१) कर्जासाठी कोण पात्र आहे
२) व्याज दर किती असावा
३) क्रेडिट (लोन) मर्यादा किती मंजूर करावी
४) कोणत्या ग्राहकांकडून सर्वाधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे
फक्त बँकेच्या लोनसाठीच ह्या CIBIL स्कोरचा वापर होत नाही तर, फोन कंपन्या, मोबाइल फोन कंपन्या, विमा कंपन्या, जमीनदार आणि सरकारी विभाग ह्या CIBIL स्कोरचा वापर करून व्यक्तीची पत ठरवत असतात. ऑनलाइन कर्जदारांसारख्या डिजिटल फायनान्स कंपन्यादेखील व्यक्तीची योग्यता मोजण्यासाठी हा डेटा वापरत असतात.
भारतात कोण देऊ शकते तुम्हाला हा क्रेडिट स्कोर ?
भारतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून परवाना/लायसन्स मिळालेल्या एकूण चार क्रेडिट माहिती देणाऱ्या कंपन्या आहेत. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) ही कंपनी जानेवारी २००१ पासून क्रेडिट इन्फॉर्मेशन देणारी कंपनी म्हणून काम करत आहे. त्यानंतर २०१० मध्ये एक्सपीरियन, इक्विफॅक्स, सीआरआयएफ हाय मार्क यांना भारतीय रिजर्व बँकेने भारतात क्रेडिट माहिती पुरवणाऱ्या कंपन्या म्हणून काम करण्यास परवानगी दिली. जरी या चार क्रेडिट स्कोर कंपन्यांनी त्यांचे स्वतःचे क्रेडिट स्कोर विकसित केले असले तरी, भारतात सर्वात लोकप्रिय आहे तो सिबिल क्रेडिट स्कोर.
काय असतो CIBIL स्कोर?
CIBIL क्रेडिट स्कोर म्हणजे तीन अंकी नंबर असतो जो एका व्यक्तीचा क्रेडिट इतिहास आणि क्रेडिट रेटिंग दर्शवितो. हा स्कोर ३०० ते ९०० या दरम्यान असतो, ९०० म्हणजे सर्वोत्तम स्कोर. म्हणजे त्या व्यक्तीला पहिला नंबर मिळेल लोन मिळण्यासाठी, कमीतकमी ७५० क्रेडिट स्कोर असेल तरच तुम्ही लोन मिळायला पात्र होता. तुमचा स्कोर खराब असेल तर तुम्ही जोखीम आहात म्हणून तुमचे व्याजदर जास्ती ठेवले जातात, कमीतकमी व्याजदरात तुम्हाला लोन हवे असते तर हा स्कोर कायम चांगला ठेवणे गरजेचे आहे, त्यासाठी घेतलेल्या लोनचे हफ्ते अगदी वेळेवर भरले तर तुमचा स्कोर आपोआप सुधारतो म्हणजेच तुमची विश्वासार्हता वाढते, क्रेडिट/पत सुधारते.
तुमचा सिबिल स्कोअर/क्रेडिट स्कोअर इथे चेक करा
हा रिपोर्ट बनवायला CIBIL तुम्ही याआधी घेतलेल्या सर्व लोन बद्दल माहिती मिळवते (पर्सनल, एज्युकेशन, कार, होम इत्यादी सर्व) त्याची परतफेड तुम्ही वेळोवेळी केली आहे की नाही ते तपासते, तसेच तुमचे उत्पन्न किती स्थिर आहे तेही बघितले जाते. CIBIL Credit Score तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो आणि सहसा क्रेडिट रेटिंग करण्यासाठी व्यक्तीच्या १८ ते ३६ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचा अभ्यास करावा लागतो.
कुठून मिळेल हा क्रेडिट स्कोर ?
CIBIL ची वेबसाईट आहे जिकडे तुम्ही तुमचे काही डिटेल्स भरून तुमचा स्कोर मिळवू शकता, काही वेबसाईटवर हे स्कोर मोफत काढून दिले जातात. सगळे बँक खाते आता आधारकार्ड आणि पॅन कार्डला जोडल्या मुळे, तुमच्या एका नंबर वरून तुमच्या सर्व बँक खात्यातील माहिती आता सहज उपलब्ध होते, सगळ्या बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवता येतं एवढंच नाही तर बँकेचे बुडीत खाते हे प्रमाण सुध्दा कमी होऊ लागले आहे. तुमचा सिबिल स्कोअर/क्रेडिट स्कोअर चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
भविष्यात मोठे भांडवल लागणार असेल तर आजच तुमचा स्कोर सुधरवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी फक्त चालू लोनचे हफ्ते वेळेत भरा आणि स्कोर चांगला राखा, कारण क्रेडिट रेटिंग कंपन्या तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत !