१४ हजार फुटांवर केला युद्ध सराव
कलम ३७० हटवल्यांनंतर भारत आणि पाकिस्तान संबंधात तणाव निर्माण झाला आहे. असं असतानाच पाकिस्तानची बाजूने नेहमी असणाऱ्या चीनने आता भारताविरुद्ध युद्धाची तयारी सुरु केली आहे. सैनिक म्हणून चक्क रोबोटचा वापर करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. नुकताच या ‘रोबो सोल्जर’चा सराव ‘पश्चिमेला असणाऱ्या शेजारी देशाच्या सीमेजवळच्या बर्फाच्छादित पठारावर’ घेतल्याचे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यांनी सांगितले आहे. मात्र नक्की हा सराव कोणत्या प्रदेशामध्ये पार पडला याबद्दलची माहिती स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी १४ हजार फुटांवर असणाऱ्या पठारावर अनेक दिवस हा सराव सुरु होता अशी माहिती सरकारी प्रसारमाध्यांनी दिली आहे.
सामान्यतः चीन त्यांच्या लष्करी सरावांची माहिती कधीही जाहीर करत नाही. याप्रकारे उंच ठिकाणी सराव करण्याची चीनची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी किंघाई-तिबेट पठारावर करण्यात आलेल्या लष्करी सरावा बद्दल चीनने पहिल्यांदाच माहिती दिली होती. त्याआधी २०१७ मध्येही चीनने डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर याप्रकारचा युद्ध सराव केला होता.