भगवान गौतम बुद्ध..! इसवी सनाच्या आधी कितीतरी वर्ष अगोदर जगाला शांतीचा संदेश देणारा हा महात्मा. बुध्दाचा मार्ग हा जेवढा शांततेचा आहे तेवढाच तर्कशील व कृतीशील म्हणुन ओळखला जातो. म्हणुन की काय जगातील कित्येक देश बुध्दांच्या या तत्वज्ञानावर वाटचाल करतं असतात. बुध्दांची शिकवण एवढी तिव्र व पटण्यासारखी होती की जगातील सर्वात कृर व महत्वकांक्षी समजला जाणारा सम्राट अशोकाचं मन परिवर्तन होऊन त्याने शांततेचा मार्ग अवलंबला व एक काळ असा सुध्दा होता की संपुर्ण भारत हा बुध्दमय होता. पण याच बुध्दांची जन्मभुमी तिबेट ही स्वतःला बौद्ध देश म्हणवून घेणाऱ्या चीनच्या अत्याचारांना त्रासली होती, काळ होता इ.स 1959 सालचा.
तिबेटच्या धर्मगुरूंना “दलाई लामा” म्हटलं जातं आणि या धर्मगुरूंना जगातील सर्व बौध्द समाजात प्रचंड प्रतिष्ठा व मान असतो. पण या काळात बौध्दांची भुमी असलेल्या या पवित्र भुमीवर चलाख चीन आपलं वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होतं व दलाई लामांना आपले आश्रयीत म्हणुन ठेवून घेण्याचा डाव चीनचा होता. पण तिबेटच्या नागरिकांना व खुद्द दलाई लामांना तिबेट चीनच्या हाती जाऊ द्यायचा नव्हता. त्यांना तीबेटला स्वतंत्र ठेवायचं होतं. पण चीन तिबेटच्या शांतताप्रिय स्वभावाचा गैरफायदा करून तिबेटच्या नागरिकांवर जबरदस्ती करतं होते. पण हे दलाई लामांना मान्य नव्हतं.
तिबेटचे दलाई लामा हे उच्च शिक्षित व राजकिय क्षेत्राची जाण असणारे होते. त्यांनी चीनला कित्येक वेळा विनवण्या केल्या पण चीन ऐकण्यास तयार नव्हते. चीनने तर दलाई लामा यांना ‘तिबेट चीन मध्ये नाही आला तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो’, अशी अप्रत्यक्ष धमकीच दिली होती. दलाई लामांना काही तरी हालचाल करणं गरजेच झालं होते. कारण संपुर्ण तिबेटच्या नागरिकांचे भविष्य त्यांच्या हाती होते. दलाई लामा यांना तिबेट मधुन पलायना करण्याशिवाय पर्याय नव्हता, नाहीतर त्यांच्या जीवाला धोका उद्भवला असता.
दलाई लामा यांनी त्या काळी भारताचे पंतप्रधानांना पत्र लिहून भारताकडे आश्रयाची विनंती केली आणि भारताने ती मान्य देखील केली. पण याची चुनूक चीनला लागली. चीनी सैन्याच्या जवानांचा कडवा पहारा तिबेट भोवती लावला गेला. या सर्व परिस्थितीतुन दलाई लामा यांना सुखरूप बाहेर काढणं हे सोप्प काम नक्कीच नव्हते. त्यांच्या सहकार्याच्या मदतीने ते तिबेट मधुन बाहेर पडले. तब्बल तीन दिवसांच्या प्रवासानंतर मागावर असलेल्या चीनी सैन्याला चकवा देत दलाई लामा यांनी भारताच्या पवित्र भुमीवर पाय टाकला. दोन दिवसानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांची भेट प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी घालुन दिली.
भेटीच्या वेळी दलाई लामा यांनी भारताकडे तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. पण पंडीतजींनी त्याच वेळी दलाई लामा यांना सांगितलं की तिबेटला स्वातंत्र मिळवून देण्यास भारत काहीही मदत करू शकत नाही. त्याकाळी चीन आणि भारताचे संबंध सुध्दा भलतेच चीघळले होते. त्यामुळे नेहरूंचा असा दावा होता की तिबेटचा प्रश्न हा चीन सोबत चर्चा व संवाद करूनचं सुटू शकेलं.
परिणामी नेहरूंनी त्यावेळी तिबेटची मदत नाही केली. पण नंतर चीनने तिबेट वर आपले वर्चस्व स्थापन केले आणि तिबेटचा हा प्रश्न अजून सुध्दा न सुटलेलं एक कोडं बनुनं राहिलाय. आपल्या भारताकडे अश्रयीत म्हणुन आलेले दलाई लामा यांना शांतीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आणि चीनच्या पोटातील डोकेदूखी वाढली. जगाला शांतीचा संदेश देणारे धर्मगुरू, चीनला मात्र अशांतीचं कारण वाटतात. दलाई लामा यांच्या अरूणाचल प्रदेश दौर्यामुळे देखील चीन खुप अस्वस्थ झाला होता आणि त्यांच्या ह्या दौर्याला चीनचा विरोध होता.
या सगळ्या परिस्थितीमुळे आधीच चीनसोबत बिघडलेले संबंध भारतासोबत आणखीनच ताणले गेले. दलाई लामांना भारताने आश्रय दिल्यामुळे चीनच्या अजूनही कुरापती चालूच आहेत.