हनुमानाची भूमिका अजरामर करणाऱ्या दारा सिंग यांचे हैराण करून टाकणारे किस्से

dara singh height, dara singh image, dara singh son, vindu dara singh, dara singh movie, king kong wrestler, dara singh diet, dara singh wwe, dara singh biography, dara singh in marathi, Dara Singh Randhawa, Indian wrestler, ramayana, hanuman, dara singh brother, दारा सिंग, दारा सिंग मराठी माहिती, दारा सिंह किस्से, दारा सिंग बायोग्राफी

“हमारी उमर में झट से पता चल जाता हैं, की इक लडका और लडकी में क्या चल रहा है”, जब वी मेट चित्रपटातले गित म्हणजेच करीना कपूरचे आजोबा गित आणि आदित्यला सतत बजावत असतात. त्या वयातही तो आवाज दमदार असतो. त्यांचा दरारा त्या आवाजात दिसतो. त्या आवाजासोबत नावातही दराराच होता. ते नाव म्हणजे दारा सिंग रंधावा, खरं नाव दिदार सिंग रंधावा.

१९ नोव्हेंबर १९२८ ला ब्रिटिश भारताच्या अमृतसरजवळच्या धर्मुचक गावी, पंजाब मध्ये त्यांचा जन्म झाला. पैलवाम ते फिल्म अभिनेता असा त्यांचा प्रवास मजेशीर आहे आणि हा माणुसही ५३ इंची छातीचा आणि जिगराचा होता. अवघ्या १२ व्या वर्षीच त्यांच लग्न झाले. हो कारण त्या वेळी एवढ्या वयातच लग्न करावे लागे. नंतर त्यांना गावातल्या एका पैलवानाच्या प्रेरणेने पैलवानी आणि कुस्ती करण्याची इच्छा झाली. पण मध्येच त्यांना सिंगापूरला जाण्याची संधी मिळाली कारण त्यांच्या कुटुंबाचे येणे जाणे होते.

dara singh height, dara singh image, dara singh son, vindu dara singh, dara singh movie, king kong wrestler, dara singh diet, dara singh wwe, dara singh biography, dara singh in marathi, Dara Singh Randhawa, Indian wrestler, ramayana, hanuman, dara singh brother, दारा सिंग, दारा सिंग मराठी माहिती, दारा सिंह किस्से, दारा सिंग बायोग्राफी
dara singh height, dara singh image (Source – theprint.in)

सिंगापूरमध्ये एका ड्रमच्या कारखान्यात काम करायला त्यांनी सुरुवात केली पण कुस्ती काही डोक्यातुन जात नसायची. सिंगापूर मधल्या भारतीय मित्रांनी त्यांना पैलवानीचे स्वप्न पूर्ण करण्याचा आग्रह धरला. त्यांच्या काकांनीही सांगितले की तुझ्या मनात असेल ते कर, मी तुला सगळी मदत करेल. मग दारा यांनी सिंगापूरच्या ग्रेट वर्ल्ड स्टेडियममध्ये आपली तालीम सुरु केली, खुराक वाढवला, दिवसाला १०० बादाम आणि १ किलो तुप असा खुराक त्यांनी सुरु केला.

२० व्या वर्षी ते ६ फुट उंच होते. पैलवानी सुरु केल्यानंतर त्यांनी जगभरातील स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. किंग कॉंगला त्यांनी चारलेली धुळ सर्व भारतीयांना आजही लक्षात आहे. सिंगापूर मध्ये त्यांनी चॅम्पियन ऑफ मलेशिया या स्पर्धेत चॅम्पियन तारलोक सिंगला हरवून तो किताब आपल्या नावे केला. त्यानंतर ते जगभरात गेले आणि तिकडेही जिंकले. १९५२ला दारासिंग भारतात परत आले. इथे आल्यावर त्यांनी टायगर जोगींदर सिंगला हरवुन रुस्तम-ए-हिंद हा भारतीय पैलवानीचा सर्वोच्च किताब जिंकला.

एव्हाना आता दारासिंगचं नाव आणि दरारा जगभर पोहोचला होता. १९५९ ला कॉमनवेल्थ गेम भारतात झाले. ह्या मध्ये जॉर्ज गार्डियांका ह्या वर्ल्ड चॅम्पियन व न्यूझीलंडच्या जॉन डिसील्वाने त्यांना खुले आव्हान दिले आणि ह्या दोघांनाही दारा सिंग यांनी धोबीपछाड दिला आणि त्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदकही जिंकले.

dara singh height, dara singh image, dara singh son, vindu dara singh, dara singh movie, king kong wrestler, dara singh diet, dara singh wwe, dara singh biography, dara singh in marathi, Dara Singh Randhawa, Indian wrestler, ramayana, hanuman, dara singh brother, दारा सिंग, दारा सिंग मराठी माहिती, दारा सिंह किस्से, दारा सिंग बायोग्राफी
(Source – isstonline.in)dara singh movie, king kong wrestler, dara singh diet

आता फक्त जिंकायची राहीली ती वर्ल्ड चॅम्पियनशिप. १९६८ साली मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सामन्यात त्यांनी लाउ थेस्जला हरवुन आपले हेही स्वप्न पूर्ण केले. आपल्या पैलवानी कारकीर्दीतला शेवटचा सामनाही ते जिंकले. त्यांना व्रेसलिंग ओबसर्वर ‘न्युजलेटर हॉल ऑफ फेम’ मध्ये व सन २०१८ मध्ये मरणोत्तर डब्ल्यू.डब्ल्यु. ई. (W.W.E) च्या हॉल ऑफ फेम मध्ये मान मिळाला आहे.

एकदा अशी अफवा उडाली की हा पैलवान दारा सिंग खरा दारासिंग नाहीए आणि खरा दारासिंग जेल मध्ये बंद आहे. त्याला जेल बाहेर आल्यावर हे कळाले तर त्याने दारासिंग यांना कुस्ती खेळण्याचे आव्हान दिले. ते समोरासमोर आले. खुप जंगी सामना झाला. नंतर कळाले की तो जेल मधला दारासिंग दुसर कुणी नसून तो दारा सिंग ह्यांचा भाउ रंधावा होता.

दारा सिंग अनेक चित्रपटात स्टंटसाठी प्रसिद्ध होते. ह्या उंच धिप्पाड माणसावर हिंदी सिनेमावाल्यांची नजर न पडली तरच नवल. त्यांना लवकरच सिनेमांसाठी विचारले गेले. तेव्हा सुरुवातीला त्यांनी नकार दिला कारण अभिनय त्यांनी कधीच केला नव्हता. तेव्हा दिग्दर्शक म्हणाले की फक्त कुस्तीचेच सिन द्या बाकी सर्व माझ्यावर सोडा. तो सिनेमा होता किंग कॉंग. ह्यानंतर त्यांना सिनेमे मिळत गेले.

एकदा त्यांना दुर्दशनवर सुरु होणाऱ्या रामायण ह्या मालिकेत हनुमानाच्या रोलसाठी विचारण्यात आले. दारांना आश्चर्य वाटले. कारण त्यांनी वयाची साठी ओलांडली होती. त्यांनी उत्तर देतांना निर्मात्यांना एखाद्या तरुण अभिनेत्याला ही भूमिका देण्याचे सुचवले. पण निर्माते दिग्दर्शक यांनी दारासिंग ह्यांच्यावरच विश्वास दाखवला आणि दारांनी हनुमान निभावलाच नाही तर गाजवला. इतका गाजवला की बऱ्याच लोकांकडे हनुमानाच्या फोटो म्हणून त्यांच्या महाभारतातील भुमिकेचा फोटो असायचा. आजही हनुमान म्हटले की की त्या काळी रामायण पाहणाऱ्या लोकांना दाराजीच दिसतात. नंतर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये अश्या पौराणिक भूमिका केल्या. हनुमान त्यात खासच राहीला.

dara singh height, dara singh image, dara singh son, vindu dara singh, dara singh movie, king kong wrestler, dara singh diet, dara singh wwe, dara singh biography, dara singh in marathi, Dara Singh Randhawa, Indian wrestler, ramayana, hanuman, dara singh brother, दारा सिंग, दारा सिंग मराठी माहिती, दारा सिंह किस्से, दारा सिंग बायोग्राफी
Dara Singh as Hanuman in Ramayana (Source – Youtube)

त्यांच्या लग्नाच्या वेळचा एक खास किस्सा आहे, त्यांचा मुलगा बिंदु दारा सिंगने सांगितलेला. १९४२ मध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाने घराबाहेर काढले कारण त्यांनी लग्नात हुंडा घेण्यास नकार दिला होता. तेव्हा त्यांना पेपर विकण्यापासुन ते गाडी साफ करायची कामं देखिल करावी लागली. नंतर त्यांना घरी परत बोलावण्यात आले. आपला प्रवास वर्ल्ड चॅम्पियन ते हिंदी सिनेमा आणि हनुमानाची अजरामर भूमिका असा होईल असे त्यांनी कधीही वाटले नाही कारण कुस्ती हाच त्यांचा आवडीचा आणि मनाजवळचा विषय.

त्यांचा शेवटचा सिनेमा “जब वी मेट” होता ज्यात त्यांनी करीना कपूरच्या अजोबांची लक्षात राहील अशी भूमिका केली. सिनेमा हिट झाला. त्यांनी अनेक पंजाबी सिनेमे देखील केले. स्वतःची सिनेमा निर्मिती ‘दारा स्टुडिओ’च्या नावाने सुरु केली. एक पंजाबी व एक हिंदी सिनेमा सुद्धा त्यांनी दिग्दर्शीत केला आहे. त्यांच्या आणखी सिनेमांमध्ये पाहण्याची त्यांच्या सर्व चाहत्यांना होती.

राज्यसभेवर निवडण्यात आलेले ते पहीले पैलवान खासदार होते. भारतीय जनता पक्षातर्फे २००३ ते २००९ त्यांनी खासदार म्हणून काम केले.

dara singh height, dara singh image, dara singh son, vindu dara singh, dara singh movie, king kong wrestler, dara singh diet, dara singh wwe, dara singh biography, dara singh in marathi, Dara Singh Randhawa, Indian wrestler, ramayana, hanuman, dara singh brother, दारा सिंग, दारा सिंग मराठी माहिती, दारा सिंह किस्से, दारा सिंग बायोग्राफी
dara singh wwe, dara singh biography, dara singh in marathi (Source – The Better India)

वयाच्या पन्नाशीतही जो कुस्ती जिंकला आणि साठीत हनुमानची भूमिका ज्याने साकारली, राजकाराणात काम केले. त्याच्यासाठी ८३ वयही कमीच वाटावं पण अखेर वेळ जिंकली आणि १२ जुलै २०१२ ला आजच्याच दिवशी त्यांच्या मेंदुला रक्तपुरवठा बंद पडल्याने त्यांचे निधन झाले. भारताचा पैलवान म्हणून, रामायणातला हनुमान म्हणून, गितचा आजोबा म्हणून ते जुन्या आणि नव्या अश्या सर्व पिढ्यांना लक्षात राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here