महाभारतातल्या ‘या’ योद्धाच्या मंदिरात एकाने ओल्ड माँकच्या १०१ बाटल्या अर्पण केल्या

1334
Duryodhana temple, malanada temple, Duryodhana temple Kerala, liquor prasad, Poruvazhy Peruviruthy Malanada Temple, दुर्योधन मंदिर, ओल्ड मॉंक

भारतामध्ये आपल्याला विविध परंपरा पाहायला व ऐकायला मिळतात. पौराणिक कथांमध्ये राक्षस किंवा खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनेक व्यक्ती अथवा पात्रांना एका विशिष्ट राज्यात देवाचा दर्जा दिला जातो. महाभारत काळातील अश्याच एका व्यक्तीचं मंदिर तुम्हाला केरळ राज्यात पाहायला मिळेल.

महाभारत व त्या महाभारतातील भयंकर युद्ध घडण्यास कारणीभूत असलेली प्रमुख व्यक्ती होती ती म्हणजे दुर्योधन. तुम्ही अनेक कथा व मालिकांमधून दुर्योधनाला खलनायकी पात्र म्हणून पहिले असेल पण केरळमधील कोल्लम येथे ह्याच दुर्योधनाचं चक्क एक मंदिर उभारण्यात आलेलं आहे हे बहुतेकांना माहित नसेल, आणि ह्याच मंदिरात दुर्योधनाच्या एका एन आर आय (परदेशस्थ भारतीय) ने आपल्या देवाला म्हणजेच दुर्योधनाला चक्क “ओल्ड मॉंक” ह्या विदेशी दारूच्या १०१ बाटल्या अर्पण केल्या आहेत.

Duryodhana temple, malanada temple, Duryodhana temple Kerala, liquor prasad, Poruvazhy Peruviruthy Malanada Temple, दुर्योधन मंदिर, ओल्ड मॉंक
Duryodhana temple was offered 101 old monks bottle (Source – TOI)

ऐकून नवल वाटलं ना! पण हे खरंय. दक्षिण भारतामध्ये हे असे एकमेव मंदिर आहे जिथे दारू अर्पण केली जाते. दुर्योधनाच्या ह्या मंदिराचं नाव आहे, “पोरुवझी पेरूवथी मलनाड दुर्योधन मंदिर”. इथे दरवर्षी एक उत्सव साजरा केला जातो व ह्याच उत्सवाच्या सुरुवातीला एका एन आर आय भक्ताने ओल्ड मॉंकच्या १०१ बाटल्या दुर्योधनास अर्पण केल्या आहेत. अशी आख्यायिका इथे प्रसिद्ध आहे कि, एकदा दुर्योधन ह्या गावात आले होते व त्यांना तहान लागली होती, त्यामुळे गावातील एका व्यक्तीने त्यांना “तोड्डी” म्हणजेच स्थानिक दारू प्यायला दिली ज्यामुळे दुर्योधन अत्यंत खुश झाले होते, त्यामुळे ह्या मंदिरात दारू अर्पण करण्याची प्रथा आहे असे मानले जाते.

Duryodhana temple, malanada temple, Duryodhana temple Kerala, liquor prasad, Poruvazhy Peruviruthy Malanada Temple, दुर्योधन मंदिर, ओल्ड मॉंक
At malanada temple there is no idol of duryodhana but this peetham is worshiped (Source – Kerala Mythology)

एसबी जगदीश ह्या मंदिराच्या सचिवाने सांगितले कि पूर्वी इथे अनेक प्रकारच्या गोष्टी अर्पण केल्या जात पण आता त्यावर बंदी आहे. १९९० सालापर्यंत इथे आतिषबाजी केली जायची, पण १९९० साली आतिषबाजी दरम्यान झालेल्या दुर्घटनेत अनेक लोक मरण पावले व तेंव्हापासून आतिषबाजीवर बंदी घालण्यात आली. सोमवारी दुर्योधनाच्या एका एन आर आय भक्ताने १०१ ओल्ड मॉंकच्या बाटल्या दुर्योधनास अर्पण केल्याची बातमी चांगलीच चर्चेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here