राहुल गांधी इटलीला निघून जा, शेतकऱ्यांची घोषणाबाजी

675
rahul gandhi, congress, amethi, farmers protest against rahul gandhi, राहुल गांधी, शेतकऱ्यांची घोषणाबाजी, राहुल गांधी इटलीला निघून जा, अमेठी

लोकसभा निवडणूक जवळ येत आहे आणि सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयार आहेत. त्यात राहुल गांधींनी सुद्धा प्रचाराला सुरवात केली आहे. याच पार्श्व्भूमीवर राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर होते. पण अमेठीला भेट दिली असता राहुल गांधींना शेतकऱ्याच्या रागाला सामोरे जावं लागलं. शेतकऱ्यांनी राहुल गांधींच्या विरोधात निदर्शने करत जोरात घोषणाबाजी केली.

आम्ही जी आमची जमीन राजीव गांधी फाऊंडेशनला दिली ती परत करा नाहीतर आम्हाला रोजगार द्या, अशी गौरीगंज येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
“राहुल गांधींना इथे राहण्याचा हक्क नाही आणि त्यांनी पुन्हा इटलीला निघून जावं. राहुल गांधींनी आमची जमीन बळकावली आहे आणि आम्ही त्यांच्यावर खूप नाराज आहोत,” असे शेतकऱ्यांनी निदर्शने केले.

काय आहे या जमिनीचा वाद ?

तसे बघितले असता या जमिनीचा वाद १९८० सालापासून चालू आहे. कौसार इथे जैन बंधूंनी ६५.५७ एकर जमीन कंपनी चालू करण्याच्या उद्देशाने घेतली होती. पण ते या कामात अपयशी ठरल्याने या जमिनीचा २०१४ साली लिलाव करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार हि जमीन उत्तर प्रदेश राज्य औद्योगिक विकास प्राधिकरणाकडे सोपवायची होती परंतु राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने अद्यापही या जमिनीचा ताबा सोडलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here