या भारतीय पहेलवानापासून प्रेरित होऊन ब्रूस ली ने चालू केली बॉडी बिल्डिंग

gama pehlwan, the great gama pehalwan, gama pehalwan in marathi, gama pehalwan information, gama pehalwan and bruce lee, bruce lee guru, indian wrestler, gulam mohammad baksh, गामा पेहलवान, ब्रूस ली, ग्रेट गामा पेहलवान, गुलाम मोहम्मद बक्ष, gama pehalwan diet

कुस्ती हा खूप पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळाचा प्रकार आहे. ह्या खेळात दोन प्रतिस्पर्धी असतात. शक्ती, शरीर, चपळता, बुद्धी, निर्णयक्षमता, डाव या खेळात वापरावे लागतात. कलाजंग, एकेरी पट, ढाक, दुहेरी पट, मोळी, निकाल, एकचाक, आतील व बाहेरील टांग, गदालोट, धोबीपछाड इत्यादी कुस्तीतल्या डावांचे प्रकार आहेत. हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. आपल्या देशात कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते, तर कुस्तीचे ऒलिंपिक सामने मात्र एका जाड सतरंजीवर खेळवतात. “कुशती” या फारसी शब्दावरून ‘कुस्ती’ शब्द अस्तित्वात आला, त्याचा अर्थ मल्लयुद्ध असा होतो.

भारतभूमीने नेहमीच महान “कुस्तीवीर” निर्माण केले, त्यातीलच एक अनभिषिक्त मल्ल म्हणजे “गामा पेहलवान”. गामा हे त्याचे कुस्ती मैदानातील नाव, खरे नाव गुलाम महोम्मद बक्ष. अमृतसर, पंजाब (ब्रिटिश इंडिया) मध्ये २२ मे १८७८ मध्ये जन्मलेला गुलाम हा काश्मिरी मुस्लिम होता. त्याने वयाच्या १०व्या वर्षांपासूनच कुस्ती खेळायला सुरुवात केली. दगडी डंबेल्स वापरून त्यांनी शरीरयष्टी कमावली. कुस्तीचा वारसा त्यांना आजोळ घराण्याकडून मिळाला, गुलामचे वडील ते अगदी लहान असताना वारले आणि त्यांची जबाबदारी घेतली, आईच्या वडील आणि भावाने, दोघेही पेहलवान होते. त्यांच्या तालमीत गुलाम कुस्ती शिकू लागले.

gama pehlwan, the great gama pehalwan, gama pehalwan in marathi, gama pehalwan information, gama pehalwan and bruce lee, bruce lee guru, indian wrestler, gulam mohammad baksh, गामा पेहलवान, ब्रूस ली, ग्रेट गामा पेहलवान, गुलाम मोहम्मद बक्ष, gama pehalwan diet
Gama Pehelwan (Source – Daily Times)

गामा पहेलवान यांचं डाएट

एका वेळी ४० – ४० लोकांशी कुस्ती खेळून ते जिंकत असत. त्यांचा दररोजचा सराव गजब होता, १०० किलो वजन अंगावर घेऊन ते ५ हजार दंड बैठका काढत असत. अशी भन्नाट कसरत म्हणजे खुराक सुद्धा तसाच असणार, तुमचा विश्वास बसणार नाही असं खास डाएट होतं गामा पेहलवना ह्यांचं. १० लिटर दुध ३ टोपली भरून फळं, दीड पौंड बदामाचे सरबत, अर्धा लिटर तूप, ६ पौंड लोणी, हे आणि अजून पौष्टिक खाद्य ते रोज फस्त करत असत. त्यांची उंची सुमारे ५.८” तर वजन तब्बल ११० किलो होते.

१९१० पर्यंतच्या काळात त्यांनी भारतात असलेल्या आणि बाहेरून आलेल्या प्रत्येक पेहलवानाला चारी मुंड्या चित केलं होतं. ते नंतर लंडनला वर्ल्ड रेसलिंग खेळायला गेले, पण कमी उंचीमुळे सुरुवातीला त्यांना तिथे नाकारले गेले. तिथे प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी पेहलवानांना जाहीर आवाहन दिलं की, “मी एका वेळी कोणत्याही वजनाच्या ३ पेहेलवानांना एकाच वेळी काही मिनिटात हरवून दाखवेल नाही तर त्यांना पैसे देईन” ही पैजेची युक्ती करून ते जिंकून पुढे गेले. दुसऱ्या दिवशी तर त्यांनी एका वेळी १२ पेहलवान हरवले.

gama pehlwan, the great gama pehalwan, gama pehalwan in marathi, gama pehalwan information, gama pehalwan and bruce lee, bruce lee guru, indian wrestler, gulam mohammad baksh, गामा पेहलवान, ब्रूस ली, ग्रेट गामा पेहलवान, गुलाम मोहम्मद बक्ष, gama pehalwan diet
The Great Gama Pehlwan (Source – Google)

“वर्ल्ड चॅम्पियन” हा किताब गामाने कमावला होता, त्यांच्या आयुष्यात एकही स्पर्धा ते कधीच हरले नाही. त्याकाळी अमेरिकेतील जैविस्को नावाचा विख्यात खेळाडू होता, त्यालाही गामाने धूळ चारली होती.

गामाचा शिष्य ‘ब्रूस ली’

गामाच्या विविध पद्धतीचा ब्रूसली हा अगदी अनुयायी होता. ली ह्यांनी गामाबद्दलच्या अनेक लेखांचे वाचन केले आणि कुस्तीसाठी गामाने ताकदीची उभारणी कशी केली, सराव कसा केला याबद्दल ब्रूस लीने अभ्यास केला आणि त्याने त्वरीत त्यांच्या स्वत: च्या अभ्यासरूपात गामाचे अनुकरण केले. “कॅट स्ट्रेच”, आणि “द स्क्वॅट” (बैठक म्हणून ओळखले जाते, गुढग्यात खोल वाकून करायची मुद्रा) हे ब्रूसने गामाच्या अनुकरणाने शिकून घेतले.

gama pehlwan, the great gama pehalwan, gama pehalwan in marathi, gama pehalwan information, gama pehalwan and bruce lee, bruce lee guru, indian wrestler, gulam mohammad baksh, गामा पेहलवान, ब्रूस ली, ग्रेट गामा पेहलवान, गुलाम मोहम्मद बक्ष, gama pehalwan diet
Gama Pehalwan Bruce Lee (Source – Humor Nation)

अंत मात्र दुःखद

ग्रेट गामा लाहोरमध्ये (फाळणी नंतर पाकिस्तानात गेले), २३ मे १९६० रोजी आजारपणानंतर मरण पावले. त्यांना सरकारकडून जमीन देण्यात आली होती, परंतु तरीही त्यांना त्यांच्या हृदयरोग आणि दम्याच्या उपचारांसाठी पैसे कमी पडले. भारतातील उद्योगपती आणि कुस्ती प्रेमी ‘टाटा’ यांनी, २०००₹ रोख आणि मासिक मदत ३००₹ त्यांना देऊन त्यांची अडचण सोडवली होती.

कुस्तीवर बॉलीवूडमध्ये आजपर्यंत अनेक चित्रपट निघाले आणि त्यांनी भरपूर कमाई केली, परंतु ह्या खेळाडूंची परिस्थिती आजसुद्धा म्हातारपणी गामासारखीच होते, त्या खेळाडूंसाठी बॉलीवूड असो की सरकार मदतीला कमीच पडतात असे दिसून येते.

gama pehlwan, the great gama pehalwan, gama pehalwan in marathi, gama pehalwan information, gama pehalwan and bruce lee, bruce lee guru, indian wrestler, gulam mohammad baksh, गामा पेहलवान, ब्रूस ली, ग्रेट गामा पेहलवान, गुलाम मोहम्मद बक्ष, gama pehalwan diet
(Source – Amar Ujala)

ये भावड्या हे बी वाच –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here