तब्बल १९ लाख रुपये मोजून गुजरातच्या बिसनेसमॅनने मिळवला हा नंबर

775
gujrat builder, govind pansara, rto, special number, 19 lakh, 0007

समजा तुम्ही एखादी कार विकत घेतलीत तर आरटीओकडून त्या कारचा जो पासिंग क्रमांक दिला जाईल तोच त्या कारच्या नंबर प्लेटवर टाकाल. समजा तुम्हाला एखादा विशिष्ट नंबर आवडत असेल व आरटीओकडून तो नंबर आपल्या कारसाठी मिळावा असे वाटत असेल तर थोडीशी ज्यादा रक्कम मोजायलाही तुम्ही तयार होता. पण ती रक्कम फारफार तर काही हजार रुपयांपर्यंत असू शकेल.

एखादा सामान्य माणूस त्यापेक्षा जास्त पैसे देण्याचा विचारही करणार नाही. पण गुजरातमधील एका बिल्डरने आपला आवडता क्रमांक आरटीओकडून मिळवण्यासाठी तब्ब्ल १९ लाख रुपये मोजले आहेत. तुम्हला कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. राजकोटमध्ये राहणाऱ्या गोविंद परसाना नामक ह्या बिल्डरने आपल्या नवीन मर्सिडीज गाडीसाठी ०००७ हा क्रमांक आरटीओकडून मिळवलाय व त्यासाठी मोजलेत तब्ब्ल १९ लाख रुपये.

gujrat builder, govind pansara, rto, special number, 19 lakh, 0007
Gujrat Builder Govind Parsana Paid 19 lakh to RTO for Special Number (Source – Youtube)

तुम्हाला वाटेल कि ०००७ ह्या नंबरसाठी इतके पैसे मोजले म्हणजे हा व्यक्ती जेम्स बॉंडचा चाहता असेल पण तसं नाही. गोविंद परसाना हे गणपतीचे भक्त आहेत आणि ७ हा आकडा गुजरातीमध्ये लिहिला तर तो गणपतीच्या प्रतिमेसारखा दिसतो त्यामुळे त्यांनी ह्या नंबरसाठी इतके पैसे मोजले आहेत. त्यांनी हा नंबर मिळवण्यासाठी गाडीच्या एकूण रकमेच्या ३३ टक्के इतकी रक्कम खर्च केली आहे.

ह्या क्रमांकासाठी आरटीओने लिलाव आयोजित केला होता व त्यात परसाना ह्यांनी १९ लाख रुपयांची बोली लावून हा क्रमांक मिळवला. गुजरातमध्ये कुठल्याही कारसाठी लावण्यात आलेली आजवरची हि सर्वाधिक बोली असल्याचे समजते. ९९, १,७, ११ ह्या क्रमांकांसाठीही लिलाव आयोजित केला जातो व हे क्रमांक आपल्या वाहनासाठी मिळावेत म्हणून लोक कितीही रक्कम मोजण्यास तयार असतात असे आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here