मुघल बादशाह औरंगजेबाने पाडलेली हिंदू देवी-देवतांची मंदिरे

aurangzeb administration, hindu temples destroyed by mughals, farmans of aurangzeb, aurangzeb history, why were temples destroyed, good qualities of aurangzeb, Why Aurangzeb destroyed temples, aurangzeb in marathi, mughal history, maratha, औरंगजेब, औरंगजेबने पाडलेली हिंदू मंदिरं, मुघल बादशाह औरंगजेब

“औरंगजेबाने अनेक मंदिरे उध्वस्त केल्याचे पुरावे इतिहास देते परंतु, सोबतच औरंगजेबाने अनेक जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी मदत केल्याचे, अनेक मंदिरांना दान दिल्याचे पुरावे देखील इतिहास देते”

मुघल सत्ता हि अतिशय क्रूर म्हणून आपल्याला तिची ओळख आहे. अनेक बरे, वाईट नियम व कायदे या मुघल सत्तेतून आले, आणि अनेक चांगले वाईट राज्यकर्ते सुद्धा गादीवर आले. तसं पहायला गेलं तर हा सगळा सत्तासंघर्ष होता, एक राजकीय संघर्ष होता, परंतु, आपले वर्चस्व इतरांनी मान्य करावे आणि आपल्या शक्तीपुढे झुकावे यासाठी इतर धर्मियांची श्रद्धास्थाने मुद्दाम भंग करून या सगळ्या संघर्षाला धार्मिक स्वरूप दिले गेले. मुघल राज्यकर्ते एका गोष्टीसाठी खूप बदनाम आहेत, ते म्हणजे मंदिरांची विल्हेवाट लावणे.

अनेक मुघल राज्यकर्त्यांनी हिंदू मंदिरं उध्वस्त केली आणि बऱ्याच मंदिरांचे रूपांतर मस्जिदमध्ये करवून घेतले. या सगळ्या राज्यकर्त्यांमध्ये एक नाव प्रामुख्याने घेतले जाते, ते म्हणजे बादशाह औरंगजेब. औरंगजेब बादशाहने अगणित मंदिरे उध्वस्त केली, असे सांगितले जाते व याचे काही पुरावे देखील अस्तित्वात आहेत. औरंगजेब हे व्यक्तिमत्त्व एक न उलगडणारे कोडे आहे, कारण त्याच्या प्रत्येक स्वभावाला वेगवेगळ्या छटा आहेत. औरंगजेबाने अनेक मंदिरे उध्वस्त केल्याचे पुरावे इतिहास देते परंतु, सोबतच औरंगजेबाने अनेक जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्वारासाठी मदत केल्याचे, अनेक मंदिरांना दान दिल्याचे पुरावे देखील इतिहास देते.

aurangzeb administration, hindu temples destroyed by mughals, farmans of aurangzeb, aurangzeb history, why were temples destroyed, good qualities of aurangzeb, Why Aurangzeb destroyed temples, aurangzeb in marathi, mughal history, maratha, औरंगजेब, औरंगजेबने पाडलेली हिंदू मंदिरं, मुघल बादशाह औरंगजेब
Aurangzeb (Source – Cultural India)

आज आपण पाहूया औरंगजेबाने उध्वस्त केलेली काही मंदिरे

सोमनाथ मंदिर – सोमनाथ मंदिर, गुजरात राज्यातील वेरावल येथील मंदिर आहे. शंकरांच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ पहिले स्थान आहे. हे मंदिर फक्त औरंगजेबानेच उध्वस्त केले नाही तर, औरंगजेबाच्याही आधी अनेक राज्यकर्त्यांनी या मंदिराला उध्वस्त करून मोठ्या प्रमाणात लूट केली आहे. मेहमूद गझनी या आक्रमणकर्त्याने सर्वाधिक वेळा हेच मंदिर उध्वस्त करून येथील संपत्ती लुटली आहे. आदिलशाही सरदार अफझलखानानेही हेच मंदिर लुटल्याचा उल्लेख आहे. या नंतर औरंगजेबाने हे मंदिर लुटले आहे. औरंगजेबाने आणि इतर अनेक राज्यकर्त्यांनी लुटलेले व उध्वस्त केलेले हे मंदिर पुन्हा नवीन बांधून आज देखील उभे आहे.

aurangzeb administration, hindu temples destroyed by mughals, farmans of aurangzeb, aurangzeb history, why were temples destroyed, good qualities of aurangzeb, Why Aurangzeb destroyed temples, aurangzeb in marathi, mughal history, maratha, औरंगजेब, औरंगजेबने पाडलेली हिंदू मंदिरं, मुघल बादशाह औरंगजेब
Somnath Temple (Source – commons.wikimedia.org)

कृष्ण जन्मभूमी मंदिर –हे मंदिर उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा येथे स्थित आहे. भगवान कृष्ण यांचा नातू वज्र याने हे मंदिर बांधले आहे अशी सर्वसाधारण लोकांत धारणा आहे. औरंगजेबाच्या आधीदेखील अनेकांनी या मंदिराची विल्हेवाट लावली होती. औरंगजेबाने साधारण १६६९ च्या सुमारास येथील मंदिर उध्वस्त केले, आणि शाही ईदगाह मस्जिद उभारली. पुढे अनेक वादविवादानंतर मंदिराचे नवनिर्माण झाले. मंदिर जेव्हा पाडले, त्याच ठिकाणी मस्जिद उभारली गेली. आजही हि जागा इतिहासाची साक्ष देत उभी आहे.

aurangzeb administration, hindu temples destroyed by mughals, farmans of aurangzeb, aurangzeb history, why were temples destroyed, good qualities of aurangzeb, Why Aurangzeb destroyed temples, aurangzeb in marathi, mughal history, maratha, औरंगजेब, औरंगजेबने पाडलेली हिंदू मंदिरं, मुघल बादशाह औरंगजेब
Sri Krishna Janmabhoomi Temple near Mathura (Source – trawell.in)

काशी विश्वनाथ मंदिर – मनुष्याचा निवास असलेले सर्वांत जुने शहर म्हणजे वाराणसी आणि याच वाराणसीमध्ये आहे, भगवान शंकराचे भव्य व सुप्रसिद्ध मंदिर ज्याला म्हटले जाते काशी विश्वनाथ मंदिर. या ठिकाणी आजही शंकराचे मूळ ज्योतिर्लिंग अस्तित्वात नाही, याचे कारण मुघलांनी या मंदिराची वेळोवेळी लावलेली विल्हेवाट असे दिले जाते.

aurangzeb administration, hindu temples destroyed by mughals, farmans of aurangzeb, aurangzeb history, why were temples destroyed, good qualities of aurangzeb, Why Aurangzeb destroyed temples, aurangzeb in marathi, mughal history, maratha, औरंगजेब, औरंगजेबने पाडलेली हिंदू मंदिरं, मुघल बादशाह औरंगजेब
Kashi Vishwanath Temple (Source – Arise Bharat)

ऐतिहासिक साधनांनुसार सांगितले जाते कि सन ११९४ मध्ये हे मंदिर उध्वस्त करण्यात आले होते, मग ते पुन्हा बांधले गेले, आणि मग १५ व्या शतकात हे पुन्हा तोडले गेले, आणि सम्राट अकबराच्या राज्यकाळात हे पुन्हा बांधले गेले. शेवटी औरंगजेबाने १६६९ मध्ये हे मंदिर उध्वस्त केले व येथे मस्जिद उभारली आणि सध्या उभे असलेले मंदिर याच मस्जिदीपासून काही अंतरावर उभारलेले आहे. साधारण १७८० मध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या प्रयत्नाने हे मंदिर पुन्हा उभारले गेले.

विजय मंदिर – मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून जवळच हे विजय मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास अतिशय रंजक आहे. हे मंदिर विदिशा नावाच्या शहरात आहे. येथे सध्या बिजा (बीज मंडल) मस्जिद उभी आहे. हे मंदिर परमार राजांच्या काळात बांधले गेले होते. हे मंदिर मुख्यत्वे चर्चिका देवीला समर्पित होते. मुघल सम्राट औरंगजेब याने येथील मंदिर पूर्णपणे उध्वस्त केले, खजिना लुटला आणि मंदिराच्या पडलेल्या अवशेषांपासूनच नवीन मस्जिद उभी करविली. असे म्हटले जाते कि या मंदिरातील मूर्त्या औरंगजेबाने जमिनीत पुरून ठेवल्या. सध्या हे ठिकाण पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात आहे, परंतु, त्याआधी या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या अनेक समारंभाच्या निमित्ताने जनसागर गोळा होत असे.

aurangzeb administration, hindu temples destroyed by mughals, farmans of aurangzeb, aurangzeb history, why were temples destroyed, good qualities of aurangzeb, Why Aurangzeb destroyed temples, aurangzeb in marathi, mughal history, maratha, औरंगजेब, औरंगजेबने पाडलेली हिंदू मंदिरं, मुघल बादशाह औरंगजेब
Vijay Temple (Source – Detechter)

भीमा देवी मंदिर – हे मंदिर पिंजोरे, हरियाणा येथे आहे. कधीकाळी या ठिकाणी पांडवांचा निवास झाला होता, म्हणून या ठिकाणाला सुरुवातीला पंचपुरा असे म्हणत, आणि कालांतराने या ठिकाणाला भीम नगर असे देखील म्हटले जाऊ लागले. या ठिकाणाचा व मंदिराचा उल्लेख अनेक शिलालेखांमध्ये केला गेला आहे. यावरून या मंदिराचे पूर्वीच्या काळी असलेले महत्व लक्षात येते. येथील भीमा देवीचे मंदिर अनेकवेळा सातत्याने तोडले गेले आणि मग औरंगजेबानेही येथील मंदिर उध्वस्त केले.

aurangzeb administration, hindu temples destroyed by mughals, farmans of aurangzeb, aurangzeb history, why were temples destroyed, good qualities of aurangzeb, Why Aurangzeb destroyed temples, aurangzeb in marathi, mughal history, maratha, औरंगजेब, औरंगजेबने पाडलेली हिंदू मंदिरं, मुघल बादशाह औरंगजेब
Bhimadevi Temple Remainings (Source – Apnisanskriti.com)

मदन मोहन मंदिर –हे मंदिर आहे वृन्दावन, कालीघाट येथे. आजूबाजूचा प्रदेश बराचसा जंगलाने वेढलेला आहे. या मंदिराला देखील सर्वाधिक जुन्या मंदिरांच्या यादीत स्थान आहे. औरंगजेब जेव्हा राज्य करीत होता, त्या काळात त्याच्या भीतीने या मंदिरातील मदन गोपाळ देवाची मूर्तीच येथून हलविली गेली आणि राजस्थान येथे आणली गेली. सध्या या मंदिरात खऱ्या मूर्तीची नक्कल घडविली आहे, त्याचीच पूजा – अर्चा होते, परंतु खरी मूर्ती अजूनदेखील राजस्थानमधील करौली येथे सुरक्षित ठेवली आहे. ज्या काळात औरंगजेबाने वृन्दावन येथे हल्ला केला, त्याच वेळी त्याने हे मंदिर पूर्णपणे उध्वस्त केले, आणि शेवटी जुन्या मंदिरापासून थोड्याच अंतरावर एक नवे मंदिर पुन्हा उभे केले गेले.

aurangzeb administration, hindu temples destroyed by mughals, farmans of aurangzeb, aurangzeb history, why were temples destroyed, good qualities of aurangzeb, Why Aurangzeb destroyed temples, aurangzeb in marathi, mughal history, maratha, औरंगजेब, औरंगजेबने पाडलेली हिंदू मंदिरं, मुघल बादशाह औरंगजेब
Madan Mohan Temple near Vrindavan (Source – trawell.in)

चौसष्ट योगिनी मंदिर – मध्यप्रदेश मधील जबलपूर येथे हे महत्वाचे मंदिर आहे. या मंदिरात शंकर व पार्वती यांच्यासोबत ६४ योगिनींचा निवास दर्शविते. या मंदिराला औरंगजेबाशी निगडित एक इतिहास लाभला आहे. असे म्हटले जाते कि औरंगजेबाने ठरविले कि तो येथील ६४ मूर्त्यांपैकी प्रत्येक मूर्तीवर तलवार ठेवेल आणि जर मूर्तीमधून आवाज आला नाही तर तो सरळ त्या मूर्तीला नष्ट करेल.

ठरल्याप्रमाणे तो योगिनी मंदिरात शिरला आणि एकेका मूर्तीवर तलवार ठेऊ लागला आणि आवाज न आल्याने त्याने मूर्त्या उध्वस्त केल्या आणि शेवटी औरंगजेबने शिवशक्ती देवाच्या पायावर तलवार ठेवली असता अचानक त्याला मधमाश्यांचा आवाज आणि काही द्रव पदार्थ वाहण्याचा आवाज आला आणि अचानक औरंगजेब गडबडला आणि म्हणूनच औरंगजेबाने या मूर्तीची मोडतोड केली नाही.

aurangzeb administration, hindu temples destroyed by mughals, farmans of aurangzeb, aurangzeb history, why were temples destroyed, good qualities of aurangzeb, Why Aurangzeb destroyed temples, aurangzeb in marathi, mughal history, maratha, औरंगजेब, औरंगजेबने पाडलेली हिंदू मंदिरं, मुघल बादशाह औरंगजेब
Chausat Yogini Temple (Source – mejorimagen.eu)

तर मंडळी, आपण आत्तापर्यंत अशी अनेक मंदिरे पहिली जी औरंगजेबाने नष्ट केली परंतु, हि तर एक छोटीशी झलक म्हणावी लागेल कारण याहीपेक्षा अगणित मंदिरांची नासधूस औरंगजेबाने केल्याचे इतिहास सांगतो. नाशिक येथील त्रिंबकेश्वर मंदिर, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर देऊळ आणि अशी अनेक देवस्थाने औरंगजेबाने नष्ट केली होती. हि मंदिरे तोडण्यासाठी औरंगजेबाच्या धर्मवेडेपणाला दोष द्यावाच लागेल, पण सोबतच मंदिरांमध्ये असलेली अमाप संपत्ती बळकावणं हे देखील या मागचे मुख्य कारण होते. अनेक ठिकाणी औरंगजेबाने जुन्या मंदिरांच्या पुनर्बांधणीला मदत केल्याचे पुरावे आहेत, परंतु असे असताना औरंगजेबाने अनेक मंदिरे उध्वस्त केली हा विषय औरंगजेबाच्या व्यक्तिमत्त्वाला अजून कठीण व गुंतागुंतिचे बनवितो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here