जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म इस्लामची सुरवात कोणी आणि कशी केली ?

2105
इस्लाम, इस्लाम धर्माची सुरवात, इस्लामचा इतिहास, जगातील सर्वात मोठे धर्म, islam religion, islam history, Muhammad paigambar
इस्लामची स्थापना ही दहशतवादासाठी किंवा हिंसेसाठी झाली नसून मुळात ती जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी झाली होती.

एखाद्या गोष्टी बद्दल आपण पुर्ण माहीती न घेताच त्यांच्याविषयी मनात काही ही निर्णय घेणे हे कधी पण चुकीचे समजले पाहिजे. इस्लाम हा शब्द जरी आज आपण उच्चारला तरी जगभरात या शब्दाचा संबंध लगेच दहशतवादाशी लावला जातो. असे म्हणतात की प्रत्येक मुस्लिम हा अतिरेकी नसला तरी सापडणार प्रत्येक अतिरेकी मुस्लिम का असतो. .? पण हे बोलणार्यांनी आपण ज्या मुस्लिम धर्माबद्दल बोलत आहोत त्याबद्दल थोडी तरी माहीती करूण घेतलेली बरी. इस्लामची स्थापना ही दहशदवादासाठी किंवा हिंसे साठी झालीच नाही मुळात ती झाली ती या जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी झाली होती. आणि आपण हे लक्षात घेतले पाहिजे की दहशदवादाला कोणता धर्म नसतो.दहशदवादी हे माणुस नसुन राक्षसच म्हणावे लागतील. मग राक्षसांचे कृत्य कधी देवाला आवडले होते का..? पाकिस्तान व अफगाणिस्तान मध्ये चाललेली हिंसा ही इस्लाम ला सुध्दा मान्य नाही. आणि कोणताही धर्म माणसाला माणसाशी प्रेमाने वागायला शिकवतो. त्यामुळे आज आपण आपल्या लेखात याच इस्लामच्या उगमा बद्दल जाणून घेणार आहोत. व त्याबाबतचे काही समज गैरसमज यांबद्दलही जाणुन घेऊया..!

इस्लामचा उगम

इस्लामची सुरूवात अर्थात इस्लामचा उगम सौदी अरेबिया मध्ये झाला असे मानले जाते. इस्लामचे पहिले प्रेषित महंमद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना केली. महंम्मद पैगंबरांच्या जन्म इ.स. 601 मध्ये सौदी आरेबिया येथे झाला. इस्लामच्या मान्यते प्रमाणे त्यांना झिब्राईल या देवदूताने त्यांना कूरानचे ज्ञान दिले. त्यात त्यांनी त्यांच्या आधी झालेल्या देवाच्या प्रेषितांचे व इतर धार्मिक गोष्टींचे ज्ञान दिले. इस्लाम मध्ये असे मानले जाते की अल्ला जो एकच परमेश्वर आहे त्याने त्यांना आपला संदेश जगासमोर मांडण्यासाठी नेमले होते.

 

इस्लाम, इस्लाम धर्माची सुरवात, इस्लामचा इतिहास, जगातील सर्वात मोठे धर्म, islam religion, islam history, Muhammad paigambar
(Source – Dailyhunt)

 

प्रथमतः महंम्मद पैगंबरांनी आपले ज्ञान आपल्या जवळच्या लोकांना दिले. नंतर काळानुरुप ते पुर्ण मक्का शहरात पसरले व दिवसेंदिवस त्यांचे अनुयायी वाढू लागले. त्यांच्या विचारांमुळे शेकडोंचा जनसमुदाय त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागला. अशा तर्हेने इस्लामचा प्रचार व प्रसार महंम्मद पैगंबरांनी पुर्ण सौदी आरेबिया व शेजारच्या इतर प्रांतांमध्ये केला.

धर्मगुरूंच्या रोषाला सामोरे गेले

पैगंबरांनी आपल्या या नव्या विचारसरणीचा प्रचार पुर्ण मक्का शहरात सुरू केला व दिवसेंदिवस त्यांचे अनुयायी वाढत चालले होते. याच काळात त्यांनी मक्का व इतर ठीकाणी चालणार्या मुर्ती पुजेला विरोध केला. त्याचबरोबर धर्माच्या नावाखाली चालणार्या अनिष्ठ रूढी – परंपरांना विरोध करून एक प्रकारे तेथिल कर्मठ धर्मसत्तेला जणू आव्हानच दिले. त्यामुळे त्यांना स्थानिक धर्म पंडितांचा रोष ओढवून घेतला.त्यामुळे मक्का मधिल स्थानिक धर्मपंडीतांनी त्यांना व त्यांच्या आनुयांयांना त्रास द्यायला सुरूवात केली. नंतर मग पैगंबरांना व त्यांच्या आनुयांयांना मक्का शहर सोडावे लागले. पैगंबरांनी मक्का सोडून मदीन्याकाडे जाण्याचे ठरवले. त्या प्रमाणे त्यांनी व त्यांच्या आनुयांयांनी मदीन्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. या मक्का ते मदीना दरम्यानच्या पैगंबरांच्या प्रवासाला कूरान मध्ये “हिजरी ” असे म्हटले गेले आहे.

मदिन्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांची विचार सरणी लोकांमध्ये रूजवायला सुरूवात केली. त्यांचे विचार हे लोकांना पटण्यासारखे असल्यामुळे अरब मध्ये त्यांना माननारा मोठ्ठा जनसमुदाय तयार झाला.

महंम्मद पैगंबरांना दोन मुले व तीन मुली होत्या. त्यांच्या मृत्यू नंतर अबू बक्र हे खलीफा झाले. त्यांनी इस्लामचा प्रसार तुर्की , इराक, इराण व अन्य ठीकाणी केला. इस्लाम मध्ये देवाला प्रिय असलेले तीन प्रांत सांगितले गेले आहेत. ते तीन प्रांत म्हणजे अरब, अमन, यमेन यातील अरब म्हणजे सौदी अरेबिया, अमन म्हणजे आपला भारत व पाकीस्तानचा प्रदेश व यमेन म्हणजे इस्त्राईल चा प्रदेश. म्हणजेच इस्लाम मध्ये जेवढे अरबस्तानला महत्त्व आहे. तेवढेच आपल्या भारताला ही आहे हे यातुन दिसुन येते.

 

इस्लाम, इस्लाम धर्माची सुरवात, इस्लामचा इतिहास, जगातील सर्वात मोठे धर्म, islam religion, islam history, Muhammad paigambar
(Source – Oman Business Directory)

 

त्याच बरोबर पैगंबरांना झिब्राईल ने दिलेल्या संदेशांमध्ये परमेश्वराने लोकांसाठी काही नियम नेमून दिले आहेत.या नियमांप्रमाणेच प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचे आचरण असावे असे मानले जाते. कूरान ने घालुन दिलेल्या या नियमांना “शर्यीत” असे म्हटले जाते. या कार्यांना घेऊन जगभरात खुप वाद विवाद चालु आहेत. या मध्ये काही नियम हे अतिशय कडक असुन मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे आहेत. पण हे नियम त्या काळच्या परिस्थितीला अनुकूल होते. कारण त्याकाळात इतर धर्मात सुध्दा याच पध्दतीचे कडक नियम अस्तित्वात होते.

भारतात इस्लामचा प्रसार

इस्लामच्या उगमाच्या आधी पासुन सौदी आरेबिया व भारताचे व्यापारी संबंध होते. त्यामुळे भारतात इस्लचा प्रसार आरेबियन व्यापारी व त्यांच्या बरोबर आलेल्या सुफी संतांच्या प्रभावामुळे झाला. त्यामुळेच इस्लाम मध्ये पवित्र मानली जानारी स्थाने भारतात पण आहेत.त्यामध्ये आजमेर हे एक स्थान होय .त्यामुळे मुस्लिम आक्रमकांनी इस्लाम भारतात आणला हे अर्धसत्य आहे. आक्रमकांनी भारतात इस्लाम वाढवला पण आणला असे म्हणता येणार नाही कारण तो आधी पासुन भारतात अस्तित्वात होता.

आणि हा धर्म आज जगातला सर्वात नवा धर्म मानला जातो. आणि इस्लाम आज जगातील दूसर्या क्रमांकाचा सर्वात मोठ्ठा धर्म आहे. जगातील प्रत्येक पाच माणसांमागे एक माणूस हा मुस्लिम असतो. तर ही होती वाद- विवादाच्या बुर्ख्या मागच्या इस्लामची कहानी.! परत भेटूया एक नवा विषय घेऊन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here