प्रमोद महाजन अगोदर अडवाणींचे व नंतर अटलजींचे खास कसे बनले

1553
प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी, pramod mahajan, atal bihari vajpayee
प्रमोद महाजन अगोदर अडवाणींचे व नंतर अटलजींचे खास कसे बनले


लालकृष्ण अडवाणी यांनी जी राम रथ यात्रा काढली होती असे समजते की ती प्रमोद महाजन यांची कल्पना होती त्यानंतर आडवाणी यांची प्रतिमा देशात आणखीनच उंचावली.

काही दिवसापूर्वीच अटल बिहारी वाजपेयी यांचे दुःखद निधन झाले आणि या दरम्यान सर्वत्र त्यांच्या भूतकाळातील आठवणींच्या चर्चेला उधाण आले. त्याच भूतकाळातील एक किस्सा आज मी तुम्हाला सांगणार आहे.

प्रमोद महाजन हे खूप चतुर व आधुनिक जागतिक विचारांचे राजकारणी होते पत्रकार, शिक्षक तसेच राष्ट्रीय राजकारण अशा पायऱ्या चढत गेलेल्या महाजनांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात प्रथमच 1995 मध्ये बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले होते. बाळासाहेब व त्यांच्यातील असलेल्या मैत्रीमुळे सेना-भाजपा युती करून त्यांनी सत्ता स्थापन केली होती.

प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी, pramod mahajan, atal bihari vajpayee
Image Source – dnaindia.com

आपल्याला विश्वासही होणार नाही की अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्या दत्तक पुत्र इतकेच महत्त्व प्राप्त करणारे प्रमोद महाजन या दोघांमध्ये चालू कार्यक्रमातील मंचावरच भांडण सुद्धा झाले असेल. हा किस्सा “विजय त्रिवेदी” यांच्या “यदा यदा ही योगी” या पुस्तकांमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

सन 2005 मध्ये मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे एक अधिवेशन पार पडले यादरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारणाचा संन्यास घेतला व ते म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी व प्रमोद महाजन यांची जोडी राम-लक्ष्मण यांच्या जोडी प्रमाणे भारतीय जनता पार्टीला पुढे घेऊन जातील.

अडवानी यांनी पन्नासच्या दशकात वाजपेयी यांचा खाजगी सचिव म्हणून पदभार सांभाळला होता व तेथूनच त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती मग पुढील काळात त्यांनी अनेक पदे भोगली.

तर प्रमोद महाजन अटलजींच्या या राम-लक्ष्मण विधाना नंतर काही दिवसातच त्यांचा भाऊ प्रवीण महाजन यांच्या कडून मारले गेले. त्याच्या आधी प्रमोद महाजनांच्या हाती भारतीय जनता पार्टी चे सर्व सूत्रे होती.

लालकृष्ण अडवाणी यांनी जी राम रथ यात्रा काढली होती असे समजते की ती प्रमोद महाजन यांची कल्पना होती त्यानंतर आडवाणी यांची प्रतिमा देशात आणखीनच उंचावली. त्याआधी अडवाणी भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या कल्पनेनुसार पदयात्रा करणार होते. पण त्यांना प्रमोद महाजनांनी दिलेली कल्पनाही जास्त आवडली व त्यानंतर प्रमोद महाजन व लालकृष्ण अडवाणी यांची जवळीक जास्तच वाढली.

90 च्या दशकात मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे एक अधिवेशन झाले व त्या अधिवेशनात एक अशी घोषणा करण्यात आली ही घोषणा 1995 चे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अडवाणी यांनी केली होती. ते म्हणाले की, विरोधक सारखे विचारतात की भारतीय जनता पार्टीची सत्ता जरी स्थापन झाली तर त्यांचा प्रधानमंत्री कोण होईल आणि मी आज घोषणा करतो की अटल बिहारी वाजपेयी आमचे प्रधानमंत्री असतील. हे ऐकताच अटल बिहारी वाजपेयी आश्चर्यचकित झाले भाषण संपल्यानंतर लालकृष्ण अडवाणी अटलजींच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसले.

अटल बिहारी वाजपेयी त्यांना म्हणाले की, हे काय बोललात तुम्ही मला एकदा विचारायला तरी हवे होते तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य केले व प्रमोद महाजन हि हसू लागले.

प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी, pramod mahajan, atal bihari vajpayee
(Source – google)

पण प्रमोद महाजन हे ऐकताच थोडे बावरे झाले त्यांना वाटू लागले पक्षात आता पुन्हा एकदा अटलजींची चलती होईल जशी की ऐंशीच्या दशकात होती. पण अटल बिहारी वाजपेयी त्याकाळी एक असं नेतृत्व होतं की जर पक्षाला सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांचे असणे हे अत्यंत गरजेचे होते.

पण प्रमोद महाजन यांची अशी समस्या होती की त्यांच्यावर अडवाणी कॅम्पिंगचे लेबल होते प्रमोद महाजन यांनी हे लेबल हटवण्याचा निश्चय केला.
हळूहळू त्यांनी अटलजींची जवळीक साधण्यात सुरुवात केली अटलबिहारी वाजपेयी यांची दत्तक पुत्री नमिता व जावई रंजन भट्टाचार्य च्या जवळ गेले व त्यांच्या प्रमाणेच तेही अटलबिहारी वाजपेयी यांना “बाबजी” म्हणू लागले.

अटलजींची राजनीतिक यात्रा त्यांचे दौरे या सगळ्या कार्यक्रमात ते सहभागी होऊ लागले व अटलबिहारी वाजपेयी यांना सुद्धा प्रमोद महाजन आपला संकटमोचन वाटू लागले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here