सिमला करार : युद्धात जिंकलो आणि तहात हरलो

1477
India, Pakistan, Ind Pak War, Simla Agreement, Shimla Accord, Indira Gandhi, Zulfikar Ali Bhutto, Ind Pak War 1971, भारत-पाकिस्तान युद्ध, सिमला करार, जुल्फिकार अली भुट्टो

भारत-पाकिस्तान सैन्य अनेक वेळेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान एकमेकांसोबत युद्ध लढलेले आहेत तेव्हा तेव्हा पाकिस्तानला हार पत्करावी लागली आहे.

जुलै 1972 ला भारत-पाकिस्तान असेच समोरासमोर उभे ठाकले होते. भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले होते आणि पाकिस्तानने संधीसाठी भारताला विचारणा केली होती. भारताने पाकिस्तानचा पाच हजार चौरस किलोमीटरचा प्रदेश ताब्यात घेण्यात यश प्राप्त केले होते आणि यावेळी भारताकडे पाकिस्तानचे 90,000 सैनिक कैदीही होते. एवढी ताकत असतानाही भारत पाकिस्तानला पाहिजे तेवढे नमवन्यामध्ये अपयशी ठरला होता. होय, आपण या लेखामध्ये सिमला कराराबद्दल माहिती घेणार आहोत. काय घडले होते या करावे जाणून घेऊयात.

India, Pakistan, Ind Pak War, Simla Agreement, Shimla Accord, Indira Gandhi, Zulfikar Ali Bhutto, Ind Pak War 1971, भारत-पाकिस्तान युद्ध, सिमला करार, जुल्फिकार अली भुट्टो
India Pak War 1971 (Source – The Wire)

भारताने 1971 ला पाकिस्तान वर मोठा लष्करी विजय मिळवला होता. तरीही त्या विजयाचे हवे तसे सोहळे भारताला करता आले नाही कारण भारताने जितक्या सहजतेने तो विजय मिळवला तितक्याच सहजतेने तो विजय स्वीकारला होता. त्याचा कुठेही डंका भारताने वाजवला नव्हता आणि जेव्हा पाकिस्तान कडून संधी साठी विचारणा करण्यात आली तेव्हा पहिल्यांदा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये कुठल्याही त्रयस्थ देशाची मदत न घेता संधीसाठी बोलणी होणार होती.

या संधीच्या वेळी पाकिस्तानचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो व भारताच्या वतीने पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोलणी केली. त्यावेळी भुट्टो यांनी सोबत आपल्या कॉलेजवयीन मुलीला बेनजीरलाही घेऊन आले होते. यावेळी भारताकडे काश्मीर प्रश्न सोडवण्याची नामी संधी चालून आली होती. कश्मीर प्रश्नांसोबतच इतरही अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याची हि संधी होती. जर पाकिस्तानचा विचार केला तर पाकिस्तानला जमिनी सोबतच युद्धकैदी सुद्धा सोडवुन द्यायचे होते. पण जेव्हा वाटाघाटी चालू झाल्या तेव्हा झुल्फिकार अली भुट्टो यांनी भारताला युद्धकैद्यांच्या प्रश्नावर पूर्ण अधिकार दिले. त्यांची आग्रही मागणी फक्त जमीनीच्या बाबतीत होती आणि या मुद्द्यांमुळे त्यांनी तडजोडीच्या सर्व वाटा त्यांना हव्या तशा वळवण्यात यश मिळवले.

India, Pakistan, Ind Pak War, Simla Agreement, Shimla Accord, Indira Gandhi, Zulfikar Ali Bhutto, Ind Pak War 1971, भारत-पाकिस्तान युद्ध, सिमला करार, जुल्फिकार अली भुट्टो
Zulfikar Ali Bhutto & Indira Gandhi (Source – Google)

त्यांनी भारताला अशी धमकी दिली ती जर काश्मीर प्रश्नावर भारत आग्रही राहिला तर पाकिस्तानातील लोकशाही कोलमडून परत लष्करी हुकूमशाही येईल आणि त्यानंतर ना पाकिस्तान शांत बसू शकेल, ना भारत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या वाटाघाटींमध्ये पेच निर्माण झाला होता आणि याच मुद्द्यांवर बोलणे खुंटले असल्याचे जाहीर करण्यात आले. पण त्यानंतर इंदिरा गांधी आणि भुट्टो यांच्यामध्ये वैयक्तिक संवाद झाला, त्यानंतर पुन्हा दोन्ही बाजू वाटाघाटीला बसल्या.

या वाटाघाटीत भारताने पाकिस्तानला जिंकलेला भाग वापस दिला आणि त्या बदल्यात पाकिस्तानने बांगलादेश या नवीन राष्ट्राला मान्यता दिली. कश्मीर प्रश्नी पाकिस्तानात प्रबोधन करण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले. या करारा अंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करणे व दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्य व मैत्री संबंध वृद्धिंगत करणे तसेच भारतीय उपखंडामध्ये शांतता टिकवणे यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करण्याचे मान्य केले. तसेच जर भविष्यात या दोन्ही देशांमध्ये कुठलाही तिढा निर्माण झाला तर हे दोन्ही देश कुठल्याही त्रयस्थ शक्तीच्या दबावाखाली न राहता ते प्रश्न एकमेकांच्या संमतीने सोडवला जाईल असाही ठराव झाला. म्हणजेच काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तानला आता युनोचे (UNO) सहकार्य मिळवता येणार नव्हते. पण झुल्फिकर अली भुत्तो जेव्हा पाकिस्तानात परतले तेव्हा त्यांनी असे कुठलेही आश्वासन दिले नसल्याचे सांगितले.

India, Pakistan, Ind Pak War, Simla Agreement, Shimla Accord, Indira Gandhi, Zulfikar Ali Bhutto, Ind Pak War 1971, भारत-पाकिस्तान युद्ध, सिमला करार, जुल्फिकार अली भुट्टो
1972: Simla Agreement  (Source – NYOOOZ)

या करारानंतर काही दिवसांनीच भारताने युद्धकैद्यांना सोडून दिले. असे म्हटले जाते की या करारामध्ये भारत भुट्टोच्या गोड बोलण्यात, खोटा वचनांच्या सापळ्यामध्ये अडकला गेला. युद्ध जिंकल्यानंतरही भारताने वाटाघाटींमध्ये अपेक्षित यश मिळवलेच नाही. भुट्टोबद्दल इतिहास असे सांगतो की जर तुम्ही त्यांच्याशी हस्तांदोलन केले तर तुम्ही तुमची पाचही बोटं सहीसलामत आहेत का हे तपासले पाहिजे. अर्थात भारताने काही प्रमाणात वाटाघाटी करण्यात यश मिळवले असे म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here