आपण सोशल मीडियावर सध्या कोल्हापूर आणि सांगलीतील पुराचे व्हिडीओ आणि फोटो बघत आहोत. पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक राज्य पूरग्रस्त आहेत, तिथेही अनेक लोक अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ गुजरातमधला असून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने तब्बल १२५ जणांची सुटका करण्यात आली आहे.
हवाई दलाच्या आपत्कालीन विभागाला माहिती मिळाली कि एका रस्त्यावर काही प्रवाशी अडकून आहेत. रस्त्याच्या चारही बाजूना पाणीच पाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. अशी माहिती मिळताच हवाई दलाने Mi-17 V5 हेलिकॉप्टर तातडीने लोकांच्या सुटकेसाठी रवाना केले. विशेष म्हणजे त्या हायवेवरंच या हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आलं. या घटनेतून भारतीय हवाई दलाने पुन्हा एकदा आपलं शौर्य दाखवलं आहे.