क्रांतीकारी भगतसिंह आणि भारतातील आजचा युवक

1283
भगतसिंह, क्रांतीकारी भगतसिंह, भारतातील आजचा युवक, Bhagat Singh, Indian youth and Bhagat Singh, भगतसिंह माहिती, आजचे भगतसिंह,
[quote_box_center]फाशीच्या जवळपास दोन 2 तास अगोदर वकिलाला भेटण्याची परवानगी मिळाली, वकिलांनी भगतसिंहांना विचारले “तुला कशा ची इच्छा आहे का ??” आणि भगतसिंह म्हणाले “मी या देशात पुन्हा जन्म घेऊ इच्छितो”.[/quote_box_center]

 

सगळ्यात आधी आपण भगतसिंहनां श्रद्धांजली वाहूया कारण ज्या स्वतंत्र भारतात आपण श्वास घेतो तो भारत “भगतसिंह” सारख्या शहिदांच्या कुरबानी वर तयार झाला आहे.

27 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब मधील ल्यालपूर गावात त्यांचा जन्म झाला होता. 1931मध्ये भगतसिंह देशासाठी शहीद झाले आणि ही साधारण घटना नव्हती भगतसिंहाच्या फाशीने देशाला क्रांतीचे शेकडो झटके दिले आणि इंग्रजा वर दबाव वाढला होता.

भगत सिंह इंग्रज हुकूमशाही समोर झुकले असते, त्यांच्यासोबत तडजोड केली असती आणि एक आरामदायी जीवन जगले असते, जे की सध्याच्या प्रत्येक युवकाला हवे आहे पण भगतसिंहांनी बलिदानाचा मार्ग निवडला. तेव्हा त्यांचे वय फक्त 23 वर्षे होते सध्याच्या घडीला एका युवकाकडून तुम्ही अशी अपेक्षा ठेवूच शकत नाही. तसे सांगायचे झाले तर आपला देश जगातील सगळ्यात युवा देश आहे पण आपल्या देशातील युवक पार्टी करू इच्छितो, तसेच मौज मस्ती करू इच्छितो, महागडे फोन व महागड्या गाड्या घेऊ इच्छितो.

 

भगतसिंह, क्रांतीकारी भगतसिंह, भारतातील आजचा युवक, Bhagat Singh, Indian youth and Bhagat Singh, भगतसिंह माहिती, आजचे भगतसिंह,
Source – Twitter

23 मार्च 1931 ची सायंकाळ, ही सायंकाळ भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्या फाशी ची सायंकाळ होती. फाशीच्या जवळपास दोन 2 तास अगोदर म्हणजेच जवळपास 5:30 वाजता भगतसिंहाच्या वकिलाला त्यांना भेटण्याची परवानगी मिळाली वकिलांनी भगतसिंहांना विचारले की “आज तु कसा आहेस” भगत सिंह म्हणाले “नेहमीसारखा खुश आहे” वकिलांनी पुन्हा विचारले “तुला कशा ची इच्छा आहे का??” आणि भगतसिंह म्हणाले “मी या देशात पुन्हा जन्म घेऊ इच्छितो”.

हे खरे आहे की असे महानायक दशकात एकदाच जन्म घेतात पण त्यांचे संघर्ष व अमर बलिदान सदा जिवंत राहते. जोपर्यंत हा देश असेल भगतसिंह, सुखदेव व राजगुरु देशाच्या हृदयात नेहमी जिवंत राहतील.

आजच्या युवा पिढीला देशाच्या या वीर पुत्र कडून बरेच काही शिकण्याची आवश्यकता आहे.कारण भगतसिंह ची शौर्यगाथा वाचून आजची युवापिढी आपले विचार बदलू शकते आणि त्यांच्यात काही चांगले करण्याची प्रेरणा भरली जाऊ शकते.

आपल्या तमाम स्वप्नांमध्ये भगतसिंहांनी “स्वातंत्र्याचे” स्वप्न सगळ्यात वर ठेवले होते आणि या स्वप्नासाठी त्यांनी आपला जीवही दिला. पण भगत सिंह आणि त्यांच्या स्वप्नातील जो भारत बघितला होता तो आजही आपण बनवू शकलो नाही ही आपली शोकांतिका आहे. भगतसिंह आज जिवंत असते तर त्यांना आजच्या युवा पिढीचे कृत्य पाहून खूप दुःख झाले असते.

 

भगतसिंह, क्रांतीकारी भगतसिंह, भारतातील आजचा युवक, Bhagat Singh, Indian youth and Bhagat Singh, भगतसिंह माहिती, आजचे भगतसिंह,
Source – The Better India

 

देशात 18 ते 35 वर्षे वयाचे 42 करोड लोक आहेत. शहीद भगतसिंहाच्या स्वप्नातील भारत बनविण्याच्या मार्गामध्ये “बेरोजगारी” ही एक मोठी समस्या आहे. एका सरकारी अहवालानुसार देशातील 15 ते 29 वर्षाखालील 2 करोड 86 लाख युवा बेरोजगार आहेत. तसेच जगातील सगळ्यात जास्त अशिक्षित वयस्क ही भारतात आहेत. देशातील 7 करोड 32 लाख युवा दारू व ड्रग्स च्या आधीन आहेत आणि ह्यांच्यातील जास्तीत जास्त युवक फक्त 18 वर्षाचे आहेत.

भगतसिंहांनी स्वतंत्र भारतात भ्रष्टाचाराची कल्पनासुद्धा केली नसेल सद्यस्थितीत भारत भ्रष्टाचाराबाबत जगात 79 व्या स्थानावर आहे. भारताचा युवा विकासात नाही महागड्या गॅजेट्स च्या वापरात व्यस्त आहे. 25 देशात केल्या गेलेल्या एका ऑनलाइन सर्वे मध्ये ही गोष्ट समोर आली आहे की भारतातील 95% युवक गॅजेट्स लाच आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा हिस्सा मानतात.

भगतसिंहाच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी भारतातील प्रत्येक युवकाने परिश्रम केले पाहिजे आणि त्याची देशालाही गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here