भारताचे ७ पंतप्रधान आणि त्यांच्या अलिशान गाड्या

prime minister of india, prime minister car india, president of india car number plate, narendra modi car, prime minister modi car, range rover, bmw 7 series, Hindustan motors, ambassador, indira gandhi car, manmohan singh car, narendra modi car, narendra modi bmw car, प्रधानमंत्री गाडी, नरेंद्र मोदींची गाडी, इंदिरा गांधींची गाडी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर

मंडळी देशात कित्येक देश आहेत त्यातील काही राजेशाहीत आहेत तर काही हूकूमशाहीत. त्यातुनही बहुतांश देश हे लोकशाही व्यवस्थेने चालतात. व्यवस्था कोणतीही असो हो..पण त्या व्यवस्थेतील सर्वोच्च व्यक्तीची सुरक्षा ही सर्वोतोपरी आहे. त्यामुळे प्रत्येक देश आपल्या राष्ट्रप्रमुखाची काळजी घेत असतो. आपल्यात म्हणतात तसं “लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे” त्या उक्तीप्रमाणे आहे सगळं…! राष्ट्रप्रमुख किंवा राजा म्हटलं की त्याचे वाहन सुद्धा सुध्दा कुतुहलाचा विषय असतो. प्रत्येक देशाच्या राष्ट्रप्रमुखाचे वाहन हे त्या देशाच्या प्रोटोकॉल प्रमाणे ठरलेलं असतं. मग त्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ब्लॅक कार असेल किंवा मग दूबईच्या सम्राटाची सोन्याची गाडी..!

prime minister of india, prime minister car india, president of india car number plate, narendra modi car, prime minister modi car, range rover, bmw 7 series, Hindustan motors, ambassador, indira gandhi car, manmohan singh car, narendra modi car, narendra modi bmw car, प्रधानमंत्री गाडी, नरेंद्र मोदींची गाडी, इंदिरा गांधींची गाडी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर
US President Donald Trump Car (Source – IndiaToday)

राहिला प्रश्न भारताचा तर भारताच्या पंतप्रधानांच्या वाहना संबंधी एक परंपरा चालत आली होती ती जुनी परंपरा वाजपेयींच्या काळात खंडीत होऊन त्यात नवीन परंपरा उदयास आली. वाजपेयींच्या आधी स्वातंत्र्यापासुन भारतीय पंतप्रधान हिंदुस्तान मोटर्सच्या अँबॅसिडर सिरीजच्या “सेडान” या गाडीचाच उपयोग करत होते. याला “रेलिस ऑफ द राज” असेही म्हटले जायचे पण वाजपेयी सरकारच्या काळात प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यातील अँबॅसिडर सेडान कार काढून त्या जागी आलिशान लक्झरी BMW 7 सिरीजच्या गाड्या वापरायला सुरूवात झाली. चला तर मग पाहूया भारताचे पंतप्रधान व त्यांच्या गाड्या.

1) इंदिरा गांधी

prime minister of india, prime minister car india, president of india car number plate, narendra modi car, prime minister modi car, range rover, bmw 7 series, Hindustan motors, ambassador, indira gandhi car, manmohan singh car, narendra modi car, narendra modi bmw car, प्रधानमंत्री गाडी, नरेंद्र मोदींची गाडी, इंदिरा गांधींची गाडी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर
(Source – Amar Ujala)

जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यू नंतरच्या काही काळात त्यांच्या कन्या इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान झाल्या. त्यांनी रायबरेली येथुन निवडणूक लढवली होती. इंदिरा गांधी या आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सतत चर्चेत असायच्या. इंदिरा गांधींना लोक त्यांनी जाहीर केलेल्या आणीबाणी, बांग्लादेश युध्द अश्या धाडसी निर्णयांमुळे आयर्न लेडी असे देखील म्हणत असत. अशा या मुत्सद्दी पंतप्रधान प्रवास मात्र अँबॅसिडर सेडाननेच करायच्या. त्यांच्या मनात आल्या नंतर त्या कधी कधी बग्गी मधुन सुध्दा दिल्ली फिरायच्या. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि दूर्दैव हे की त्यांच्या नंतर अजुन पर्यंत एकही महिला पंतप्रधान भारताला मिळाल्या नाहीत.

2) पी. व्ही. नरसिंह राव

prime minister of india, prime minister car india, president of india car number plate, narendra modi car, prime minister modi car, range rover, bmw 7 series, Hindustan motors, ambassador, indira gandhi car, manmohan singh car, narendra modi car, narendra modi bmw car, प्रधानमंत्री गाडी, नरेंद्र मोदींची गाडी, इंदिरा गांधींची गाडी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर
PV Narasimha Rao (Source – IndiaToday)

पी. व्ही. नरसिंह राव हे त्या काळचे मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांचा कार्यकाळ फारसा चर्चेत राहिला नाही पण त्यांच्या काळात झालेलं बाबरी प्रकरण भयंकर गाजलं. त्यांनी केलेला मंडल आयोग व इत्यादी योजना चर्चेच्या विषय ठरल्या. त्यांच्या काळात देश समाजवाद व आर्थिक पुंजीवाद यांच्या मार्गावर चालत होता. असे असून सुध्दा नरसिंहरावांसारखे मुत्सद्दी राजकारणी कुठेही जाण्यासाठी त्याकाळची दनकट अँबॅसिडर सेडानचाच वापर करत असत. त्यांचा सदरा, धोतर व शाल असा साधा पोशाख असायचा.

3) एच.डी. देवगौडा

prime minister of india, prime minister car india, president of india car number plate, narendra modi car, prime minister modi car, range rover, bmw 7 series, Hindustan motors, ambassador, indira gandhi car, manmohan singh car, narendra modi car, narendra modi bmw car, प्रधानमंत्री गाडी, नरेंद्र मोदींची गाडी, इंदिरा गांधींची गाडी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर
H D Deve gowda (Source – Amar Ujala)

देवगौडा हे 1996 ते 1997 या दरम्यान भारताचे पंतप्रधान होते. यांचा कार्यकाळ हा खुपच कमी होता. त्यामुळे ते विशेष असं काम करू शकले नाहीत. पण त्यांनी पंतप्रधानांच्या निवासामध्ये बऱ्याच सुधारणा करवून आणल्या. त्यांनी पंतप्रधान भवनाच्या डागडूजीवर भर दिला. पण त्यांनी वाहनांच्या रचनेत काहीच बदल केले नाहीत. ते सुध्दा इतर पंतप्रधानांप्रमाणे अँबॅसिडरचाच वापर करत असतं.

4) इंद्रकुमार गुजराल

prime minister of india, prime minister car india, president of india car number plate, narendra modi car, prime minister modi car, range rover, bmw 7 series, Hindustan motors, ambassador, indira gandhi car, manmohan singh car, narendra modi car, narendra modi bmw car, प्रधानमंत्री गाडी, नरेंद्र मोदींची गाडी, इंदिरा गांधींची गाडी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर
IK Gujral (Source – India Today)

इंद्रकुमार गुजरात यांनी नरसिंहरावांच्या पदउतारा नंतर कार्यकाळ सांभाळला. ते सुध्दा सर्वात कमी कार्यकाळ असलेले पंतप्रधान होते. त्यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार फक्त 2 वर्षे सांभाळला. ते नरसिंहराव वापरत असलेल्या पांढर्या ॲबेसिटरचाच उपयोग करत होते.

5) अटल बिहारी वाजपेयी

prime minister of india, prime minister car india, president of india car number plate, narendra modi car, prime minister modi car, range rover, bmw 7 series, Hindustan motors, ambassador, indira gandhi car, manmohan singh car, narendra modi car, narendra modi bmw car, प्रधानमंत्री गाडी, नरेंद्र मोदींची गाडी, इंदिरा गांधींची गाडी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर
Atal Bihari Vajpayee’s first car (Source – Patrika)

वाजपेयी सरकार आल्यानंतर देशातील व्यवस्थेमध्ये खुप बदल झाले. त्यांच्या काळातील सुधारणांची दखल घेऊन मागच्या वर्षी त्यांना भारताच्या सर्वोच्च अशा समजल्या जाणाऱ्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. वाजपेयी यांच्या आधीचे सर्व पंतप्रधान हिंदुस्तान मोटर्सच्या अँबॅसिडर सेडानचा वापर करत होते. पण अटलबिहारी वाजपेयी यांनी ही परंपरा मोडून सुसज्ज अशा BMW सिरीजच्या बुलेटप्रुफ गाड्यांचा वापर करण्यास सुरूवात केली. त्यांच्या ताफ्यात BMWi5 व BMWi7 या गाड्यांच्या बरोबरच त्यांच्या सुरक्षिततेसाठी पुर्णपणे रेडिओ फ्रिकवेन्सीने सज्ज अशा गाड्या सुध्दा होत्या.

prime minister of india, prime minister car india, president of india car number plate, narendra modi car, prime minister modi car, range rover, bmw 7 series, Hindustan motors, ambassador, indira gandhi car, manmohan singh car, narendra modi car, narendra modi bmw car, प्रधानमंत्री गाडी, नरेंद्र मोदींची गाडी, इंदिरा गांधींची गाडी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर
(Source – ekbiharisabparbhari.com)

वाजपेयींनी अँबॅसिडरचा त्याग करण्यामागे कारण होते. एकदा झालं असं कि वाजपेयींच्या अँबॅसिडरचे मागचे दोन्ही दरवाजे लॉक होऊन वाजपेयी आत अडकले होते. नंतर मग मोठ्या कसरतीने सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांना पुढच्या ड्रायवरच्या सीट जवळच्या दरवाज्याने बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे वाचपेयींची एक महत्वाची बैठक चुकली आणि वेळेचा अपव्यय त्यांना मान्य नव्हता. म्हणुन त्यांनी जुन्या झालेल्या अँबॅसिडर गाडीला राम राम करत नविन व अत्याधुनीक BMW गाड्यांचा आधार घेतला.

6) मनमोहन सिंग

prime minister of india, prime minister car india, president of india car number plate, narendra modi car, prime minister modi car, range rover, bmw 7 series, Hindustan motors, ambassador, indira gandhi car, manmohan singh car, narendra modi car, narendra modi bmw car, प्रधानमंत्री गाडी, नरेंद्र मोदींची गाडी, इंदिरा गांधींची गाडी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर
PM Manmohan Singh’s Car (Source – archivepmo.nic.in)

मनमोहनसिंग हे कॉंग्रेस सह आघाडी सरकारचे पंतप्रधान होते. ते एक मुस्सद्दी राजकारणी असण्यासोबतच एक उत्तम अर्थतज्ञ सुध्दा आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात जागतिकीकरणात भारताचा सहभाग नोंदवला व भारताच्या अर्थकारणाला एक नवा आयाम दिला. त्यांनी स्वीकारलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेने भारताच्या जडणघडनीत मोठ्ठा हातभार लावला आणि जगातील इतर देशातील व्यावसायिकांनी भारतामध्ये गुंतवणुकीला पसंती दर्शवली. मनमोहन सिंग यांच्या ताफ्यामध्ये BMW 5X SUV, BMW7, BMWi7 ह्या व इतर गाड्या होत्या. त्याचबरोबर रेडिओ फ्रिकवेन्सीने सज्ज टाटा सफारी सोबत एक मर्सिडीज स्प्रिंटर ॲब्युलन्सचा सुध्दा सामावेश आहे.

7) नरेंद्र मोदी

prime minister of india, prime minister car india, president of india car number plate, narendra modi car, prime minister modi car, range rover, bmw 7 series, Hindustan motors, ambassador, indira gandhi car, manmohan singh car, narendra modi car, narendra modi bmw car, प्रधानमंत्री गाडी, नरेंद्र मोदींची गाडी, इंदिरा गांधींची गाडी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर
(Source – DefenceLover)

नरेंद्र मोदी जेव्हा 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झाले त्यावेळी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यववस्थेमध्ये काही अमुलाग्र बदल करण्यात आले. पंतप्रधान मोदी सध्या BMW 760Li ह्या सिरीजची बुलेटप्रुफ गाडी वापरतात. जी त्यांना 44 मैग्नम व Ak47 रायफलच्या हल्यापासुन वाचवू शकते. या शिवाय त्यांच्या गाडीत अत्याधुनीक प्रणाली आहे जी त्यांना बॉम्ब हल्ल्यापासुन व मिसाईल हल्ल्यापासुन सुध्दा वाचवू शकते. त्याचबरोबर अत्याधुनीक शस्त्रसज्ज अंगरक्षक सुध्दा त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. त्यांच्या गाडीत गॅस हल्ल्यात वाचण्यासाठी ऑक्सिजनची सुध्दा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here