कौतुकास्पद ! JNU च्या सुरक्षारक्षकाने त्याच विद्यापीठात मिळवला प्रवेश

1136
rajmal meena, jnu guard, Russian honors, delhi, talent, जेएनयू, राजमल मीना, रशियन ऑनर्स

कुठलेही ध्येय असाध्य नसते. एखादे ध्येय साध्य करण्याची मनात तीव्र इच्छा असेल तर ते साध्य होतेच हे दाखवून दिले आहे राजस्थानच्या ३४ वर्षीय युवकाने. राजमल मीना असे ह्या युवकाचे नाव आहे. २०१४ साली राजमल सुरक्षा रक्षक म्हणून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रुजू झाला. सुरक्षा रक्षक म्हणून काम करतानाच त्याला ह्या विद्यापीठात शिकण्याची इच्छा जागृत झाली. पूर्वीपासूनच शिक्षणाची आवड असलेल्या राजमलला आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपले गाव सोडून जेएनयूमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून रुजू व्हावे लागले पण ह्यामुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

राजमल मीना नुकताच जेएनयूची प्रवेश परीक्षा पास झाला. त्याने आपल्या पुढील शिक्षणासाठी बीए, रशियन ऑनर्स ह्या अभ्यासक्रमाची निवड केली. परदेशी भाषा निवडल्यास पुढील शिक्षणासाठी परदेशात जायची संधी मिळते. त्यामुळे हा अभ्यासक्रम निवडल्याचे तो सांगतो. राजमल मीना हा विवाहित आहे. त्याला तीन मुली आहेत.

rajmal meena, jnu guard, Russian honors, delhi, talent, जेएनयू, राजमल मीना, रशियन ऑनर्स

राजस्थान ओपन युनिव्हर्सिटीतून राजमलने ह्यापूर्वीच पॉलिटिकल सायन्स, हिंदी आणि इतिहास ह्या विषयातून आपली पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. घरची परिस्थिती बेताची होती. वडील रोजंदारीवर कामाला होते व आपल्या गावापासून कॉलेज ३० किमी अंतरावर होते. ह्या परिस्थितीत शिक्षण घेणे कठीण होते पण मुळातच शिक्षणाची आवड असलेल्या राजमल मीनाने हार मानली नाही.

जेएनयूत प्रवेश मिळवण्यासाठी त्याला जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनीही मदत केली. विद्यार्थी त्याला पीडीएफ नोट्स पुरवत असत आणि तो जमेल तसा अभ्यास करत असे. त्यासाठी त्याने आपल्या मोबाईलचा चांगला उपयोग केला. प्रवेश परीक्षेचा अभ्यास करतांना तो मोबाईल मधील विविध न्यूज ऍप्सवर न्यूज वाचत असे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here