अनेकांनी आज पर्यंत आपल्या जन्मदाती आईचे ऋण फेडण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला, काही लोक आईच्या कष्टाची चीझ म्हणून तिला सुखी करण्यासाठी भरपुर कष्ट घेतात. तिला आनंद मिळावा, समाधानी आयुष्य मिळावं म्हणून झटतात, तिच्यावर कविता करतात शब्दफुलांनी तिची पूजा करतात. अश्या माय-लेकरांच्या अनेक हृदयस्पर्शी गोष्टी आपण ऐकत-वाचत असतो. अशीच एक घटना काल घडली आणि सोशल मीडियावर खळबळ झाली. सर्वांनी ह्या लेकराचे भरभरून कौतुक केले ३२,००० पेक्षा जास्त लाईक आणि ४००० पेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
ही पोस्ट म्हणजे आहे एका मुलाने आपल्या आईला लिहिलेले हृदयद्रावक पत्र ज्याचा विषय होता, “आई दुसऱ्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.”
केरळ मधील कोल्लूर गावी गोकुळ श्रीधर या मुलाने आपल्या आईला तिच्या दुसऱ्या लग्नाप्रित्यर्थ एक पत्र लिहिले. त्या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की, गोकुळच्या आईने पहिल्या नवऱ्या कडून म्हणजे त्याच्या वडिलांकडून खूप छळ सहन केला. कौटुंबिक अत्याचाराच्या अनेक घटना तिच्या बाबतीत घडताना त्याने बघितल्या, त्याने लहानपणी तिला हे सगळं सहन करताना बघितले आहे. त्यामुळे तिने दुसरे लग्न केले, ह्याचे त्याला समाधान वाटते आणि आता परत कोणतेही दुःख आईच्या वाट्याला येऊ नये अशी तो प्रार्थना करतो.
ह्या पत्रा बरोबर त्याने सुंदरसा फोटोही पोस्ट केला आहे, हे पत्र सोशल मीडिया वर पोस्ट करावे की नाही ह्या द्विधा मनस्थितीत त्याने पत्र पोस्ट केले आणि नेटकर्यांनी ते अक्षरशः उचलून धरले. सर्वांनीच त्याचे कौतुक केले त्याचे प्रगल्भ विचार पाहता सर्वांनाच धडा घेण्यासारखे आहे. त्यानी आईला मल्याळी मध्ये लिहिलेल्या पत्राचे भाषांतर मराठीत असे करता येईल.
गोकुळ म्हणतो,
“या महिलेने केवळ माझ्या करीता स्वतःचा आनंद आणि सारे सुख बाजूला ठेवले. पहिल्या पतीकडून कितीतरी हाल, यातना तिने सहन केलेल्या आहेत. तिला अनेकदा मारहाण सुद्धा व्हायची, डोक्यातून रक्त येत असे. प्रत्येकवेळी ‘तू हे का सहन करते’, हे मी तिला विचारायचो. त्यावर प्रत्येकवेळी “मी हे सगळे तुझ्या भल्यासाठी सहन करत आहे” असे ती सांगायची. एके दिवशी मी तिच्या बरोबर घर सोडलं, तेव्हा मी या सर्व क्षणांचा विचार केला. तिने तिचे संपूर्ण तरुण आयुष्य माझ्यासाठी घालवले. या माझ्या आईची अनेक स्वप्ने आहेत. तिला अजून खूप मोठी उंची गाठायची आहे. मला अजून काय बोलावे हे सुचत नाही आहे. ही गोष्ट लपवून चालणार नाही, असे मला सारखे वाटत होते. आई, तुला वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !”