तब्बल २ वर्षे आणि दोन महिने चालू असलेल्या सुनावणीच्या आज निकाल अखेर लागला आहे. सकाळपासूनच जगभरातील भारतीयांच्या हेग येथील आससीजे च्या निकालाकडे नजर लागली होती आणि अखेर त्याची घोषणा झाली आहे. भारताने बाजी मारत पुन्हा एकदा पाकिस्तानला चारी मुंड्या चिट केले आहे. आंतराराष्ट्रीय कोर्टाने भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव याना सुनावलेली फाशीची शिक्षा योग्य नसल्याचे सांगत फाशीला स्थगिती दिली आहे.
कोर्टाचं मत काय ?
हेरगिरीच्या आरोपांखाली पाकिस्तानने भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव याना फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर भारताने आक्षेप घेतल्यानंतर तब्बल २ वर्षे २ महिन्यापासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) मध्ये या प्रकरणावर सुनावणी चालू होती. आयसीजेने म्हटले आहे की, पाकिस्तानने कुलभूषण जाधव याना काऊन्सेलर अॅक्सिस न देता परस्पर फाशीची शिक्षा दिली आहे, त्यामुळे या फाशीचा पुनर्विचार करावा आणि याचा पुरविचार होत नाही तोपर्यंत हि फाशी स्थगित केली आहे. ह्या प्रकरणचा निकाल तब्बल १५-१ च्या फरकाने भारताच्या बाजूने लागला आहे.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलात अधिकारी होते. तसेच मुंबईचे माजी सहायक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पूत्र सुद्धा आहेत. भारतीय नौदलात १४ वर्ष सेवा केल्यानंतर ४८ वर्षीय कुलभूषण जाधव यांनी २००३ मध्ये निवृत्ती स्वीकारली आणि इराणमधून आयात- निर्यातचा व्यवसाय सुरु केला होता. घरी खाकीचे वातावरण असल्याने साहजिकच त्यांचा ओढा डिफेन्स कडे होता. जाधव यांनी १९८७ मध्ये एनडीएत प्रवेश करून १९९१ मध्ये ते भारतीय नौदलाच्या अभियांत्रिकी शाखेत सामील झाले.
काय आहे प्रकरण ?
भारतीय नौदलात १४ वर्ष सेवा केल्यानंतर ४८ वर्षीय कुलभूषण जाधव यांनी २००३ मध्ये निवृत्ती स्वीकारली आणि इराणमधून आयात- निर्यातचा व्यवसाय सुरु केला होता. यावेळी इराणमार्गे प्रवेश करत पाकिस्तानमध्ये हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली पाकमधील यंत्रणांनी त्यांना अटक केली होती.
कुलभूषवून याना अटक केल्यानंतर लगेच ते रॉ साठी काम करत असल्याच्या कबुलीचा एक विडिओ पाकमधील सुरक्षा यंत्रणांनी प्रसारित केला तसेच त्यांनी पाकमध्ये एजेंट निर्माण केल्याचा आरोप केला.
पाकिस्तानच्या मते कुलभूषण जाधव हे भारताच्या रॉ साठी काम करत असून पाक मध्ये हेरगिरी करत होते तर भारताने ते निवृत्त झाले असून त्यांच्याशी भारत सरकारचा संबंध नसल्याचे मत नोंदवले होते. त्यानंतर भारताने जाधव यांचे अपहरण करून अटक बनाव केल्याचा आरोपही पाकवर केला आहे.
यानंतर भारताने तात्काळ काऊन्सेलर अॅक्सिस देण्याची मागणी केली होती, पण पाकिस्तानने काऊन्सेलर अॅक्सिस सोबतच भेट घेण्यास मज्जाव केला आणि ‘फील्ड जनरल कोर्ट मार्शल’मध्ये कुलभूषण यांच्यावर खटला चालवून दोषी ठरवले. यानंतर पाकमधील लष्करी न्यायालयाने त्यांना फाशी सुनावली.
यानंतर भारताने लगेच हेग मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानला ओढले, यावेळी न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले होते आणि ३ दिवसाच्या युक्तिवादानंतर आंतरराष्ट्रीय न्यायलयाने फाशीला स्थगिती दिली होती.
तब्बल २ वर्षे २ महिन्यापासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) मध्ये या प्रकरणावर सुनावणी चालू होती. आयसीजेने म्हटले आहे की, पाकिस्तानने कुलभूषण जाधव याना काऊन्सेलर अॅक्सिस न देता परस्पर फाशीची शिक्षा दिली आहे, त्यामुळे या फाशीचा पुनर्विचार करावा आणि याचा पुरविचार होत नाही तोपर्यंत हि फाशी स्थगित केली आहे. ह्या प्रकरणचा निकाल तब्बल १५-१ च्या फरकाने भारताच्या बाजूने लागला आहे.