भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्त झालेलं मराठमोळं व्यक्तिमत्व कोण ?

1251
Lieutenant General, Manoj Mukund Naravane, vice army chief, indian army, pune, मुकुंद नरवणे, marathi vice army chief, मराठी लष्करप्रमुख

समस्त महाराष्ट्राला व मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक बातमी आमच्या हाती आली आहे. विद्यमान लष्कर उपप्रमुख देवराज अंबु हे पुढील महिन्यात म्हणजेच ३१ ऑगस्टला निवृत्त होत आहेत आणि त्यांची जागा घेणार आहे एक मराठी व्यक्ती. ३७ वर्षांपासून भारत मातेची सेवा बजावणारे ईस्टर्न आर्मी कमांडर, लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे ह्यांची भारतीय सैन्याचे पुढील लष्कर उपप्रमुख म्हणून नियुक्ती होणार आहे.

मनोज नरवणे ह्यांनी इन्फन्ट्री ब्रिगेडचेही नेतृत्व केलेले आहे. काश्मीरमध्ये होणारी घुसखोरी मोठ्या प्रमाणामध्ये घटली आहे. अनेक घुसखोरांना लष्कराने ठार केले आहे व ह्यात मनोज नरवणे ह्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. मनोज मुकुंद नरवणे ह्यांची लष्कर उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात येणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांच्या जागी लेफ्ट. जनरल अनिल चौहान ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकव्यात काश्मीरच्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनिल चौहान ह्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती.

 Lieutenant General, Manoj Mukund Naravane, vice army chief, indian army, pune, मुकुंद नरवणे, marathi vice army chief, मराठी लष्करप्रमुख
Lieutenant General Manoj Mukund Naravane (Source – Twitter)

मूळचे पुणेकर असणारे मनोज मुकुंद नरवणे हे एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आपले त्यापुढील प्रशिक्षण देहरादून येथील मिलिटरी अकादमीमध्ये पूर्ण केले आहे. १९८० मध्ये सैन्यात रुजू झालेले मनोज नरवणे ह्यांनी त्यानंतर आसाम रायफल्सचे महानिरीक्षक, जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स प्रमुख, म्यानमारमध्ये भारतीय डिफेन्स अटेची (defence attache) अश्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत हे ह्याच वर्षी डिसेम्बरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी मनोज नरवणे ह्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत उत्तरेतील कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह ह्यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here