महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनी तरुणांमध्ये आजही तेवढाच प्रसिद्ध आहे जेवढा सुरुवातीच्या काळामध्ये होता. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीच्या प्रसिद्धीमध्ये खूपच जास्त प्रमाणात भर पडली. सर्वांनाच माहिती आहे की धोनी भारतातीलच नव्हे तर जगातील दर्जेदार क्रिकेटपटूंपैकी एक आहे. धोनीने आपल्या करिअरची सुरुवात एका लहानशा गावातुन सुरू केली होती. धोनी त्याच्या साधेपणामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या याच स्वभावामुळे त्याने करोडो लोकांच्या मनामध्ये जागा तयार करण्यात यश प्राप्त केलेले आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत धोनीचे तुम्ही कधीही न ऐकलेले किस्से….
1) टीम इंडियासाठी खेळण्यागोदर धोनी पहिल्यांदा सचिन तेंडुलकरशी दुलीप ट्रॉफी दरम्यान भेटला होता. सचिन अपोझिशन टीम मध्ये खेळत होता आणि या मॅच मध्ये धोनीला पाणी आणण्याची जबाबदारी होती. जेव्हा धोनी त्याच्या संघासाठी पाणी घेऊन मैदानात गेला. त्यावेळी सचिनने अत्यंत नम्रतेने त्याच्याकडे पाण्यासाठी विचारणा केली आणि धोनीनेही कसलाही विचार न करतात पाणी दिले.

2) जेव्हा धोनी इंडिया A टीमसाठी खेळत असे, तेव्हा त्याच्यासोबत आकाश चोपडा हा खेळाडू सुद्धा खेळत होता. तेव्हा आकाश चोपडाने धोनीला सल्ला दिला होता की, “तुला जर भारतीय क्रिकेट संघाकडून खेळायचे असेल तर तू तुझे मोठे केस कमी कर आणि त्यावर धोनीने मिश्कीलपणे म्हटले की, “काय माहिती भविष्यात मी भारतीय क्रिकेट संघासाठी खेळेलही आणि माझी ही केसांची स्टाईल बघून तरुणही अशीच केशभूषा ठेवतील.” आणि इतिहास तर आपणा सर्वांना माहीतीच आहे.
3) धोनीने आपले पहिले शतक पाकिस्तान विरुद्ध खेळताना बनवीले होते. त्यावेळेस त्याने 128 बोलमध्ये 148 धावांची खेळी केली होती. हा एक विश्व रेकॉर्ड होता कारण तोपर्यंत कुठल्याही भारतीय खेळाडूने पहिल्याच शतकावेळी 148 धावा केलेल्या नव्हत्या.
4) ज्या सामन्यामध्ये धोनीने शतक पूर्ण केले त्या सामन्यामध्ये त्याला नंबर 3 वर खेळवण्याचा निर्णय सौरव गांगुलीचा होता. त्याला माहिती होतं की धोनी मध्ये भरपूर बॅटिंग स्किल आहे पण त्याला योग्य संधी मिळालेली नाही.

5) धोनीने एका मुलाखतीदरम्यान असे सांगितले की, “त्याला असे कधीच वाटले नव्हते कि तो भारतीय संघासाठी क्रिकेट खेळेल, त्याला असेच वाटायचं की एक राज्यस्तरीय क्रिकेटपटू म्हणूनच त्याचे करिअर संपले असते आणि तो एवढ्यावरही खुश राहिला असता.
6) आपण सर्वांनीच बघितले आहे 2011 च्या वर्ल्ड कप अंतिम सामन्यादरम्यान जेव्हा विराट कोहलीची विकेट गेली तेव्हा युवराज सिंग याने खेळण्यासाठी येणे अपेक्षित होते. पण असे काही झाले नाही कारण विराट कोहलीच्या विकेट नंतर स्वतः धोनी फलंदाजी करण्यासाठी आला होता. याबद्दल धोनीला मुलाखतीदरम्यान विचारले असता धोनीने असे सांगितले की जेव्हा विराटची विकेट गेली तेव्हा मुथय्या मुरलिधरण गोलंदाजी करत होता आणि धोनीने आयपीएल मध्ये मुथ्थय्या सोबत अनेक सामने खेळले होते त्यामुळेच धोनी युवराजच्या आधी खेळण्यासाठी मैदानावर आला.
7) 2007 चा t20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यांमध्ये पाणी आले होते. अगदी धोनीच्याही पण कुठलाही फोटोग्राफर धोनीच्या डोळ्यातील ते अश्रू कॅप्चर करू शकला नाही.

8) धोनीला जेव्हा मुलगी झाली तेव्हा तो त्याच्या कुटुंबासोबत थांबू शकला नाही कारण त्यावेळी विश्वचषकाची तयारी चालू होती आणि धोनीला कुटुंबापेक्षा संघाला वेळ देणे अधिक महत्त्वाचे वाटले.
9) जेव्हा धोनीला मुलगी झाली तेव्हा त्याच्या पत्नीला हि बातमी स्वतः धोनीला द्यायची होती पण सरावादरम्यान धोनी स्वतःचा मोबाईल जवळ बाळगत नसल्यामुळे तिने ही बातमी सुरेश रैनाला दिली आणि सुरेश रैनाने ती बातमी धोनीला सांगितली.
10) धोनी नेहमीच अनेक संस्थांना आर्थिक मदत करत असतो पण त्यातून तो कधीच प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न करत नाही कारण त्याचे म्हणणे आहे की अशा गोष्टीतून प्रसिद्धी कधीही मिळवू नये.
11) आपण सगळ्यांनी धोनी द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा बघितला असेल त्यामध्ये जो मित्र धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवतो त्या मित्राबद्दल प्रत्येकाला माहिती आहेच. जेव्हा तो मित्र आजारी होता तेव्हा धोनीने त्याच्या उपचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती, अगदी त्याच्या उपचाराकरिता धोनीने हेलिकॉप्टरही देऊ केले होते. मित्रांसाठी धोनी नेहमीच शक्य तेवढी मदत करायला तयार असतो.
12) भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळताना धोनीला सुरुवातीला अनेक अनुभव आले. त्याचीही सुरुवातीला चेष्टा करण्यात आली पण धोनीने त्या गोष्टी मनावर न घेता खेळण्यावर लक्ष केंद्रित केले आणि आज धोनी भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
