“वयाच्या 27 व्या वर्षीच फ्रान्समधील सैन्याचे प्रमुख पद बहाल करण्यात आलेला तो एकमेव व्यक्ती असावा”
आपण आजपर्यंत अनेक महावीर योद्ध्यांबद्दल ऐकले असेल, ज्यांनी अनेक मोठी युद्धे जिंकली, महापराक्रम गाजवला. आजही इतिहासातून आपण त्या महायुद्धांबद्दल जाणून घेतो आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.
भारतात असे अनेक धुरंदर योद्धे होऊन गेलेले आहेत पण आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वश्रेष्ठ सेनापती नेपोलियन बोनापार्ट बद्दल. नेपोलियनने त्याच्या आयुष्यामध्ये अनेक लढाया लढल्या आणि त्यातील जास्तीत जास्त लढाया जिंकल्या सुद्धा. त्याचे युद्ध कौशल्य फार उत्तम होते. नेपोलियन बोनापार्ट हा एक मिलिटरी लिडर होता. त्याचा जन्म 15 ऑगस्ट 1769 ला अजॅक्स या फ्रान्समधील शहरामध्ये झाला होता.
कसा घडला नेपोलियन
अजॅक्स हे शहर आधी फ्रान्सच्या ताब्यामध्ये नव्हता. नेपोलीयनच्या जन्माच्या एक वर्ष आधी फ्रान्सने हा भाग इटली कडुन मिळवला होता. नेपोलियन यांच्या वडिलांचे नाव कार्लो बोनापार्ट असे होते. ते व्यवसायाने वकील होते. त्यांच्या आईचे नाव रोमानिया बोनापार्ट होते. नेपोलियन यांची आई इटालियन होती त्यामुळे कदाचित त्यांची बोलण्याची भाषा लोकांना इटालियन वाटत असे.
नेपोलियन यांचे पूर्ण शिक्षण हे फ्रान्समध्ये झाले होते, येथेच त्यांनी फ्रेंच भाषा बोलायला सुरूवात केली पण ते इटालियन पद्धतीने फ्रेंच बोलत असल्यामुळे त्यांचे मित्र त्यांची नेहमी चेष्टा करत असत. पण शिक्षण पूर्ण करेपर्यंत त्यांनी फ्रेंच भाषा बोलण्यामध्ये भल्याभल्यांनाही मागे टाकले होते. त्यांनी 1785 ला फ्रान्समधील मिलिटरी ऍकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतले. येथूनच त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला सुरुवात झाली. शिक्षणानंतर त्यांनी आपले सर्वस्व सैन्याला अर्पण केले.
सैन्यामध्ये त्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. ईथेच त्यांनी युद्धनीती कशी आखायची याचे शिक्षण घेतले. नेपोलियन यांचे कौशल्य बघून तिथल्या लिडरने त्यांना फ्रान्समधील अंतर्गत सैन्याचं प्रमुख पद बहाल केले. याच दरम्यान 9 मार्च 1796 रोजी नेपोलियनने जोसीफी सोबत लग्न केले पण तिच्यापासून त्यांना अपत्य होत नसल्यामुळे त्यांनी परत ऑस्ट्रियाचे सम्राट यांच्या मुलीशी लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा झाला.
नेपोलियनचे युद्धकौशल्य
नेपोलियन फ्रान्सचा अत्यंत कमी वयामध्ये सर्वात जास्त लढाया जिंकणारा एक अजारामर योद्धा म्हणून इतिहासाला माहिती आहे. नेपोलियन यांनी आपल्या युद्ध कौशल्याच्या जोरावर अनेक लढाया जिंकल्या होत्या. वयाच्या 27 व्या वर्षीच त्यांना फ्रान्समधील सैन्याचे प्रमुख पद बहाल करण्यात आले होते. त्यानंतर लगेच नेपोलियनने सेन्टेन्स या भागावरती हल्ला चढवत तो भाग पूर्णपणे फ्रान्सच्या अधिपत्याखाली आणला.
त्यानंतर त्याने अनेक लहान-मोठ्या राज्यांवर आक्रमण करत त्यांना फ्रान्समध्ये विलीन होण्यासाठी संधी दिली. नेपोलियन एकदा त्याच्या बोटीमधून फिरत असताना त्याची बोट रस्ता चुकली आणि तो एका बेटावरती जाऊन बसला. त्या बेटावरती त्यावेळी नेपोलियन शिवाय दुसरं कोणीही नव्हते,
तेव्हा नेपोलियनने शब्द उच्चारले की, “जीथपर्यंत दृष्टी जाईल तीथपर्यंत येथे माझेच साम्राज्य आहे दुसऱ्या कोणाचेही नाही.”
त्याच्या अनेक यशस्वी मोहीमांनंतर फ्रान्सने नेपोलियनवरती इंग्लंड जिंकण्याची जबाबदारी दिली. पण नेपोलियन इंग्लिश खाडी पार न करू शकल्यामुळे त्याला हार पत्करावी लागली. त्यामुळे त्याने असा विचार केला की आपण एशिया मधील ब्रिटिश राज्यांवरती हल्ला करून ती राज्य फ्रांसमध्ये विलीन करायला हवीत. मग त्याने इतर काही ठिकाणी हल्ले करत फ्रान्सचा विस्तार करण्यास सुरुवात केली. त्याच्या सैन्यामध्ये 35000 प्रशिक्षित सैनिक होते. नेपोलियन भारताकडे येणारच होता पण तेथील ब्रिटिश आर्मीने त्याला पराभूत केल्यामुळे त्याला भारताकडे येण्याची संधी मिळाली नाही.
आणि नेपोलियन फ्रान्सचा राजा झाला
नेपोलियनने एका ठिकाणी लिहून ठेवले आहे की, “जर मला ईंग्लीश खाडी पार करता आली, तर मी इंग्लंडला या जगाच्या नकाशावरून नेस्तनाबूत करून टाकेल,” नेपोलियनने तसे केलेही असते. 1804 मध्ये जेव्हा तो बाहेरील देशांमध्ये प्रवास करत होता, तेव्हा पॅरिसमधील सरकार डळमळीत झाले. मग, नेपोलियनने परत पॅरिसमध्ये येत तेथील सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या. फ्रान्सच्या जनतेनेही नेपोलियनचा स्वीकार केला आणि मग नेपोलीयनने स्वतःला फ्रान्सचा राजा म्हणून घोषित केले.
नेपोलियन जेव्हा राजा झाला त्यावेळी फ्रान्सच्या विकासाला गती मिळाली असे म्हटले जाते. त्यांनी रस्ते शाळा आणि इतरही अनेक आवश्यक गोष्टींवरती भरपूर खर्च केला आणि इतर अनावश्यक गोष्टींवरती त्याने कर वाढवला. त्याच्या अधिपत्याखाली चाललेल्या फ्रान्समध्ये सर्व जनता खुश असे. नेपोलियनने अर्ध्यापेक्षा जास्त युरोप वरती कब्जा केलेला होता.
नेपोलियनने 1812 रोजी रशियावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आणि हीच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चुक मानली जाते.
नेपोलियन या वेळी पाच लाख 12 हजार प्रशिक्षित सैन्य घेऊन रशियावर हल्ला करण्यासाठी निघाला होता, पण रशियाच्या जवळ आल्यावर तेथील थंडी मुळे त्याचे अनेक अधिकारी आणि अनेक सैनीक मारले गेले.
तरीही त्यानंतर झालेल्या भयानक युद्धामध्ये नेपोलियन बोनापार्टने विजय प्राप्त केला आणि जेव्हा त्याने रशियाची राजधानी मॉस्को मध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की येथील सर्व खाद्य भांडार आणि इतर आवश्यक गोष्टी जाळून टाकण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या सैन्याला भुकमरीचा सामना करावा लागला. सैन्याचे मनोधैर्य हळू हळू खचत चालले होते. त्यामुळे नेपोलियनने परत फ्रान्सला जाण्याचा निर्णय घेतला पण तोपर्यंत परत थंडी आली होती. या थंडी मध्ये त्याला परत रशियामध्ये थांबावे लागले.
वॉटरलूचे युद्ध
नेपोलियन जेव्हा परत फ्रान्समध्ये पोहोचला त्यावेळी फक्त एक लाख सैनिक जिवंत फ्रान्समध्ये पोहोचू शकले. फ्रान्समध्ये पोहोचला त्यावेळी त्याच्या लक्षात आले की त्याचे सरकार खूपच कमकुवत झाले आहे आणि शेजारील शत्रू मात्र फारच कणखर झालेले आहे. युरोप मधील सर्व राज्य नेपोलियनच्या विरुद्ध उठाव करून तयार होती. कारण त्यांना माहिती होतं कि ते एकटे कधीच नेपोलियनला हरवू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी एकत्रपणे उठाव केला होता. 1815 रोजी युरोपमध्ये वॉटरलूचे युद्ध झाले. या युद्धामध्ये नेपोलियनचा पराभव झाला. त्यानंतर सहा वर्षांनी नेपोलियनचा मृत्यू झाला त्यावेळी तो कारागृहात होता आणि अशा प्रकारे एक महान योद्धा परत आपल्यासाठी एक इतिहास बनवून निघून गेला.