‘वाघ आल्यास भाल्याने मारा’, बेअर ग्रिल्सच्या या वाक्यावर मोदींच उत्तर बघितलं का ?

1370
pm modi, bear grylls, man vs wild, discovery channel, narendra modi

मॅन व्हर्सेस वाइल्ड हि डिस्कव्हरी चॅनेलवरील गाजलेली मालिका. ह्यातील बिअर ग्रेल्स नावाचा माणूस जगातील वेगवेगळ्या प्रदेशात, जंगलात जाऊन तिथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिवंत कसे राहावे, त्यासाठी काय करायला पाहिजे ह्याचे प्रात्यक्षिक दाखवतो. आता हाच बिअर ग्रिल्स पोहोचला आहे आपल्या भारतामध्ये व इथे त्याला सोबत केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी. हे दोघे तुम्हाला जंगलात सर्वाइव्ह कसे करायचे ह्याबद्दल चार युक्तीच्या गोष्टी सांगणार आहेत.

मॅन व्हर्सेस वाईल्डचा हा भाग १२ ऑगस्ट रोजी प्रसारित होणार असून ह्या भागाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. १२ ऑगस्टला प्रसारित होणाऱ्या ह्या भागाची काही मिनिटांची क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. मोदी व बिअर ग्रेल्स ह्या दोघांच्याही चाहत्यांना ह्या दोघांना एकत्र बघण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. बिअर ग्रिल्सने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून १२ ऑगस्ट रोजी प्रसारित केल्या जाणाऱ्या ह्या भागाची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.

pm modi, bear grylls, man vs wild, discovery channel, narendra modi
(Source – The Week)

ह्यात नरेंद्र मोदी व बिअर ग्रेल्स गप्पा मारतांना दिसत आहेत. नरेंद्र मोदी तरुणपणी काही काळ हिमालयात वास्तव्यास होते. त्यावेळेसचे आपले अनुभव ते बिअर ग्रिल्सला सांगताना ह्या क्लीपमध्ये दिसत आहेत. ह्यावेळी बिअरने एक भाला नरेंद्र मोदींना दिला व वाघ आला तर ह्या भाल्याचा वापर करा असे म्हटले त्यावर नरेंद्र मोदींनी उत्तर दिले कि तुम्ही म्हणताय म्हणून मी हा भाला हातात धरत आहे पण माझे संस्कार मला कुणालाही मारण्याची अनुमती देत नाहीत. ह्या दोघांमध्ये रंगलेले संवाद व त्यांनी जंगल व जंगलातील आपला प्रवास ह्याबद्दल सांगितलेले अनुभव तुम्हाला मॅन व्हर्सेस वाइल्ड ह्या मालिकेच्या १२ ऑगस्टच्या भागात पाहायला मिळतील.

1 COMMENT

  1. Huminity es better than community, understand the value of life and pain of hunting the animals just imagine the words modi

Leave a Reply to Yogesh Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here