मोदी सरकारचं बजेट तयार करणारे ६ चाणक्य

999
K Subramanian, Subhash Garg, Ajay Bhushan Pandey, G C Murmu, Rajeev Kumar, Atanu Chakraborty, finance minister, nirmala sitharaman, budget 2019, p m modi, modi governement

मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी निर्मला सीतारामन ह्यांना अत्यंत महत्वाचे असे अर्थखाते दिले आहे. निर्मला सीतारामन आज म्हणजेच ५ जुलै रोजी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. नोटाबंदी, जीएसटी ह्यामुळे काहीश्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्याचे मोठे आव्हान निर्मला सीतारामन ह्यांच्यासमोर असणार आहे. निर्मला सीतारामन ह्या जरी संसदेच्या सभागृहात आपलं पाहिलं बजेट सादर करणार असल्या तरी हे बजेट व त्याचा आराखडा बनवण्यामागे त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे. तर आज आपण पाहू कि अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांची टीम जिने त्यांना हा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मदत केली आहे.

के सुब्रमण्यन, मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Economic Adviser)

K Subramanian, Subhash Garg, Ajay Bhushan Pandey, G C Murmu, Rajeev Kumar, Atanu Chakraborty, finance minister, nirmala sitharaman, budget 2019, p m modi, modi governement
K Subramanian chief economic advisor (Source – News18Lokmat)

शिकागो युनिव्हर्सिटीतून पीएचडी केलेले के सुब्रमण्यन ह्यांना रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन ह्यांचे मार्गदर्शन पीएचडी करतांना लाभलेले आहे. रघुराम राजन व प्रोफेसर जींगालेस ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फायनान्शियल इकॉनॉमिक्स ह्या विषयात पीएचडी केली आहे. अर्थसंकल्प सादर करण्याआधी करण्यात येणारे आर्थिक सर्वेक्षण त्यांनी नुकतेच सादर केलेलं आहे.

सुभाष गर्ग, अर्थ आणि आर्थिक घडामोडींचे सचिव (Current Economic Affairs Secretary and Finance Secretary)

K Subramanian, Subhash Garg, Ajay Bhushan Pandey, G C Murmu, Rajeev Kumar, Atanu Chakraborty, finance minister, nirmala sitharaman, budget 2019, p m modi, modi governement
Subhash Garg (Source – News18Lokmat)

१९८३ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेले सुभाष गर्ग हे अर्थमंत्रालयातील अनुभवी व्यक्तींपैकी एक आहेत. खालावलेला विकासदर व अपेक्षेप्रमाणे न होणारी परकीय गुंतवणूक ह्या समस्यांवर मात करून भारतीय अर्थव्यवस्थेला मजबुती देण्यासाठी सुभाष गर्ग ह्यांचा अनुभव नक्कीच कामी येऊ शकतो.

अजय भूषण पांडे, महसूल सचिव

K Subramanian, Subhash Garg, Ajay Bhushan Pandey, G C Murmu, Rajeev Kumar, Atanu Chakraborty, finance minister, nirmala sitharaman, budget 2019, p m modi, modi governement
Ajay Bhushan Pandey (Source – News18Lokmat)

आधार कार्डची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतांना युनिक इडेंटिफिकेशन ऑथॉरिटीची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते व त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात अजय भूषण पांडे ह्यांचा महत्वाचा वाटा होता. सरकारी महसूल वाढवणे आणि प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांना कर भारण्यामध्ये अधिक सुलभता यावी ह्यासाठी अजय भूषण पांडे तंत्रज्ञानाचा कश्याप्रकारे वापर करून घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. सरकारी खर्चांमध्ये झालेली वाढ आणि कमी झालेले महसुली उत्पन्न ह्या आव्हानांचा ते कसा सामना करतात हे भविष्यात दिसून येईल.

जी सी मुर्मू, सचिव

K Subramanian, Subhash Garg, Ajay Bhushan Pandey, G C Murmu, Rajeev Kumar, Atanu Chakraborty, finance minister, nirmala sitharaman, budget 2019, p m modi, modi governement
G. C. Murmu (Source – News18Lokmat)

आर्थिक सेवा आणि महसूल विभागात काम करण्याचा चांगला अनुभव असलेले जीसी मुर्मू ह्यांचाही अर्थसंकल्प बनवतांना व त्याची अंमलबजावणी करताना महत्वाचा सहभाग असेल. गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले जीसी मुर्मू ह्यांच्या समोर पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या विविध योजना राबविण्याचे व सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान असेल.

राजीव कुमार, अर्थ सेवा विभाग सचिव

K Subramanian, Subhash Garg, Ajay Bhushan Pandey, G C Murmu, Rajeev Kumar, Atanu Chakraborty, finance minister, nirmala sitharaman, budget 2019, p m modi, modi governement
Rajeev Kumar (Source – News18Lokmat)

मोदी सरकारने आपल्या आर्थिक अजेंड्याची अंमलबजावणी करताना केलेला विविध बँकांचा विलय हि एक महत्वाची बाब होती व त्या विलायची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना राजीव कुमार ह्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. बँकांची बुडीत कर्जाची गंभीर समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवण्यात सरकारला यश आले आहे ज्यात राजीव कुमार ह्यांचा महत्वाचा सहभाग आहे. त्यांचाही सल्ला व अनुभव ह्या अर्थसंकल्पात महत्वाचा ठरणार आहे. तसेच, ह्या सरकारची आर्थिक आघाडी सांभाळताना निर्मला सीतारामन ह्यांना राजीव कुमार ह्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल.

अतानु चक्रवर्ती (Department of Investment and Public Asset Management secretary)

K Subramanian, Subhash Garg, Ajay Bhushan Pandey, G C Murmu, Rajeev Kumar, Atanu Chakraborty, finance minister, nirmala sitharaman, budget 2019, p m modi, modi governement
Atanu Chakraborty (Source – News18Lokmat)

सरकारने विविध क्षेत्रांमध्ये केलेली गुंतवणूक व त्याचा मिळवलेला परतावा ह्यामध्ये अतानु चक्रवर्ती ह्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. १९८५ च्या आयएएस कॅडरचे अतानु पुढील आर्थिक घडामोडींमध्ये काय सल्ला देतात व त्याचा किती फायदा होतो हे पाहणे महतवाचे ठरेल.

1 COMMENT

  1. Good best of luck madam. Bharat is growing country. Too many challenges are waiting for u. Population,, muslims mood of deshdrohi prosses and many. Fight for country. Bravo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here