सानिया मिर्झा नंतर हि भारतीय युवती पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत विवाह करणार

1266
Pakistan Cricketer, Hasan Ali, Shamia Arzoo, marriage, india, pakistan, sania mirza

पाकिस्तानचा शोएब मलिक आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ह्यांचा विवाह बराच काळ चर्चेचा विषय ठरला. लग्नानंतर सानिया पाकिस्तानची सून बनली. आता अजून एक भारतीय तरुणी पाकिस्तानची सून होणार आहे. तीच नाव आहे शामिया आरजू. हरियाणाची निवासी असलेली शामिया आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अली ह्या दोघांचा निकाह पुढील महिन्यात होणार असल्याचे समजते.

एअर अमिरातमध्ये फ्लाईट इंजिनियर असलेली शामिया आरजू आणि पाकिस्तानी गोलंदाज हसन अली ह्यांचे फार पूर्वीपासूनच पारिवारिक संबंध आहेत. फाळणीनंतर शामियाचा परिवार भारतात आला तर हसन अलीचा परिवार तिथेच राहिला. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्मलेल्या हसन अलीने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले व नुकत्याच झालेल्या भारत पाकच्या विश्वचषकातील सामन्यातही पाकिस्तानी संघातही तो होता.

Pakistan Cricketer, Hasan Ali, Shamia Arzoo, marriage, india, pakistan, sania mirza
Pakistan Cricketer Hasan Ali to Marry Hariyana Girl Shamia Arzoo (Source – Latestly)

दुबईतील अटलांटिस पाम जुबेरा पार्क इथे ऑगस्ट महिन्यात हसन व शामिया ह्यांचा विवाह होणार असून त्यासाठी शामियाचा परिवार १७ ऑगस्ट रोजी दुबईला जाण्यासाठी रवाना होईल. सानिया मिर्झा व शोएब मलिकच्या विवाहानंतर शामिया व हसन अली ह्यांचा होणारा विवाह हा चर्चेचा विषय ठरला आहे. शामियाचे वडील म्हणतात कि मुलगा पाकिस्तानी असो किंवा भारतीय काही फरक पडत नाही. फाळणीनंतर आमचे नातेवाईक पाकिस्तानात स्थायिक झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here