‘शिवाजी महाराज क्षत्रिय नसून शुद्र’; बॉलिवूड अभिनेत्रीचं वादग्रस्त ट्विट

935
payal rohatgi, shivaji maharaj, शिवाजी महाराज, पायल रोहतगी, लई भारी,

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेक वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहण्याचा फंडा ती वापरात आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण अभिनेता कमल हसन यांनी पहिला हिंदू दहशतवादी नथुराम गोडसे असल्याचं म्हटलं होतं तर यालाच प्रतिउत्तर देऊन अभिनेत्री पायल रोहतगी चर्चेत आली होती. यानंतर तिने “ब्रिटिशांचा चमचा” असं म्हणत राजा राममोहन रॉय यांच्यावर वादग्रस्त ट्विट केले होते.

अनेकांनी तिच्या ट्विट नंतर तिला ट्रोल केले होते तर काहींनी तिला सपोर्ट पण केला होता आणि यामुळेच तिला आत्मविश्वास आला होता आणि म्हणूनच अनेक वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहण्याचा फंडा ती वापरात आहे. पण आता महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त ट्विट करून तिला अति आत्मविश्वास नडणार आहे यात वादच नाही.

या महाशय बॉलिवूड अभिनेत्री पायलने ट्विटरवर छत्रपती शिवरायांचा एक फोटो शेअर करत म्हंटले आहे कि “छ. शिवाजी महाराज क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म शुद्र जातीत झाला आहे”. यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

तिने अशीच पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केली आहे पण त्या ठिकाणी स्वतःत आणि पतीचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच मराठा समाजाला महाराष्ट्रात आरक्षण का दिले आहे असेही प्रश तिने विचारून आपल्या वैचारिक बुद्धीची पातळी दाखवून दिली आहे.

राष्ट्रवादीचा घाणाघात

हा सगळं प्रकार लक्षात येताच राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आम्ही शिवरायांचा अपमान सहन करणार नाही सांगत त्या अभिनेत्रींच्या अटकेची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. तर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here