मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावत २२ ऑगस्टला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस राज ठाकरेंना आल्याचे समजते. प्रकरणाबद्दल बोलताना मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले कि, मात्र मनसे अशा नोटिसांना भीक घालत नाही.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे नवे हिटलर आहेत. दाबावतंत्राचा वापर करायचा तुमची प्रकरणं बाहेर काढेल, तुमच्या विरोधात बोलेल, तुमचा खोटारडेपणा बाहेर काढेल त्याच्या मागे सरकारी कारवाईचा ससेमिरा लावायचा अशी भाजपची नीती आहे. ईडी असेल किंवा सीबीआय असेल या आता स्वायत्त संस्था राहिलेल्या नाहीत तर त्या भाजपाच्या कार्यकर्त्या झालेल्या आहेत. यांच्याशी कसं डील करायचं हे मनसेला चांगल्या प्रकारे माहितीय. त्या पद्धतीनेच आम्ही डील करु,” असं संदीप देशपांडे यांनी सांगितले.
राज यांची चौकशी का ?
सुत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांनी कोहिनूर मधून अचानक बाहेर का पडले या संदर्भात ईडी चौकशी करणार आहे. आयएल अँड एफएस ग्रुपने या प्रकल्पामध्ये तब्बल २२५ कोटींची गुंतवणूक केली होती. परंतु या कंपनीने आपल्या मालकीचे सर्व शेअर्सचा हक्क २००८ साली केवळ ९० कोटींच्या किंमतीवर सोडून दिला. आणि त्याच वर्षी राज ठाकरे यांनी आपल्या मालकीचे शेअर्स विकून कंपनीमधील आपला सहभाग संपुष्टात आणला.
काय आहे कोहिनूर स्क्वेअर ?
दादरसारख्या मोक्याच्या ठिकाणी ५२ आणि ३५ मजल्यांचे दोन जुळे टॉवर
ऊर्जाबचत आणि पर्यावरणस्नेही इमारत म्हणून सुवर्णपत प्राप्त
मुख्य इमारतीतील पहिल्या पाच मजल्यांवर अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स, उर्वरित ४७ मजले
सिंगापूर ब्रॅण्डचे ‘आयू मुंबई’ हे पंचतारांकित हॉटेल तसेच व्यापारी सदनिका
जुळ्या इमारतीतील पहिले १५ मजले दोन्ही टॉवर्सच्या पार्किंगसाठी; तब्बल दोन हजार गाडय़ांची व्यवस्था. उर्वरित २० मजल्यांवर आलिशान सदनिका. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत २१०० कोटी इतकी आहे.