जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या घोषणेची मागील आठवड्याभरापासून तयारी सुरु होती. आज अमित शाह यांनी राज्यसभेत कलम ३७० रद्द करण्याबद्दल शिफारस दाखल करताना “मी कलम ३७० बद्दल विचारायला नाही सांगायला आलोय’; असे सूचक वक्तव्य करून हे कलम रद्द करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
यावर राजकीय तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मिडियाच्या माध्यमातून काही पाठिंब्याच्या तर काहींनी विरोधाच्या दर्शविल्या आहेत. तसेच विविध सोशल मीडियात नागरिकांनी आपल्या प्रतिक्रया मिम्सच्या माध्यमातून मांडल्या आहेत.
राजकीय
काश्मीरची वेगळी संस्कृती असून, काश्मीर मधील नागरिकांना भारताप्रती निष्ठा आहे, सरकारने विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता बरं झालं असतं, हा एकतर्फी निर्णय असून, नागरिकांच्या विश्वासाला तडा – शरद पवार
आज काश्मीरला अटलजींची उणीव भासतेय- महेबूबा मुफ्ती
भाजपाने राज्यघटनेची हत्या केली आहे, “राज्यघटनेची सुरक्षा करण्यासाठी आम्ही जिवाची बाजी लावू” – गुलाम नबी आझाद
बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं; मोदींचे आभार – उद्धव ठाकरे
सरकारचा या निर्णायाला आमचा पाठिंबा आहे. जम्मू- काश्मीरच्या वाढीसाठी आणि भरभराटीसाठी प्रयत्नशील राहा – अरविंद केजरीवाल
आज देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस – आदित्य ठाकरे
खूप धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय, श्रेष्ठ भारत. संपूर्ण भारताचं अभिनंदन – सुषमा स्वराज
‘आज जम्मू- काश्मीर घेतलं, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ’ – संजय राऊत
बॉलिवूड कलाकार
आज खऱ्या अर्थानं भारत एक झाला, सौ-सौ सलाम आपको – परेश रावल
काश्मीरप्रश्नी आता तोडग्याला खरी सुरुवात झाली – अनुपम खेर
ही वेळसुद्धा निघून जाईल – झायरा वसीम
५ ऑगस्ट २०१९. काश्मीर एकदाच मुक्त झालं. हि मुक्ती विकासासाठी, हि मुक्ती भविष्यासाठी- चेतन भगत