आता सिनेमा रिलीझ झाल्याच्या दिवशीच Jio वर बघता येणार

1107
reliance, jio, annual general meeting, mukesh ambani, jio giga fibre, jio tv, movies

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४२ व्या अन्युअल जनरल मीटिंगमध्ये जिओ सेट टॉप बॉक्सच्या नवीन डिझाईनचे सादरीकरण करण्यात आले आहे. ह्या जिओ सेट टॉप बॉक्सचे सादरीकरण करतांना रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले कि जिओ फायबरचे लाँचिंग पुढील महिन्यात म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी होत आहे. जिओ फायबरचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुढील वर्षीपासून जिओ फायबरच्या प्रीमियम ग्राहकांना सिनेमागृहात रिलीज होणारा नवीन सिनेमा त्या सिनेमाच्या रिलीज होण्याच्याच दिवशी आपल्या घरी पाहता येईल.

ह्यासाठी कंपनीकडून ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतचे वेगवेगळे मन्थली प्लॅन्स ग्राहकांना देण्यात येणार आहेत. जिओ गिगाफायबरसाठी आत्तापर्यंत दीड कोटी रजिस्ट्रेशन्स पूर्ण झालेली आहेत. मुकेश अंबानी ह्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले कि डिजिटल पायाभूत सुविधांवर ३.५ लाख कोटी रुपये खर्च करण्याची कंपनीची योजना आहे.

reliance, jio, annual general meeting, mukesh ambani, jio giga fibre, jio tv, movies
(Source – Firstpost)

मुकेश अंबानी पुढे बोलतांना म्हणाले कि रिलायन्स जिओ गिगा फायबरसाठी आजवर ५ कोटींपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन्स झालेले असून ५० लाख घरांमध्ये हि सेवा पोहोचली आहे व आगामी एक वर्षात हि सेवा संपूर्ण देशभरात पुरवण्यात येणार आहे. ह्यातील एक खास वैशिष्ट्य म्हणजे सिनेमा रिलीज झाल्यानंतर लगेचच तो जिओ गिगा फायबरच्या प्रिमिअम ग्राहकांना आपल्या सेट टॉप बॉक्सद्वारे पाहता येईल. तसेच ह्या सेट टॉप बॉक्सच्या मदतीने तुम्ही व्हिडीओ कॉल सुद्धा करू शकाल.

जिओ गिगा फायबरच्या बेसिक प्लान मध्ये १०० mbps पर्यंतचा स्पीड देण्यात आला असून जास्तीतजास्त स्पीड १ gbps पर्यंत असेल. ह्या सेवेअंतर्गत अजून एक विशेष ऑफर जिओने आपल्या ग्राहकांना दिली आहे ज्यात बाहेर देशामध्ये कॉल करण्यासाठी इंटरनॅशनल अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन अंतर्गत ५०० रुपये प्रतिमहिना ह्या दराने दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा कॉल करणे शक्य होणार आहे.

संपूर्ण वर्षभराचा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकास hd tv चा लाभ मिळणार आहे. येत्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड वेगवेगळ्या १४ टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स मध्येही गुंतवणूक करेल असेही जाहीर करण्यात आले आहे. ह्या प्लॅनसाठी तुम्ही रिलायन्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता. मुकेश अंबानी ह्यांनी सांगितले कि ५ सप्टेंबर रोजी जिओ अँप व जिओच्या वेबसाईटवर प्लॅन्स आणि त्याचे दर ह्यासंबंधीची माहिती मिळू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here