कश्यारीतीने अंडे खाल्ले की वजन वाढते आणि वजन कमी करण्यासाठी अंडी कशी खायला हवी ? जे नियमित व्यायाम करतात त्यांनी किती अंडे आणि कधी खावे ?
“Eggetarian” प्रकारचे लोक आपल्या आसपास भरपूर सापडतील, पूर्णपणे मांसाहार न करणारे पण शाकाहारी असलेले अंडी खाणारे लोक एगेटेरिअन म्हणून ओळखले जातात. डॉक्टर सर्रास लहान मुलांना अंडी खाण्याचा सल्ला देतात, कारण अंडं हे प्रोटीन आणि मिनरल्सचा मोठ्या प्रमाणात स्रोत आहे. पण आपण हे पण ऐकून असतो की उन्हाळ्यात अंडी खाऊन शरीरात उष्णता वाढते, नाहीतर चेहऱ्यावर पिंपल्स येतील. अंड्यातून वजन वाढवणे आणि कमी करणे दोन्ही साध्य होते, पण कश्यारीतीने अंडे खाल्ले की वजन वाढते आणि कधी कमी होईल, जे नियमित व्यायाम करतात त्यांनी किती अंडे आणि कधी खावे हे सगळे आपण आज जाणून घेऊ.
अंड्यामध्ये काय काय घटक असतात ते बघूया
अंड्यातील पिवळा आणि पांढरा भाग मिळून एक पूर्णान्न आहे असे मानतात. अंड्यामध्ये खालील घटक असतात,
- पोषक फॅट्स.
- HDL कोलेस्टेरॉल.
- प्रोटीन.
- अमिनो ऍसिडस्.
- व्हिटॅमिन A, B5, B12, D, E.
- Essential oils.

आता बघूया कोणी किती प्रमाणात आणि कसे अंडे खावेत
आपल्या शरीराला दररोज 300Mg HDL कोलेस्ट्रॉलची गरज असते आणि एका अंड्यामध्ये 187Mg HDL असते. त्यामुळे कोणीही २ ते ३ पेक्षा जास्त, (पूर्ण पिवळा+पांढरा) अंडी एका दिवसात खाऊ नये. अतिशय जास्त प्रमाणात एका दिवसात अंडी खाल्ल्याने पचनाच्या तक्रारी, हृदयाचे विकार होऊ शकतात तसेच ब्लॉकेजेसचा त्रास होण्याची शक्यता ३० % वाढते, असे एक संशोधनात समजले आहे. अंडी नेहमीच सकाळच्या नाश्त्याबरोबर खाणे अतिशय उत्तम आणि संपूर्ण फायदा होण्यासाठी अंड्यातील पांढरा तसेच पिवळा दोन्ही भाग खाणे हितकारक असते. त्यामुळे तुम्हाला दिवसभराच्या कामाला उत्साह आणि शक्ती टिकून राहते तसेच त्याचे व्यवस्थित पचन सुद्धा होते.
शरीरयष्टी कमावणाऱ्या लोकांसाठी अंड्याचे प्रमाण
जर तुम्ही शरीर कमावण्यासाठी व्यायाम करत असाल, तर तुम्हाला दररोज १० ते १२ अंड्यातील पांढरा भाग खाणे अतिशय उपयुक्त ठरते. कारण पांढऱ्या भागात प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने, व्यायामामुळे तुमच्या पेशींचे जे नुकसान झाले असते, त्याचे नुकसान तसेच झीज भरून निघते आणि पेशींना चांगला आकार मिळतो. व्यायामाआधी अर्धा तास अशी १० – १२ अंड्यातील पांढरा भाग खाल्ल्याने व्यायामाला गरज असलेली शक्ती मिळते व थकवा येत नाही, तसेच तुम्ही व्यायामानंतर अर्ध्या तासाने पण हा आहार घेऊ शकता.

आधी किंवा नंतरची एक वेळ निश्चित करून दररोज असा आहार घेतल्याने लवकरच शरीरयष्टी कमावू शकाल, पण जर तुम्हाला वजन घटवण्यासाठी अंडी खायची असतील, तर दिवसातून ५ ते ६ अंड्यातील पांढऱ्या भागापेक्षा जास्त खाऊ नये. तुम्हाला जर चेहऱ्यावर फोड येण्याची भीती वाटत असेल, तर याबाबत कोणतंही पक्कं संशोधन नाहीये.
पण बऱ्याच लोकांच्या अनुभवावरून हे समजते की, अंड्यातील प्रोटीनमूळे शरीराला थोडी गर्मी मिळते आणि गर्मी वाढली की तैल ग्रंथी जास्त तेल (सिबेम) त्वचेवर सोडतात. त्याने फोड होण्याची शक्यता वाढते त्यामुळे जर नेहमी पिंपल्स येण्याचा त्वचेचा पोत असेल, तर दिवसातून एक अंड्यापेक्षा जास्त न खाल्लेलं कधीही फायद्याचं. कोणतीच गोष्ट अति प्रमाणात शरीराच्या दृष्टीने चांगली नसते, औषध चांगलं म्हणून पूर्ण बाटली एकसाथ पिऊन टाकली तर त्याचे दुष्परिणामच होतात!