रिंकु राजगुरूच्या ग्लॅमरस लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ

990
रिंकु राजगुरू, रिंकू राजगुरूंचा मेकओव्हर, Rinku Rajguru, Rinku Rajguru new look, Rinku Rajguru pics, Rinku Rajguru photos, Rinku Rajguru information in marathi, Marathi News,
रिंकु राजगुरूच्या ग्लॅमरस लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ

रिंकूच्या मेकओव्हरचे फोटो सध्या सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. फोटो पाहिलेत कि कमालिचा कायापालट झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.

सोशल मीडियावर कधी कोण आणि कोणत्या कारणासाठी फेमस होईल याची कोणतीही नियमावली नाही. अगदी पाकिस्तान मधील निळ्या डोळ्याचा चहावाला असो किंवा अफगाणिस्तानमधील रस्त्यावर विकणारी भाजीवाली. या दोघं प्रमाणेच अनेक साध्या लोकांना सोशल मीडियाने फेमस केले आहे. सध्या अनेक दिवसांपासून अश्याच काही फोटोंची सोशल मीडिया वर खमंग चर्चा चालू आहे, फोटो कोना अनोळखीचे नसून सैराट फेम आर्चीचे आहेत.

 

View this post on Instagram

♥️

A post shared by rinku rajguru ? (@rinku____rajguru) on

 

आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूंने (Rinku Rajguru) मेकओव्हर केला आहे आणि हा नवीन लुक चाहत्यांना चांगलाच आवडला असल्याचे दिसत आहे. कारण रिंकूच्या मेकओव्हरचे फोटो सध्या सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. फोटो पाहिलेत कि कमालिचा कायापालट झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.

View this post on Instagram

Queen ?

A post shared by rinku rajguru ? (@rinku____rajguru) on

 

सैराट चित्रपट नक्कीच महाराष्ट्रासह देशभरात गाजला, लोकांना भावाला आणि म्हणूनच लोकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. सैराटमधील परशा आणि आर्चीची जोडी खूपच लक्षवेधी ठरली पण या सगळ्यात भाग खाऊन गेली ती बुलेट चालवणारी आर्ची. रिंकूचा (Rinku Rajguru) प्रत्येक डायलॉग, तिचं ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज लोकांना भावला. त्यामुळेच आर्ची अख्या महाराष्ट्राची लाडकी बनली.

 

 

अर्थातच सैराट सिनेमाने आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचं संपूर्ण आयुष्यच पालटलं. ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूने आता पुढच्या चित्रपटात नवनवीन पात्रे साकारण्यासाठी फुलऑन मेकओव्हर केला आहे. त्यामुळे फोटो पाहताक्षणीच तुम्हाला गावरान अंदाजातील रिंकूचा जणू काही कायापालट झाल्याचे पाहायला मिळेल.

 

 

रिंकू राजगुरूंच्या (Rinku Rajguru) नवीन फोटो पाहायल्यावर तिने तिचे वजन ही कमी केल्याचे तुमच्या लक्षात येईल. गेल्या अनेक महिन्यापासून रिंकु तिच्या फिटनेसवर जास्त लक्ष असल्याची वृत्ते होती याला आता दुजोरा मिळाला. नवनवीन अंदाजातल्या “लई भारी” फोटोना तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहे.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here