चित्रपट सृष्टीतील जोडप्यांच्या यादीत चाहत्यांच्या हृदयात नेहमीच जेनेलिया वहिनी-रितेश दादाच्या जोडीला एक वेगळच स्थान आहे. अन हि जोडीही अशी हटके करते कि कोणीही यांचा जबराट फॅनच होऊन जाईल. मराठी, हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत हि जोडी नेहमीच दिल कि धडकन घेऊन जाते. मंग ते रितेश ने जेनेलियाला दिलेलं सरप्राईझ गिफ्ट असो वा आणखी एखादी गोष्ट. जेनेलिया वाहिनीच्या वाढदिवसानिमित्त रितेशने ट्विटर अशीच एक लय भारी म्हणजे लय भारी पोस्ट टाकलीया, ती वाचून तुमच्या चेहऱ्यावरील हास्याची खळी नक्कीच खुलेल.
“ज्यावेळी तुमची जवळची मैत्रीण आयुष्याची जोडीदार बनते तेंव्हा तुमचं आयुष्य अगदी सुंदर होणं जातं. माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा. तू शक्तिशाली आई आहेस, संपूर्ण कुटुंबाला जोडणारा धागा आहेस, तुझ्या या जन्माच्या पुण्याईने पुढच्या जन्मीही तुला मीच पती मिळो,” अशी पोस्ट रितेश ट्विटरवर लिहून टाकली. या पोस्टनंतर जेनेलिया वर श्रावणातल्या सारखा बदाबदा पाऊस पडावा तसा शूभेच्छाचा वर्षाव झाला. अन रितेशची विनोदबुद्धी पुन्हा या पोस्टच्या माध्यमातून लोकांना दिसली.अन वहिनीलाही लय भारी परिवाराककडून वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा
आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.