भारतातील या ठिकाणी चक्क प्लास्टिक पासून रस्ते तयार करण्यात आले आहेत

1334
प्लास्टिक पासुन रस्ते, प्लास्टिक रोड, plastic roads, डॉ. आर. वासुदेवन, plastic roads in india

आज आपल्या राज्यात बहुदा देशात सुध्दा रस्ते आणि त्यावरील खड्डे हा एक चर्चेचा विषय  राहिला आहे आणि तो कधी पर्यंत राहिल काही नेम नाही…! कंत्राटदारांनी रस्ते बाधांयचे ते दोन महिने चालायचे आणि पाऊस पडला की त्यावर खड्डे पडणार हे चक्र जणू पावसाच्या जलचक्राप्रमाणे भारतात चालते. कधी कोणाच्या मनात या वर उपाय सुचला नसेल का…? त्यात आज प्लास्टिक मुळे होत असलेलं प्रदुषण यामुळे देशाची मोठ्ठी हानी होत आहे. महाराष्ट्र सरकारने तर राज्यात अता प्लास्टिक बंदी लागु केली आहे.

पण या सर्वांमधून एका माणसाने सुवर्णमध्य शोधुन काढला आहे. या माणसाचं नाव आहे डॉ. आर. वासुदेवन. वासुदेवन हे पेशाने प्राध्यापक असुन ते तेथे रसायनशास्त्र शिकवतात. त्यांनी खड्डयांच्या या वाढत्या समस्येवर  एक अविश्वसनिय असा तोडगा काढला आहे. त्यांनी प्लास्टिक पासुन रस्ते तयार करण्याचे तंत्र शोधुन काढले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी फक्त रस्त्यांचाच प्रश्न सोडवला नाही तर प्लास्टिक पासुन रस्ते तयार करून प्रदुषणावर सुध्दा तोडगा काढला आहे.

प्लास्टिक पासुन रस्ते, प्लास्टिक रोड, plastic roads, डॉ. आर. वासुदेवन, plastic roads in india
(Source – Google)
कसे काम करते हे तंत्रज्ञान..? 

या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी प्लास्टिकचे सूक्ष्म तुकडे करून ते 170° c तापमानाला. गरम करून त्यापासुन तयार होणारा पदार्थ डांबर व सिंमेंट च्या जागी वापरून हा प्लास्टिक रोड तयार करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. व हा प्रयोग त्यांनी करूण पाहिला. आणि प्रयोग यशस्वी सुध्दा झाला आहे.

हे तंत्रज्ञान डॉ. आर वासुदेवन यांनी भारत सरकार व भारतातील स्थानिक स्वराज्यसंस्थांना मोफत देण्याचे कबूल केले आहे. पण शोकांतीका हि की आजून पर्यंत सरकारने त्यांच्या या प्रयत्नांना दाद दिली नाही.  त्यांना या प्रकल्पासाठी विदेशातुन लाखोंच्या ऑफर येत आहेत पण त्यांनी प्रथम ही पध्दती भारतात वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रयत्नांना यश म्हणुन भारतातील काही ठीकाणी अशा प्लास्टिक पासुन रस्ते तयार करण्यात आले आहेत.

भारतात कुठे आहेत प्लास्टिक चे रस्ते..? 

प्लास्टिकचा सदूपयोग म्हणुन प्लास्टिक रोड तयार करण्याचा त्यांनी या प्रणालीचा शोध लावला. या त्यांच्या प्रयोगाला भारतातील काही राज्यातील संस्थांनी प्रतीसाद दिला आहे. व या पध्दतीने रस्ते बांधुनी केली आहे. कुठे कुठे आहेत असे रस्ते ..? चला पाहूया.

प्लास्टिक पासुन रस्ते, प्लास्टिक रोड, plastic roads, डॉ. आर. वासुदेवन, plastic roads in india
Plastic Roads In India (Source – polychem-usa.com)

जमशेदपूर

भारताच्या उद्योग जगातले नावाजलेले घराणे म्हणजे टाटा घराणे. भारतातील उद्योगाची सुरूवात जमशेदजी टाटा यांनी पोलाद कारखाना काढून केली . ते हे ठिकाण म्हणजे जमशेद पुर. टाटा ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने जमशेदपूर येथे या प्रयोगाला धरून  20 किमीचा प्लास्टिक रोड तयार करण्यात आला. या मध्ये शेकडो टन प्लास्टिक चा उपयोग करण्यात आला आहे. आणि हा प्लास्टिक पासुन रस्ते तयार करण्यासाठी टाटा उद्योग समूहला सुमारे 1 कोटी रूपये खर्च आला आहे.

रांची

या पध्दतीचा अवलंब करून झारखंड सरकारने रांची येथे या प्रकारच्या रस्त्यांचे निर्माण केले आहे. त्यांनी या मध्ये डॉ. आर. वासुदेवन यांचे ही सहकार्य घेतले आहे. याच बरोबर बोकारो, धनबाद, गिरीदिह अशा ठीकाणी सुध्दा भारतात हे  प्रयोग केले आहेत. आणि ते यशस्वी ठरले आहेत. फक्त भारतातच नाही तर विदेशातील ऑस्ट्रेलिया, केनिया  , नायझेरीया या देशात सुध्दा हा प्रकल्प यशस्वी रित्या राबवला गेला आहे. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात कधी लागु होणार हा चर्चेचा विषय आहे. असो आपलं सरकार लवकर जाग होवो.  आणि आपल्या इकडे सुध्दा हे नाविन्यपूर्ण प्रयोग साकारले जावोत.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here