बॉलिवूडमध्ये अजून एक मराठी चेहरा आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. प्रसिद्ध निर्माता व अभिनेता महेश मांजरेकर ह्यांची धाकटी मुलगी सई सलमानच्या दबंग ३ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी कानावर आली आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांकडून ह्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरीही मीडियामध्ये तशी चर्चा आहे. पदार्पणातच सलमान खान सोबत काम करण्याची संधी मिळणे हि महत्वाची आणि मोठी बाब बॉलिवूडमध्ये मानली जाते. सलमानच्या दबंग १ व दबंग २ ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता दबंग 3 काय कमाल दाखवतो हे आगामी काळात समजेलच. हा चित्रपट ह्याच वर्षी २० डिसेम्बरला प्रदर्शित होणार आहे.
आधी हि बातमी कानावर आली होती कि महेश मांजरेकरची जेष्ठ कन्या अश्वमी दबंग ३ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल. पण, आता असे समजते आहे कि महेश मांजरेकरची धाकटी कन्या दबंग ३ मध्ये झळकणार आहे. ह्या तिसऱ्या भागात सलमान पुन्हा एकदा चुलबुल पांडे साकारणार आहे. ह्या चित्रपटातील त्याची भूमिका एका तरुण पोलीस अधिकाऱ्याची आहे. त्यासाठी सलमान कसून तयारी करत असून तरुण दिसण्यासाठी त्याने आपले वजन काही किलोंनी घटवले आहे. दबंग ३ चे चित्रीकरण साताऱ्यातील फलटणमध्ये चालू असून चित्रीकरण पाहण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत.