मित्रांनो..1 मे म्हटलं तर तुम्हाला सर्वात पहिले काय आठवेल बरं..? कामगार दिन..? शाळेचा निकाल..? सुट्टीचा दिवस..? मे च्या सुट्ट्यांना सुरूवात..? पण एक गोष्ट जी प्रत्येक मराठी माणसाला लक्षात असायलाच पाहिजे ती म्हणजे हा दिवस आपल्या महाराष्ट्राचा जन्म दिवस आहे. यालाच आपण महाराष्ट्र दिन असे म्हणतो.
मुंबई सोबत संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी अनेक मराठी माणसांनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घातला या महाराष्ट्राच्या मातीला आणि मग उभा राहिला हा महाराष्ट्र. कुणी फुकटात दिलेलं राज्य नाही.. तर लढून संघर्ष करून मिळवलेलं राज्य आहे. त्यामुळे या राज्याला आज देशात सर्वोच्च स्थान आहे. आज मुंबई मध्ये आपल्या जीवाची मुंबई करणाऱ्यांना माहीती नसेल की हि मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी किती जणांनी आपलं रक्त सांडलयं ते… आजच्या लेखात आपण याच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या बद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग बघुयात…
15 ऑगस्ट 1947 ला लालकिल्यावरचा युनियन जॅक खाली उतरला आणि आपला तिरंगा फडफडत आपला भारत स्वातंत्र झाला. देशाची सर्व सूत्रे भारतीयांच्या हाती देऊन इंग्रजांनी देशातुन काढता पाय घेतला. त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणुन विराजमान होण्याचे भाग्य लाभले पंडीत जवाहरलाल नेहरू यांना. देशाची घटना पण काहीच वर्षात पूर्णत्वास आली होती पण आता प्रश्न निर्माण झाला होता तो म्हणजे प्रांत रचनेचा. त्यासाठी सुध्दा नेहरू कामाला लागले. त्यांनी भाषावार प्रांतरचना समिती स्थापन केली आणि त्याचे अध्यक्ष न्यायमुर्ती एस. के. दार हे होते. पण या कमिटीचा अहवाल म्हणजे नेहरूंनाच घरचा आहेर देणारा होता. कारण या कमिटीने आपल्या अहवालात भाषांवार प्रांतरचना ही देशाच्या एकतेला मारक ठरेल असे मत नोंदवले.
पण भाषांवार प्रांत रचना हा काही देश स्वतंत्र झाल्यावरच चर्चेत आलेला मुद्दा नव्हता तर हि संकल्पना 15 ऑक्टोबर 1938 च्या मराठी साहित्य संमेलनात, सावरकरांनी मराठी राज्याचा प्रस्ताव मांडून आधीच पेरली होती. पण तेव्हा या विचाराला एवढा पाठिंबा मिळाला नाही. पण नंतर झालेल्या 1946 च्या मराठी साहित्य संमेलनात त्या संमेलनाचे अध्यक्ष जी.के. माडखोलकर यांनी हा मुद्दा उचलुन धरला व याला एक नवीन उर्जा दिली.
पण मराठी राज्याच्या या चळवळीला संघटीत स्वरूप येण्यासाठी त्यावेळचे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली एका नवीन संघटनेचा उद्या झाला, जिचं नाव त्यांनी “संयुक्त महाराष्ट्र परिषद” असे ठेवले. इथुनच संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्याला सुरूवात झाली. ही आग थोडी थंड होती, पण सरकारच्या चुकीच्या धोरणमुळे ही आग वणव्याचं स्वरूप घेणार होती.
नंतर देशात भाषांवार प्रांत रचनेसाठी जे. व्ही. पी. समिती बसली. या समिती मध्ये जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पट्टती सितारामन हे होते. पण या समितीने सुध्दा महाराष्ट्राच्या जणतेची घोर निराशा केली आणि असे विधान केले की ज्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठला. जे व्ही. पी. समितीने म्हटलं की “जरी महाराष्ट्र हे स्वातंत्र राज्य निर्माण झाले तरी मुंबई ही महाराष्ट्राला मिळनार नाही.” त्यानंतर नेहरुंनी न्यायमुर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्रचना आयोग नेमला. या आयोगाने मुंबई, गुजरात आणि महाराष्ट्र असा त्रीराज्य प्रस्ताव मांडला. पण हा प्रस्ताव महाराष्ट्रातील जनतेला मान्य नव्हता. यामध्ये गुजरातला भाषिक राज्य व महाराष्ट्रावर अन्याय असा दूजाभाव होणार होता.
या निर्णयाने मुंबईतील मराठी माणूस चिडला. हे विधान झाल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईत 500 ते 600 जणांच्या एका जमावाने चर्चगेट येथुन विधानसभेवर मोर्चा काढला. सर्व मुंबई संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी दूमदमुन गेली. त्या कार्यकर्त्यांचा धरपकड करून त्यांना भायखळा येथील जेलमध्ये डांबलं गेलं. हा मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची पहीली ठिणगी होती.
नंतर एका सभेत बोलताना मोरारजी देसाई यांनी व स.का. पाटील यांनी “राज्यात कॉंग्रेस सरकार असे पर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही” असे विधान केले. त्यानंतर लोकांनी त्यांच्या सभा उधळत त्यांच्यावर दगडफेक केली आणि जनतेचा रोष सरकारला कळाला. यानंतर 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबई मधील सर्व कामगारांनी सामुहीक काम बंद केलं आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबई थांबली.
त्याच दिवशी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जेव्हा फौंटन वर आला तेव्हा मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या सांगण्यावरून जमावावर लाठीमार व नंतर गोळीबार करण्यात आला, यात 15 जण मृत्युमुखी पडले. या नंतर महाराष्ट्रात प्रचंड आक्रोश वाढला. मोरारजी देसाई यांच्या इशाऱ्यावर 15 वेळा गोळीबार करण्यात आला परिणामी महाराष्ट्रात प्रचंड आक्रोश माजला. याची दखल नेहरूंनी घेतली आणि महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये तर मुंबई केंद्रशासित ठेवली. याचा परिणाम उलट झाला आणि जनता अजुनच चवताळली.
यानंतर काढलेल्या एका मोर्चात गोळीबार झाला व यात बंडू गोखले नावाचा शाळकरी मुलगा मृत्यूमुखी पडला. विधानसभेत या घटनेचा निषेध करण्याचा प्रस्ताव मोरारजी देसाई यांनी फेटाळला. शंकरराव देव यांनी समितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व महाराष्ट्रात एस. एम. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती निर्माण झाली. या समितीचं नाव त्यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ असे ठेवले. या क्रांतीची आग वाऱ्यासारखी पसरत होती. त्या काळचे केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला व भर संसदेत नेहरूंवर “नागरी स्वातंत्र्यांची गळचेपी करणारे तुम्ही एक हूकूमशहा आहात” अशा शब्दात तोफ डागली.
या लढ्यात आनेक कामगार संघटना, युनियन, पक्ष आपले मतभेद विसरून एकत्र आले होते. या लढ्यात फक्त तरूणच सामिल नव्हते तर कॉ. तारा रेड्डी, अहिल्यादेवी रणदिवे यांसारख्या महिला सुध्दा होत्या. यानंतर आणखीन एका घटनेने देशाचं लक्ष वेधून घेतलं. 30 नोव्हेंबर 1957 रोजी नेहरू प्रतापगडावर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच अनावरण करण्यासाठी येणार होते. समितीचे कार्यकर्ते याच संधीची वाट बघत होते. नेहरू अनावरण करून येताच प्रतापगडाच्या पायथ्याला आनखीन एक इतिहास घडला तो म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसिंह नाना पाटील, कॉ. डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांसारखे समितीचे दिग्गज नेते प्रतापगडाच्या पायथ्याशी काळे झेंडे घेऊन नेहरूंची वाट बघत होते. जसे नेहरू खाली आले परिसर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणात बुडाला. सह्याद्रीत पुन्हा एकदा महाराष्ट्राचा जयजयकार झाला आणि नेहरूंना काळे झेंडे दाखवण्यात आले. नेहरू मान खाली घालुन निघुन गेले.
त्यानंतर शेवटी तो दिवस उजाडलाच 30 एप्रिलच्या रात्री नेहरूंनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली व सौराष्ट्र, कच्छ सोबत गुजरात अशी दोन वेगळी राज्य निर्माण झाली आणि महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. गुजरातला सुमारे 50 कोटी व 208 मराठी गावं देऊन गुजरातची नाराजी दूर करण्यात आली. राज्यभरात या दिवशी रात्री 12 वाजता 106 हुतात्मांना आदरांजली देण्यासाठी मशाल मार्च काढण्यात आले. महाराष्ट्राच्या जन्म सोहळ्यात यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री घोषित करण्यात आले आणि अशा तर्हेने एका लढ्याला यश आलं. पण लोकशाहिर अण्णाभाऊ साठे म्हणतात तसं…
बेळगाव, कारवार, डाल, सुंबरगाव वर मालकी दूजाची,
चीड बेकीची गरज ऐकीची..म्हणुन महाराष्ट्राला विनंती शाहिराची..
बीनी मारायची अजुनिया राहिली रं..
माझ्या जीवाची होतिया काहीली..