जर भारतावर इंग्रजांनी राज्य केलं नसतं तर संपूर्ण भारतावर मराठ्यांचं राज्य असलं असतं आणि भारतामध्ये धार्मिक सहिष्णुता अजून मजबूत झाली असती. हे मत मांडलं आहे काँग्रेसचे केरळमधील खासदार शशी थरूर ह्यांनी. शशी थरूर ह्यांना देशात तसेच परदेशातून व्याख्यानं देण्यासाठी नेहमीच आमंत्रित केले जाते. शशी थरूर ह्याचे अनेक लेखही प्रसिद्ध आहेत. दरम्यान एका कार्यक्रमात एका श्रोत्याने असा प्रश्न विचारला कि जर भारतामध्ये ब्रिटिशांनी वसाहत स्थापन केली नसती तर आजचा भारत कसा असू शकला असता. ह्या प्रश्नाला उत्तर देतांना शशी थरूर ह्यांनी वरील विचार मांडले.
ते म्हणाले कि ज्या वेगाने मराठ्यांनी आपला साम्राज्य विस्तार केला ते पाहता जर भारतात इंग्रज आले नसते तर संपूर्ण भारतावर मराठ्यांनी राज्य केलं असतं आणि भारतातील धार्मिक सहिष्णुता अजूनच मजबूत झाली असती. ह्याबाबाबत बोलतांना थरूर पुढे म्हणाले कि मराठ्यांनी तंजावर पर्यंत आपला साम्राज्य विस्तार केला होता. आज आपण दक्षिण भारतीय सांबर नावाचा खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात आपल्या आहारात वापरतो त्याचे नाव संभाजी महाराज ह्यांच्या नावावरूनच सांबर असे ठेवण्यात आले. ह्यावेळी शशी थरूर ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
ह्यावेळी शशी थरूर म्हणाले कि युद्ध करतांना एखाद्या सैनिकाला मुस्लिमांसाठी पवित्र असलेला ग्रंथ कुराण जर सापडला तर त्याची विटंबना न करता तो एखाद्या मुस्लिम व्यक्तीकडे सुरक्षित सोपवला जावा असा आदेशच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना दिलेला होता.
त्यामुळे जर भारतात इंग्रजांनी आपली वसाहत स्थापन केली नसती तर भारतावर मराठ्यांचे राज्य असले असते व भारतातील धार्मिक सहिष्णुता अजून मजबूत झाली असती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील ह्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर थरूर ह्यांचा हा व्हिडीओ शेअर केला होता व त्यानंतर तो अधिक वेगाने व्हायरल झाला
शिवाजी महाराज – द ग्रेट मराठा किंग
शशी थरूर यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. ते म्हणाले द ग्रेट मराठा किंग शिवाजी महाराज त्यांच्या सर्वधर्म समावेशक मूल्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांचा आपल्या सैनिकांना सज्जड दम होता कि लढाईवेळी पवित्र कुराण सापडल्यास ते एखाद्या मुस्लीम व्यक्तीच्या हाती देईपर्यंत व्यवस्थित ठेवावे. शिवरायांच्या या विचारज कौतुक करत ते म्हणाले मराठ्यांचं भारतावर राज्य असल्याने धार्मिक सहिष्णुतेचा अधिक चालना मिळाली असती.
ये भावड्या हे बी वाच –