शिवराज्याभिषेक सोहळा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडेनच्या नजरेतून…..

chhatrapati shivaji, shivaji coronation ceremony, shivaji maharaj information, shivaji maharaj story, preparation for coronation ceremony, shivaji maharaj coronation date, shivaji maharaj history in marathi, shivaji's coronation story, shivaji maharaj photos, shivaji maharaj wikipedia, शिवराज्याभिषेक सोहळा, शिवराज्याभिषेक तारीख, शिवराज्याभिषेक मराठी माहिती, शिवाजी महाराज राज्याभिषेक, गागाभट्ट

हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden)च्या डायरीतील माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.

शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden) हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता. या हेन्री ने राज्याभिषेक सोहळा सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत संपूर्ण सोहळ्याची वर्णनात्मक माहिती आपल्या डायरीत नमूद केली होती आणि हीच माहिती शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दल एक ठोस पुरावा तसेच अतिशय विस्तृत व सखोल आणि उत्तम माहिती म्हणून इतिहासात महत्वपूर्ण मानली गेली आहे.

हेन्री ने असे नमूद केले आहे कि, राज्याभिषेक सोहळा हा दिनांक ३० मे १६७४ रोजी सुरु केला गेला आणि दिनांक ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला. या ८ दिवसांत अनेक वेगवेगळे विधी व संस्कार शिवरायांवर व त्यांच्या परिवारावर करण्यात आले.

chhatrapati shivaji, shivaji coronation ceremony, shivaji maharaj information, shivaji maharaj story, preparation for coronation ceremony, shivaji maharaj coronation date, shivaji maharaj history in marathi, shivaji's coronation story, shivaji maharaj photos, shivaji maharaj wikipedia, शिवराज्याभिषेक सोहळा, शिवराज्याभिषेक तारीख, शिवराज्याभिषेक मराठी माहिती, शिवाजी महाराज राज्याभिषेक, गागाभट्ट
(Source – Madeindiaonline)

३० मे १६७४: हेन्री, जेधे शकावली, शिवापूर शकावली आणि समकालीन साधनांत नमूद केले आहे कि, या दिवशी हा सोहळा रायगडावर सुरु झाला. दिनांक ३० मे १६७४ रोजी शिवरायांनी वैदिक पद्धतीनुसार आपल्या सर्व राण्यांशी पुन्हा विवाह केला (ज्या राण्या हयात होत्या त्यांच्याशीच). सोबतच शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे गणेश पूजन तसेच पुण्यावाचन असे विधिवत कार्य संपन्न झाले.

३१ मे १६७४: या दिवशी ऐंद्रीशांती विधी आणि ऐशानयाग असे विधी पार पडले.

१ जून १६७४: या दिवशी रायगडावर ग्रहयज्ञ आणि नक्षत्रहोम असे विधी करण्यात आले.

२ जून १६७४: २ जून १६७४ म्हणजेच हिंदू कालगणनेप्रमाणे मंगळवार, ज्येष्ठ शुद्ध नवमी असा दिवस होता आणि शिवराज्याभिषेक प्रयोगात नमूद केल्याप्रमाणे या दिवशी राज्याभिषेकाशी संबंधित कोणतेही विधी करणे योग्य नसल्यामुळे या दिवशी कोणतेही विधी-संस्कार झाले नाहीत.

३ जून १६७४: शिवराज्याभिषेक प्रयोगात सांगितल्याप्रमाणे या दिवशी नक्षत्रयज्ञ संपन्न झाला.

४ जून १६७४: निवृत्तीयाग हा विधी या दिवशी करण्यात आला.

५ जून १६७४ व ६ जून १६७४: या दोनही दिवशी राज्याभिषेकाचे मुख्य विधी संपन्न करण्यात आले. अनेक नद्यांचे व समुद्राचे जल रायगडावर मागविले गेले होते. या दिवशी अनेक होमहवन करण्यात आले, यजमानांची औदुंबर शाखांचे असं करवून घेतले होते आणि मग होमहवन संपन्न झाल्यावर शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेक शाळेत दाखल झाले आणि तेथील सिंहासनावर आरूढ झाले. मग ब्राह्मणांनी मंत्रांच्या घोषात शिवरायांवर अभिषेक केले. या अभिषेकावेळी शिवरायांचा हात धरून ब्राह्मणांनी ‘महते क्षत्राय महते अधित्यात महते जानराज्यायेष व भरता राजा सोमोअस्माकं ब्राह्मणानांच राजा’ अशी घोषणा केल्याचा उल्लेख देखील सापडतो. (मराठ्यांचा इतिहास, रा.वि. ओतूरकर)

दिनांक ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजे भोसले यांचा स्वराज्याचे राजे म्हणून, सोयराराणी साहेब यांचा स्वराज्याच्या महाराणी आणि संभाजी भोसले यांचा स्वराज्याचे युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. अनेक सुवासिनींनी त्यांना ओवाळले, अनेक उदकांनी पती-पत्नी दोघांवर अभिसिंचन केले गेले आणि पुन्हा एकदा महाराजांनी स्नान संपन्न केले, वस्त्रालंकार केला आणि धनुर्धारणा करून शिवराय रथारोहणासाठी सज्ज झाले आणि नंतर हत्तीवर बसून त्यांनी मंदिरालाही भेट दिली.

chhatrapati shivaji, shivaji coronation ceremony, shivaji maharaj information, shivaji maharaj story, preparation for coronation ceremony, shivaji maharaj coronation date, shivaji maharaj history in marathi, shivaji's coronation story, shivaji maharaj photos, shivaji maharaj wikipedia, शिवराज्याभिषेक सोहळा, शिवराज्याभिषेक तारीख, शिवराज्याभिषेक मराठी माहिती, शिवाजी महाराज राज्याभिषेक, गागाभट्ट
(Source – punebulletin.com)

हे सगळे सोहळे, विधी, संस्कार संपन्न झाल्यावर अखेर दिनांक ६ जून १६७४ पहाटे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ सूर्योदयाच्या ३ घटिका पूर्व शिवाजी महाराज, सोयराराणी साहेब आणि शंभूराजे आपल्या सिंहासनावर आरूढ झाले. संपूर्ण दरबार शिवरायांना वाकून सलाम आणि नजराणे देत होते आणि सर्वांचा उर अभिमानाने भरून आला होता, डोळ्यांतील अश्रूंमुळे सर्वांच्या डोळ्यापुढील दृश्ये पुसट झाली होती. इतिहासातील एक अभूतपूर्व सोनेरी सोहळा संपन्न झाला होता आणि जिजाऊंच्या छायेत वाढलेला, मावळ्यांमध्ये मस्ती करून, खेळ खेळून स्वराज्याची स्वप्ने स्वतः सोबत त्यांच्याही मनात जागविणारा, रयतेचा प्रेमळ, कनवाळू आणि आपल्या सर्वांचा लाडका शिवबा या दिवशी ‘श्रीमान श्रीमंत क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज’ झाले होते.

शिवराज्याभिषेकाची गरज का होती ? त्याचे काय परिणाम झाले ?

हेन्री हा इंग्रज अधिकारी आपल्या डायरीत नमूद करतो कि, “मी पाहतोय राजे आपल्या भव्य सिंहासनावर आरूढ झाले होते. त्यांच्याजवळ मूल्यवान पोशाख केलेले संभाजीराजे, पेशवा, प्रधान व अनेक ब्राह्मण उभे होते. आम्ही (हेन्री यांनी) आणलेला नजराणा देण्यासाठी नारोजी पंडितांनी आम्हाला पुढे केले व शिवरायांनी आम्हाला सिंहासनाच्या पायरीशी येण्याचा हुकूम केला आणि आम्ही जाताच आम्हाला पोशाख देऊन रजा दिली.

त्या सिंहासनावरील खांबांवर मुसलमान पद्धतीची अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे आम्ही पहिली. एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत एक सोन्याच्या तराजूची परडी न्यायचिन्ह म्हणून शोभत होती. गडावरील राजवाड्याच्या बाहेर आम्ही पाहतो तर दोन हत्ती उभे केले होते आणि दोन पांढरे शुभ्र घोडे देखील उभे होते. गडाची वाट इतकी बिकट असतांना हे हत्तीसारखे विशाल प्राणी गडावर कसे आणले असावेत हा प्रश्न आम्हाला पडला आहे.”

chhatrapati shivaji, shivaji coronation ceremony, shivaji maharaj information, shivaji maharaj story, preparation for coronation ceremony, shivaji maharaj coronation date, shivaji maharaj history in marathi, shivaji's coronation story, shivaji maharaj photos, shivaji maharaj wikipedia, शिवराज्याभिषेक सोहळा, शिवराज्याभिषेक तारीख, शिवराज्याभिषेक मराठी माहिती, शिवाजी महाराज राज्याभिषेक, गागाभट्ट
शिवाजी महाराज राज्याभिषेक (Source – Twitter)

5 COMMENTS

  1. भाऊ hendry oxenden 1670 लाच मरण पावला होता मग तो महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कसा काय असू शकतो ? Wikipedia var bagh

    • तो हेन्री वेगळा होता , या हेन्री चा कालावधी 1645 ते 1709 होता

    • अरे बाळा तू जी माहिती पाहिली ना हा तो Hendry oxenden नाहीये. त्याच्या खाली बघ त्यात तीन Hendry oxenden ची माहिती दिलीय. जो दुसरा Hendry oxenden आहे ना त्याने छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या बद्दल लिहून ठेवलय. Hendry Oxenden 1st baronet. याने लिहिलय ते. आणि त्याचा जन्म 1614 ला झालेला आहे. आणि त्याचा मृत्यू 1686 ला झालाय. आधी खाली पुर्ण माहिती वाचत जा. आणि मगच महाराजांबद्दल काही आक्षेपार्ह कमेंट कर.

  2. या ८ दिवसांत अनेक वेगवेगळे विधी व संस्कार शिवरायांवर व त्यांच्या परिवारावर करण्यात आले.
    कोणी केले? भटुरड्यांनी की भिक्षुकांनी ?
    काही तरी logical पटेल असे लिहा.
    तो रामदास कोठे होता त्या वेळी?

  3. लंडनमधील ब्रिटिशांच्या पत्रव्यवहारात छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणाशी तुलना केली गेली आहे याचे उत्तर पाहिजे आहे please

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here