“आजकालच्या कपल्सला लाजवेल अशी सुनील दत्त आणि नर्गिस यांची प्रेमकहाणी आहे.”
बॉलीवूड मध्ये रोज नवीन लव्हस्टोरी जन्म घेते आणि त्याच्या चटपटीत बातम्या रोज वाचल्या ऐकल्या जातात, आज कोणा एकाबरोबर तर उद्या दुसऱ्या बरोबर असे नायक-नायिकांची जोडी बनत असते, परत ते वेगळेही होतात. अश्या सगळ्या जोड्यांमध्ये सगळ्यात प्रसिध्द जोडी आणि आज पण लोक त्या दोघांना आदर्श मानतात ती म्हणजे ‘सुनील दत्त आणि नर्गिस दत्त’. खरोखरच एका जादुई परीकथेसारखी ह्या प्रेमी युगुलाची गोष्ट आहे.
कशी झाली दोघांची पहिली भेट ?
सुनील दत्त हे सुरवातीला फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करत नव्हते तर ते सिलोन रेडिओ मध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम करायचे. त्यांचं नाव होतं बलराज दत्त आणि नर्गिस ह्या मात्र प्रथितयश बॉलीवूड अभिनेत्री होत्या, त्यांचा सिलोन रेडिओवर इंटरव्ह्यू होता तेव्हा त्या दोघांची पहिली भेट झाली. पाहता क्षणी सुनील दत्त, नर्गिसच्या प्रेमात पडले. ते तीला बघून इतके भुरळून गेले की त्यांना एक पण प्रश्न विचारता आला नाही आणि तो कार्यक्रम झालाच नाही, हे प्रकरण म्हणजे “लव्ह ऍट फर्स्ट साईट” होते असे म्हणायला हरकत नाही, पण सध्या फक्त सुनील यांच्या बाजूने हे प्रेम होते.
अश्या प्रकारे त्यांची पहिली समोरासमोर भेट झाली, लवकरचं त्यांची दुसरी भेट ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटाच्या सेट वर झाली आणि पहिला प्रसंग आठवून नर्गिस यांना हसू आले. लवकरच तिसरी आणि महत्वाची भेट झाली ज्यामुळे दोघांचे करीयर आणि खाजगी आयुष्य बदलून गेले. मेहबूब खान यांच्या ‘मदर इंडिया’ चित्रपटात सुनील दत्त ह्यांना नर्गिसच्या मुलाचा रोल मिळाला होता. हा चित्रपट सुदधा खूपच लोकप्रिय झाला आणि दोघांची लव्ह स्टोरी पण !
पिक्चर अभी बाकी है !
ह्या चित्रपटाच्या आधी पर्यंत नर्गिसचे राज कपूर यांच्याशी प्रेमसंबंध होते पण राज कपूर विवाहित असल्याने आणि त्यांना मुले असल्याने ते नार्गिसचा स्वीकार बायको म्हणून करत नव्हते, ९ वर्षे त्या दोघांचे प्रेमप्रकरण चालू होते परंतु राज साहेब त्यांच्या बायकोलाही सोडत नव्हते आणि स्वतःच्या वडिलांच्या विरुद्ध जाण्याचे धाडसही त्यांच्यात नव्हते त्यामुळे नर्गिस ह्या नात्यातून बाहेर पडली.
इकडे मदर इंडिया च्या सेट वर सुनील दत्त दिवसेंदिवस नार्गिसच्या प्रेमात आकंठ बुडत होते, पण त्यांना बोलून दाखवता येत नव्हते. एकदा शूटिंग दरम्यान मोठी आग लागली आणि नार्गिस ह्या आगीत फसल्या होत्या, त्यांना वाचवण्यासाठी सुनील दत्त स्वतःच्या जीवाची परवा न करता आगी मध्ये उडी घेतली आणि त्यांनी नर्गिसचा जीव वाचवला पण ह्या दरम्यान ते खूप जखमी झाले आणि त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले.
त्यांची देखभाल करायला नर्गिस स्वतः दवाखान्यात जाऊ लागल्या आणि त्यांना सुद्धा आता सुनील दत्त यांच्याबद्दल ओढ निर्माण झाली होती, ह्याच काळात सुनील दवाखान्यात असताना त्यांची बहीण खूप आजारी पडली तिची सुद्धा काळजी नार्गिस यांनी घेतली तेव्हाच सुनील दत्त यांनी निश्चित केलं की उरलेलं आयुष्य नार्गिसच्या संगतीने घालयवायचं आहे. त्यांनी नर्गिसला लग्नाची मागणी घातली आणि त्याही लगेच तयार झाल्या. त्यानंतर लवकरच ११ मार्च १९५८ ला त्या दोघांनी गुपचूप लग्न केलं आणि १९५९ ला ही बातमी जगजाहीर करून मोठं रिसेप्शन दिलं.
संसार सुखाचा !
लग्नानंतर सुनील आणि नार्गिस यांचा संसार सुखी होता. त्या दोघांना तीन मुले झाली संजय, नम्रता आणि प्रिया. नर्गिस यांनी लग्नानंतर बरेच सामाजिक कार्य केले, त्यांना १९८० साली पॅनक्रियाचा कॅन्सर झाला ज्यामुळे पुढे वर्षभरात त्यांचे निधन झाले. आजारपणात पती सुनील यांनी आपल्या बायकोची रात्रंदिवस सेवा केली. मात्र नंतर बायकोच्या निधनाने ते पूर्ण कोलमडून गेले. पुढे आपल्या प्रिय बायकोच्या नावाने त्यांनी कॅन्सर रुग्णांना मदत म्हणून ट्रस्ट चालू केली. अश्या तऱ्हेने कोणत्या तरी चित्रपटाच्या कहाणी सारखीच त्यांची प्रेम कहाणी, खूप चढ उतारांची रोमांचित करणारी आणि कित्येक लोकांना प्रेरणादायी ठरली!