“उद्या येऊन तुमची फी घेऊन जा”, सुषमा स्वराज यांचा शेवटचा फोन कुणाला ?

907
sushma swaraj, harish salve, kulbhushan jadhav case, adv harish salve

हिंदुस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं आकस्मित निधन झालं. मंगळवारी रात्री १०च्या सुमारास स्वराज यांना छातीत दुखण्याचा त्रास होत होता. त्यांना ताबडतोब दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वराज यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.

स्वराज यांनी ह्र्दयविकाराच्या झटक्याच्या काही मिनिटं अगोदरच कुलभूषण जाधवांचा खटला लढत असलेले ज्येष्ठ वकिल हरीश साळवे यांना संपर्क केला होता.हा संवाद अखेरचं ठरेल याची कल्पनाही नसलेले साळवे ही आठवण सांगताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले.

sushma swaraj, harish salve, kulbhushan jadhav case, adv harish salve
Sushma Swaraj’s last call to Adv Harish Salve (Source – India TV)

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया त्यांनी या संभाषणाबद्दल सांगितलं कि, “मंगळवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी सुषमा स्वराज आणि माझं बोलणं झालं, “उद्या संध्याकाळी ६ वाजता तुम्ही तुमची फी घ्यायला या, त्यानंतर अवघ्या काही क्षणातच हि बातमी ऐकून सुन्न झालो,” असे सांगताना ते भावूक झाल्याचे पहायला मिळाले. यावर काय बोलावं हेच सुचत नाही. त्या एक वरिष्ठ मंत्री होत्या. मी माझी मोठी बहिण त्यांच्या निधनाने गमावली ,” असं साळवे बोलताना म्हणाले.


आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here