लोकप्रियतेचे शिखर गाठणारी संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मालिका स्वराज्यरक्षक संभाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडत आहे. आता ह्या मालिकेतून इतिहासातील एक नवीन अध्याय दाखवला जाणार आहे.
संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज ह्यांचा जन्म मालिकेत दाखवला जाईल. संभाजी राजे औरंगजेबाशी कसा लढा देतात, ते औरंगजेबापासून स्वराज्यरक्षण कसे करतात हे आता पुढील भागात दाखवले जाईल. औरंगजेबाचा मुलगा अकबर ह्याची संभाजी राजेंनी भेट घेतली असे नुकतेच ह्या मालिकेत दाखवले होते.
आता पुढे संभाजी महाराज कोणती रणनीती आखतात आणि अकबराचा वापर करून औरंगजेबाला कसे हैराण करतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. पुढे काही भागांमध्ये आपण संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज ह्यांचा जन्म व संभाजी महाराजांचे युद्ध कौशल्य व युद्धनीती हे पाहू शकणार आहोत.
स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या कारभाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा सुनावण्यापासून ते प्रत्यक्ष ती शिक्षा अमलात आणण्यापर्यंतचा प्रत्येक भाग अतिशय उत्कंठावर्धक होता व त्यामुळे मालिकेच्या लोकप्रियतेत भर पडली.