दहशतवादी बनण्यासाठी पाकिस्तानला निघून गेलेला, आज आहे प्रसिद्ध गायक

964
altaf mir, altaf ahmed mir, terrorist to singer, altaf mir story, altaf mir journey, अल्ताफ मीर, altaf mir song, altaf mir cokestudio, altaf mir ha gulo

काश्मीरच्या आजादीसाठी भारावून जावून अल्ताफ मीर पाकिस्तानला दहशतवादी बनण्यासाठी निघून गेले पण तिकडे काही वेगळंच घडलं

मित्रांनो, हा लेख वाचताना कदाचित तुम्हाला एखाद्या फिल्मी स्टोरी प्रमाणे वाटेल, पण तसं नाहीये. या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेली ही सत्य कहानी आहे. कला ही मानवाला मिळालेली अशी देन आहे जिला आपण जोपासली कि ती आपलं आयुष्य जोपासते व आयुष्याला महत्त्वपूर्ण कलाटणी देते. असाच काहीसा प्रत्यय अल्ताफ मीर व त्यांच्या कुटुंबाला आलाय असं म्हणता येईल.

सध्या युटयूब वर ”हा गुल्हो, तूही मा सह वुवचन यार मारो” हे काश्मीरी गाणं खुप गाजत आहे. ‘ये फुलांनो, तुम्ही माझ्या सख्याला कुठे बघितलंय काय’ असं या गीताचा अर्थ होतो. कोक स्टूडियोच्या मार्फत अल्ताफ मीर याने हे गाणं गायलं आहे. अल्ताफ मीर हा मूळचा जम्मू कश्मीर मधील अनंतनाग येथील जंगल मंडी मधला. त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. ६वी पर्यंत शिक्षण घेतलेला अल्ताफ एकवेळी दिवसा कंडक्टरचे काम करत असे व रात्री कपड्यांना चैन लावायचे काम करत होता.

altaf mir, altaf ahmed mir, terrorist to singer, altaf mir story, altaf mir journey, अल्ताफ मीर, altaf mir song, altaf mir cokestudio, altaf mir ha gulo

Altaf Ahmad Mir (Source – The Indian Express)

२२ वर्षाचा असताना घर व कुटुंब सोडून मनात काश्मीर आजादी विचाराने भारावून 1990 ला तो मित्रांबरोबर अतिरेकी बनण्याच्या विचाराने LOC पलीकडे गेला. बंदूक व हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकव्याप्त कश्मीर मधील एका उग्रवादी टोळीत तो सामील झाला. ४ वर्षे तो उग्रवाद्यांबरोबर राहिला, बंदूक, हत्यार चालवायला शिकला पण त्याचं मन तिथे लागलं नाही शेवटी १९९४ ला परत पळून तो घरी आला.

घरच्यांना आपला मुलगा परत आला म्हणून आनंद झाला पण तो आनंद जास्त वेळ टिकला नाही. कारण त्याच दिवसांत अनंतनाग मध्ये भारतीय समर्थक असणारी इखवान नावाची संघटना ही उग्रवादी व दहशदवाद्यांना आळा घालण्यासाठी सक्रिय झाली होती. ती सर्वत्र त्यांचा शोध घेत असे. अल्ताफ हा चार वर्षे उग्रवाद्यांबरोबर राहिल्यामूळ इखवानच्या कारवायांना घाबरून १९९५ ला परत पाकव्याप्त काश्मीर मध्ये पळून गेला. घरच्यांना त्याच्याबद्दल काहीच माहिती समजली नाही. तिकडे POK ची राजधानी मुज्जफराबाद मध्ये अल्ताफ राहु लागला. तेथीलच एका संस्थेत लहान मुलांच्या कपड्यांना चैन लावायाचे काम तो शिकऊ लागला. तेथे असतानाच तो गाणं आणि डफली वादन शिकला.

altaf mir, altaf ahmed mir, terrorist to singer, altaf mir story, altaf mir journey, अल्ताफ मीर, altaf mir song, altaf mir cokestudio, altaf mir ha gulo

Altaf Mir Who Crossed Over LoC to Become Militant and is Now Coke Studio Sensation (Source – News18.com)

संगीताची आवड असल्यामुळे विविध कार्यक्रमांमध्ये वगैरे तो चांगल्या प्रकारे गाऊ लागला. असेच एका मित्राच्या लग्नात तो गात असताना तेथे रेडियो मुज्जफराबाद मधील एक कर्मचारी हजर होता. त्याला अल्ताफचे संगीत खुप आवडले. त्या कर्मचार्यांने अल्ताफला रेडियो मध्ये ऑडिशन द्यायला सांगितले. अल्ताफने ऑडिशन दिले व त्याची रेडियो मुज्जफराबाद वर निवड झाली. तो रेडियो वर कार्यक्रम करू लागला. त्याच दिवसात त्याला त्याच्याप्रमाणेच असणारे गुलाम मोहम्मद डार, सैफ-उद्दीन शाह, मंजूर अहमद खान हे भारतातून आलेले व्यक्ती भेटले. त्यांच्या साथिने त्याने ‘कसामीर’ नावाचा बैंड बनवला व तो विविध कार्यक्रमात सहभागी होऊ लागला. या बँड मध्ये गुलाम मोहम्मद सारंगी वाजवत, सैफ-उद-दीन हा तुम्बाकहिर नामक ड्रम सारखे कश्मीरी लोकवाद्य वाजवत असे आणि मंजूर अहमद नाउत नावाचे वाद्य वाजवत.

altaf mir, altaf ahmed mir, terrorist to singer, altaf mir story, altaf mir journey, अल्ताफ मीर, altaf mir song, altaf mir cokestudio, altaf mir ha gulo

Altaf Mir, a singer, Ghulam Mohammad Daar plays Sarangi. Tumbaknaer’ by Saifuddin Shah Garha’ by Manzoor Ahmed Khan (Source – Kashmir Life)

२०१७ मधे कोक स्टूडियो ही म्यूजिक कंपनी नवीन कलाकाराच्या शोधात एक्सप्लोरर टॅलेंट हंट नामक कार्यक्रम राबवत होती. त्यामध्ये सहभागी होताच अल्ताफचा हा बैंड सिलेक्ट झाला. अल्ताफने आपल्या बँड सोबत प्रसिद्ध कवी गुलाम अहमद यांची ‘हा गुल्हो…’ ही कविता गायली. या गाण्याचा व्हिडीओ कोक स्टूडियोने ११ जुलै रोजी यूट्यूब वर प्रसारित केला. अवघ्या तीन दिवासतच या व्हिडीओने तीन लाखांपेक्षा जास्त व्हिव मिळवले व त्यांना मोठी प्रसिद्धि मिळली. या व्हिडीओ बरोबरच अल्ताफ आणि त्याचा बँड कश्मीर खोर्यात खूपच लोकप्रिय बनला.


Meet Anantnag’s Altaf Mir who made to Coke Studio Pakistan (Source – Kashmir News Bureau)

अल्ताफच्या घरच्यांनी जेव्हा हा व्हिडीओ बघितला तेव्हा तब्बल २८ वर्षानी अल्ताफ हयात असल्याचा पाहुन त्यांना खुप आनंद झाला. अल्ताफची आई जना बेगम म्हणाली की ‘आम्हाला वाटलं होतं की अल्ताफ मारला गेला, पण तब्बल २८ वर्षांनी तो जीवंत आहे आणि चांगल्या मार्गावर आहे हे पाहुन आनंद झाला.’ अल्ताफने प्रसिद्ध झाल्यानंतर दिलेल्या एका मुलखतीत त्याचा थक्क करणारा जीवनप्रवास सांगितला. आता अल्ताफचे कुटुंबीय त्याच्या घरी येण्याची वाट पाहत आहेत.

अल्ताफ मीरच्या या उदाहरणावरुन आपण पाहू शकतो की संगीत या कलेने एका अतिरेक्याचा एक कलाकार बनवून दाखवला. त्यामुळे आपल्या व इतरांच्या कलेला मान आणि वेळ द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here