भारताने जगाला दिलेले अविष्कार…. पण श्रेय दुसऱ्याला ?

23607
indian discovery, indian science in marathi, indian science, in marathi, zero, zero invention, aryabhata, aryabhata in marathi, plastic surgery invention, sushrutasamhita, chess, shivkartalpade, who invented chess, shampoo invention,प्लास्टिक सर्जरीचा शोध, विमानाचा शोध, शिवकर बापूजी तळपदे, शॅम्पूचा शोध, आर्यभट

भारताने जगाला अनेक मोठे शोध दिले परंतु त्याचं श्रेय मात्र दुसऱ्यालाच दिलं गेलं. कोणते होते ते शोध आणि त्याचं श्रेय दुसऱ्याला का ?

या लेखाची सुरुवात करताना मी तुम्हाला ऍपल कंपनीचे संस्थापक “स्टीव जॉब्स” यांनी केलेल्या एका वक्तव्याची आठवण करून देतो त्यांचे असे म्हणणे होते की “Inventions distribute between a leader and follower” म्हणजेच नवीन होणारे अविष्कार हे सिद्ध करतात की, कोण नेतृत्व करणार आहे व कोण मागे मागे चालणार आहे. तुम्हाला आज हे ऐकून दुःख होईल की भारत नवीन शोध लावण्यात एक तर जगाचे नेतृत्वही करू शकत नाही व अमेरिकासारख्या देशाच्या मागे मागे सुद्धा राहू शकत नाही. जगातील जास्तीत जास्त इनोव्हेटिव्ह प्रॉडक्टचा अविष्कार अमेरिकेत केला जातो व मोठ्या प्रमाणात त्याचे निर्माण चीनमध्ये होते तर भारत फक्त या तयार केलेल्या प्रॉडक्टचा उपभोग घेतो म्हणजेच भारताची भूमिका इनोव्हेटर म्हणून कमी आहे व कंन्झुमर म्हणून जास्त आहे.

नोबेल पुरस्कार विजेता व अमेरिकेचे विख्यात फिजिसिस्ट “डेव्हिड जे. ग्रास” यांनी मेक इन इंडिया कार्यक्रमात आपले विचार मांडताना सांगितले होते कि मेक इन इंडिया भारतासाठी खूप महत्त्वाची आहे पण ही दुसऱ्यावर विसंबून होता कामा नये. भारताने स्वतः अविष्कार करावेत तसेच नवीन शोध लावले पाहिजेत, आविष्काराने नवीन प्रोडक्ट विकसित होतात यामुळेच मेक इन इंडियाचा नारा बदलून “Discover, Invent and Make in India” करायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.

तुम्ही हे ऐकून हैरान व्हाल की मेक इन इंडिया कार्यक्रमाची सुरुवात आजपासून जवळपास चार वर्षांपूर्वी करण्यात आली होती पण आजवरही भारतात असा कोणताही आविष्कार झाला नाही की त्याची चर्चा जगात होऊ शकेल म्हणजेच नवीन अविष्कर घडवण्यात भारत खूप मागे आहे.

संयुक्त राष्ट्राची एजन्सी “World Intellectual Property”ने 2016 मध्ये जो “ग्लोबल इंनोवेशन इंडेक्स” सादर केला होता त्यात भारताचा क्रमांक 66 वा होता, तसे सांगायचे झाल्यास भारताचे मानांकन मागील काही वर्षात सुधारले आहे काही दिवसापूर्वी भारताचे 81 मानांकन होते पण या यादीत भारताने अजून सुधारणा करायला हवी. या यादीत मागील 6 वर्षात स्वित्झर्लंड 1 ल्या क्रमांकावर विराजमान आहे अमेरिका 4 क्रमांकावर आहे तर चीन 25 व्या क्रमांकावर आहे.

आता प्रश्न हा आहे की नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात भारताचे डोके किती चालते ? या प्रश्नात एक अशी माहिती समोर आली आहे की मागील दहा वर्षात भारताने दिलेल्या प्रत्येक सहा पेटन्ट मागे सरासरी फक्त एक भारतीयांच्या नावावर होते. उरलेले पाच पेटन्ट देशात काम करणाऱ्या विदेशी कंपन्यांना मिळाले. तुम्हाला असं सांगू इच्छितो की पेटन्ट म्हणजे कोणत्याही नवीन शोधाला अधिकृतरीत्या स्वतःची ओळख देणे. भारताचे कंट्रोलर जनरल ऑफ पेटन्ट डिझाईन अंड ट्रेडमार्क यांच्या माहितीनुसार वर्ष 2006 पासून डिसेंबर 2015 पर्यंत भारतात 67 हजार 342 पेटन्ट जारी करण्यात आले, त्यातील 56 हजार 727 विदेशी संशोधकांच्या नावावर आहेत आणि फक्त 10 हजार 615 पेटन्ट भारतीय संशोधकांच्या नावावर आहेत. याचा अर्थ असा झाला की भारतात खूप कमी प्रमाणात शोध लावले जातात एक जागतिक महाशक्ती बनणाऱ्या देशासाठी ही चांगली गोष्ट नाही.

“इनोव्हेशन्स अँड रीसर्च” च्या बाबतीत मागे राहण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे “रिसर्च अँड डेव्हलपमेंट” वर कमी खर्च करणे, “Organization for Economic Co-operation and Development” च्या माहितीनुसार भारतात GDP चा फक्त 0.82% भागच शोध कार्यावर खर्च केला जातो. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ही आकडेवारी 2.0% इतकी राहायला हवी. भारताचा शेजारी देश चीन नवीन शोधकार्यासाठी आपल्या GDP चा 2.0% इतका भाग खर्च करतो या यादीत साऊथ कोरिया सगळ्यात समोर आहे ते 4.3% इतका खर्च करतात, तर त्यापाठोपाठ इजराइल 4.1% भाग नवीन शोध कार्यासाठी खर्च करतो.

Global innovation Index 2016 मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सायन्स व इंजीनियरिंग सारख्या विषयांमध्ये ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्याच्या यादीत भारत 8 व्या क्रमांकावर आहे. पण ह्याच इंडेक्सच्या आकडेवारीनुसार शिक्षणाच्या स्तरांमध्ये देशांचे मानांकन 118 वे आहे, तर चीन या यादीत 4 थ्या क्रमांकावर आहे. तुम्ही असेही म्हणू शकता की भारतात Quantity of Education म्हणजेच शिक्षणाचे संसाधन तर खूप आहेत पण Quality of Education म्हणजेच शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये विशेष सुधारणा नाही, म्हणजे आपल्या देशाचे सिस्टीम एका कारखान्यासारखे आहे ज्याच्यात मोठ्या प्रमाणात इंजिनिअर डॉक्टर जन्म घेत आहेत पण ते एवढे लायक बनत नाहीत की जगासमोर एखादा मोठा आविष्कार घडवू शकतील. याचे असेही कारण होऊ शकते की भारतात शोध व अविष्कर यासारख्या गोष्टीला जास्त महत्त्व दिले जात नाही.

चला तर बघुयात भारताने लावलेले शोध…..

0 चा शोध

भारतीय शास्त्रज्ञांनी 0 चा शोध (Zero Invention) लावून जगाला एक अभूतपूर्व भेट दिली. काही लोक हे श्रेय आर्यभट (Aryabhata) यांना देतात तर काही लोक भास्कराचार्य यांना या शोधाचे श्रेय देतात.

0 चा शोध भास्कराचार्यांनी लावला अथवा आर्यभटाने लावला तर प्राचीन काळात याचा उल्लेख कसा जसे की रावणाला 10 तोंडे श्रीकृष्णाला 1600 बायका तसेच कराची संख्या 100 ही शंका आपल्या मनात येत असेल, बहुतेक त्या काळी 0 दाखवण्याची पद्धत वेगळी असावी, जसे रोमन लोकांनी त्यांच्या सोयीसाठी 10 साठी X, 5 साठी V एक साठी i अशा खुणा निश्चित केल्या होत्या.

indian discovery, indian science in marathi, indian science, in marathi, zero, zero invention, aryabhata, aryabhata in marathi, plastic surgery invention, sushrutasamhita, chess, shivkartalpade, who invented chess, shampoo invention,प्लास्टिक सर्जरीचा शोध, विमानाचा शोध, शिवकर बापूजी तळपदे, शॅम्पूचा शोध, आर्यभट
Aaryabhata (Image Source – Livemint)

बुद्धिबळ

बुद्धिबळ (Chess) हा खेळ तुम्ही सुद्धा खेळला असेल. हा खेळ जगाला भारताने दिला आहे. तसे पाहता या खेळाचा खूप जुना इतिहास आहे हा खेळ भारतीय खेळ चतुरंग पासून तयार झाला आहे. भारतीय उपमहाद्वीप प्राचीन काळात चतुरंग हा खेळ खेळला जायचा आणि त्यापासून बुद्धिबळाची निर्मिती (Invention of Chess) करण्यात आली असावी असा अंदाज आहे आज जगातील 134 पेक्षा जास्त देश हा खेळ खेळतात.

indian discovery, indian science in marathi, indian science, in marathi, zero, zero invention, aryabhata, aryabhata in marathi, plastic surgery invention, sushrutasamhita, chess, shivkartalpade, who invented chess, shampoo invention,प्लास्टिक सर्जरीचा शोध, विमानाचा शोध, शिवकर बापूजी तळपदे, शॅम्पूचा शोध, आर्यभट
Chausar or Chaturang (Source – Pinterest)

प्लास्टिक सर्जरी

प्लास्टिक सर्जरीचा उपयोग आज संपूर्ण जगात केला जातो प्लास्टिक सर्जरीचे जनक “सुश्रुत” यांना मानले जाते. सुश्रुत यांनी 600 इसवी सन पूर्व मध्ये हे तंत्रज्ञान (plastic surgery invention) विकसित केले होते. पुढे 1974 मध्ये काही ब्रिटिश शास्त्रज्ञ ही कला अवगत करण्यासाठी भारतात आले होते व त्यांनी कला शिकण्यासाठी भारतात 20 वर्षे घालवली.

indian discovery, indian science in marathi, indian science, in marathi, zero, zero invention, aryabhata, aryabhata in marathi, plastic surgery invention, sushrutasamhita, chess, shivkartalpade, who invented chess, shampoo invention,प्लास्टिक सर्जरीचा शोध, विमानाचा शोध, शिवकर बापूजी तळपदे, शॅम्पूचा शोध, आर्यभट
Maharshi Sushrut, the founder of plastic surgery (Source – Ozy)

वायरलेस कम्युनिकेशन (Wireless Communication)

सर जगदीशचंद्र बोस यांनी आपल्या या आगळ्या-वेगळ्या अविष्कारला जगदीश चंद्र बोस यांनी 1895 मध्ये जगासमोर आणले होते. यांनी एका इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवला 75 फूट इतक्‍या दूरपर्यंत पाठवले होते. इटालियन इन्वेंटर “गुगलीयल्मो मार्कोनी” यांनी जगदीशचंद्र बोस यांच्या पॅटर्नचा उपयोग करत स्वतःच्या रेडिओ वेव तयार केल्या त्यांना त्यांच्या आविष्कारासाठी 1909 मध्ये नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. जगदीश चंद्र बोस यांनी आपल्या आविष्काराचे पेटंट केले नव्हते त्यामुळे त्यांना या आविष्काराचे मिळावे तेवढे श्रेय मिळाले नाही.

indian discovery, indian science in marathi, indian science, in marathi, zero, zero invention, aryabhata, aryabhata in marathi, plastic surgery invention, sushrutasamhita, chess, shivkartalpade, who invented chess, shampoo invention,प्लास्टिक सर्जरीचा शोध, विमानाचा शोध, शिवकर बापूजी तळपदे, शॅम्पूचा शोध, आर्यभट
jagdishchandra bose Invented Wireless Telecommunication (Source – scroll.in)

विमानाचा शोध

विमानाचा शोध कोणी लावला ? (Who Invented airplane) असा प्रश्न विचारला असता आपल्याकडचा अगदी पाचवीचा मुलगाही सांगतो की राइट बंधूंनी लावला पण राईट बंधूंच्याही अगोदर हा प्रयोग “शिवकर बापूजी तळपदे” (Shivkar Bapuji Talpade) या भारतीय व्यक्तीने केला होता व तो यशस्वी सुद्धा झाला होता. ही घटना इंग्रजांच्या काळातली होती, इंग्रज शिवकर तळपदे यांना त्यांच्या शोधकार्यासाठी वारंवार अटक करत व त्यांच्या शोधकार्यात मुद्दाम बाधा घालत पण त्यांच्या दबावाला न जुमानता शिवकर तळपदे यांनी आपला प्रयोग यशस्वी केला होता.

त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर 1903 मध्ये तब्बल 8 वर्षानंतर राइट बंधूंनी विमान उडवले होते व या घटनेला पहिले उडान मानले गेले.

indian discovery, indian science in marathi, indian science, in marathi, zero, zero invention, aryabhata, aryabhata in marathi, plastic surgery invention, sushrutasamhita, chess, shivkartalpade, who invented chess, shampoo invention,प्लास्टिक सर्जरीचा शोध, विमानाचा शोध, शिवकर बापूजी तळपदे, शॅम्पूचा शोध, आर्यभट

World’s First Aeroplane Was Constructed And Flown By Shivkar Bapuji Talpade (Source – Humor Nation)

2012 मध्ये नासाने Mercury Engine बनवण्याची घोषणा केली अगदी तेच की जे शिवकर तळपदे यांनी जवळपास 125 वर्ष अगोदर तयार केले होते. या इंजनचा प्रयोग शिवकर तळपदे यांनी बहुतेक त्यांच्या विमानामध्ये केला होता. या घटनेशी प्रेरित “हवाईजादा” (Hawaizaada) हा हिंदी चित्रपट सुद्धा आहे.

शॅम्पू

शॅम्पूचा शोध भारतात लागला आहे, शॅम्पू (Shampoo) हा शब्द हिंदीच्या शंमपू या शब्दापासून तयार करण्यात आला आहे. म्हणजेच मसाज करणे 1962 मध्ये या शांपुचा शोध (Invention of Shampoo) लावण्यात आला.

शोध लावण्यात आला होता तेव्हा शाम्पूचा उपयोग डोक्याचे मसाज करण्यासाठी केला जायचा. पहिल्यांदा शॅम्पू प्राकृतिक जडीबुटी व तेलापासून तयार करण्यात आला होता ब्रिटिश लोकांना ही युक्ती खूप आवडली व ते याची सामग्री इंग्लंडला घेऊन गेले.

indian discovery, indian science in marathi, indian science, in marathi, zero, zero invention, aryabhata, aryabhata in marathi, plastic surgery invention, sushrutasamhita, chess, shivkartalpade, who invented chess, shampoo invention,प्लास्टिक सर्जरीचा शोध, विमानाचा शोध, शिवकर बापूजी तळपदे, शॅम्पूचा शोध, आर्यभट

Shampoo was invented in India (Source – Anish Oza

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here